पिंपळपान - चारोळ्यांचे

तू पाहिलेल्या स्वप्नांना
पहाटे डोळ्यात मी बघतो
पहाटेचीच स्वप्ने पुरी होतात
त्या पहाटेची प्रतीक्षा मी करतो...शिरीष 

दुखाची खरी जाणीव
विरहात खरी होते
असते प्रेम सोबत जेव्हा
हास्याशिवाय ओठी काही नसते...शिरीष  

हृदयाचा प्रत्येक ठेका
तुझ्या आठवणीचा असतो
आजही श्वासाश्वासात सदा
अपुल्या प्रेमाचा गंध जपतो...शिरीष  

ये मिठीत माझ्या प्रिये
दुखे तुझे मला दे
सोसले आहेस तू आजवर
प्रेम माझे तू आज घे..शिरीष

काही क्षणापुरती साथ
आज जन्मभराची वाटते
परतशील थोड्या अवधीत तू
याचीच वाट वेडे मन हे पाहते...शिरीष

डोळ्यात माझ्या कैद
तुझीच प्रतिमा प्रिये
वेड्या मनाची इच्छा
परतुनी लवकर तू ये...शिरीष

तुझी साथ मजसी प्रिये
हवीहवीशी वाटणारी
असली अंतरावर जरी तू
नजरेत माझ्या दिसणारी...शिरीष

नयनातील माझ्या तुझी प्रतिमा
ओठी हास्य खिलवते
तुझाच चेहरा स्मरताना
प्रेमाची कळी मनी फुलते...शिरीष

सौख्य तुझ्या पायी नांदावे
हीच इच्छा माझ्या मनाची
नसावे दुख तुझ्या जीवनी
इच्छा नयनातील आसवांची...शिरीष

तुझ्या संगे घालवलेला
प्रत्येक क्षण नजरेत आहे
नाहीस दूर माझ्या पासून तू
त्या क्षणातच मी जगत आहे...शिरीष

शब्दांनी घेतलेला निरोप
नयनात अश्रू आणुनी गेला
कसे उत्तरावे या निरोपास
आज शब्दही मजसी न आठवला...शिरीष

माझ्या मनाने प्रिये
निरोप शब्दांचा स्वीकारला
तू परतुनी येईपर्यंत
शब्दांवर काबू मी मिळवला...शिरीष

दिवसांचे वर्ष झाले
ती परतुनी नाही आली
होतोच तिच्या प्रतीक्षेत
तिच्या लग्नाची पत्रिका आली...शिरीष

थांबवलेस जरी वेळेला
काळ काही थांबणार नाही
आहे जे नशिबी तुझ्या
त्यावेगळे काही घडणार नाही..शिरीष

नवीन खेळ आयुष्यात..
सदा मी मांडत राहिलो..
खेळवले या आयुष्याने मला..
अन..मीच एक खेळणे बनुनी राहिलो..शिरीष

इच्छाशक्तीच होती माझी...
म्हणून प्रेमाने जिंकायला गेलो...
खेळ खेळला नियतीने असा...
माझ्याच प्रेमाला मी मुकलो...शिरीष


प्रेमाची आपली कहाणी
प्रत्येकाला आपलीशी वाटणारी
प्रेमाची व्याख्या बदलेल तेव्हा
आपलीच कथा त्यात रंगणारी...शिरीष 
तुझ्या मनातील प्रत्येक शब्द
तुझे प्रेम व्यक्त करत आहे
नाही काबूत मन हि आत्ता
तुझ्या जवळीक ते येत आहे...शिरीष  

शब्दातील भावना अपुली
शब्दापलीकडे पोहचली
प्रेमाने रंग भरले शब्दात
कळी प्रेमाची ती बहरली...शिरीष 
तुला दूर जाताना पाहून
डोळे माझे पाणावले
व्यक्त कसे करू शब्दात आज
शब्दांनीही अश्रू ढाळले...शिरीष
 
शब्दातील ताकद माझ्या...
आज ना उरली...ना कळले मलाही..
माझ्याच शब्दांनी..
माझी शेवटची इच्छा लिहिली...शिरीष

प्रेम , मैत्री या नात्यांवरून..
आज विश्वास उडाला...
दिखावे होते सारे..
एकांत हा जीवनी आला..शिरीष

काही क्षणाचे जगणे..
अन रोज आठवणीत तडपणे...
एक सारखे जणू दोन्ही..
रोज मरणाला अनुभवणे..शिरीष.

एक नजर तिची..
सारे काही सांगुनी गेली...
जाणले मी हि..
माझी जागा तिच्या जीवनी ना उरली...शिरीष.

समोर माझ्या ती होती..
नजर आमुची खिळली होती..
खंत मनात अशी होती ..
शब्दांना माझ्या मात्र जाग आली नव्हती..शिरीष.

जीवांच्या पुस्तकातील
पाने सारी निखळली आहे..
आठवणींचे पिंपळपान ते
आजही मात्र मी जपले आहे...शिरीष