Sunday, March 14, 2010

सुख ते माझ्या नशिबात नाही...

करू किती ती तडजोड मी ..
मलाच माझे समजत नाही..
येते अपयश चौबाजूनी..
सुख ते माझ्या नशिबात नाही...

नावाला ती मोठी डिग्री..
आहे माझ्या नावा आधी..
वणवण फिरतो नोकरीसाठी रोज मी..
सुख ते माझ्या नशिबात नाही...

केले प्रेमही एकदाच मी..
केले समर्पित सर्वस्व तिच्यासाठी..
गेली सोडूनी तीही मला आधी ..
सुख ते माझ्या नशिबात नाही...

ठरवले ठेवायचे सुखी मी..
माझ्या जन्मदात्यांना नेहमी..
बनलोच कारण मी त्यांच्या दुखाना..
सुख ते माझ्या नशिबात नाही...

अपयशाचा तो डाग घेउनी..
खात आहे ठोकर पावलो - पावली..
दाखवी नियतीही दुखाचे ते चित्र..
पण सुख ते माझ्या नशिबात नाही...सुख ते माझ्या नशिबात नाही...

----------------शिरीष सप्रे(१४-३-२०१०)------------------------

1 comment:

  1. शिरीष,

    "सुख ते माझ्या नशिबात नाही..." सुंदर आहे कविता. आपल्या धगधगत्या जीवनातील अनुभव सुंदर रेखाटले आहेस. माणूस हा दु:खानेच गुरफटलेला प्राणी आहे ह्याची जाणीव सुंदर शब्दात केली आहेस.

    ReplyDelete