Monday, March 29, 2010

अंधाराचे जाळे ते फिटत नव्हते...

केली सुरुवात जीवनाच्या या प्रवासाला...
नव्हते माहिती कोठे नशीब नेईल मला...

परीक्षेतील गुणांसाठी मी झटायचो..
अव्वल नंबर येण्यासाठी मी लढायचो...

संपली शाळा कोलेज आले..अन
आयुष्याला असे वेगळे वळण आले..

कोलेज संपता संपता चुकांचे डोंगर झाले..
अन अखेरीस हाथी डिग्री चे चिटोरे आले ..

राहिलो लढत सतत मी एका ध्येयासाठी..
नसले नशिबात जरी तेच ध्येय गाठण्यासाठी..

नोकरीसाठी मी त्या दारो दारी फिरलो ..
अपयशाच्या रस्त्यावर मी न माझा राहिलो..

होती इच्छा पण मार्ग मजला दिसत नव्हता..
आयुष्याच्या या मार्गावर सर्वत्र अंधार होता..

मारू हाक कोणाला हेच मला उमजत नव्हते..
आयुष्यातील अंधाराचे जाळे ते फिटत नव्हते...अंधाराचे जाळे ते फिटत नव्हते...

-----------------शिरीष सप्रे(२९-३-२०१०)----------------

Friday, March 26, 2010

राहीन मी जिवंत...

नाही मी दुखी आज नसलीस जरी तू..
आहेस सामावलेली आठवणीत माझ्या तू..

उठतो मी स्वप्नांना त्या पूर्ण करण्यासाठी..
होतीस पाहिलेली स्वप्न जी माझ्यासाठी..

असतो देत लढा ती स्वप्ने वास्तवासाठी..
राहीन लढत सदा मी त्या वचनपूर्तीसाठी..

आहे तुझे हि जग वेगळे.. पाहतेस जिथून तू..
म्हणशील तू हि एकदा "आहे गर्व माझा असल्याचा" तू..

म्हणतात सारे मला..नाही हयात ती या जगात..
नाही माहिती त्यांना,आहेस जिवंत तू माझ्या आठवणीच्या विश्वात..

आहेत आठवणी जवळ खूप आयुष्य माझे घालवण्यासाठी..
राहीन मी जिवंत सदा..स्वप्न आपली पूर्ण करण्यासाठी..स्वप्न आपली पूर्ण करण्यासाठी..!

---------------शिरीष सप्रे(२६-३-२०१०)----------------------

बघ देऊन माझ्या चुकांना माफी...

दिला त्रास तुला मी क्षणोक्षणी..
रडवलेहि तुला मी पावलो पावली..
नाही ठेवले त्या सुखात तुला कधी..
जमले तर बघ देऊन माझ्या चुकांना माफी...

करत होतीस प्रेम तू मजवर खरे..
दिली तोडूनी मी तुझ्या प्रेमाची दारे..
नाही येणार पुन्हा तुझ्या आयुष्यात कधी..
जमले तर बघ देऊन माझ्या चुकांना माफी...

त्या सुखाचा नव्हतो मी हकदार..
केले होते दुर्लक्ष तुझ्या प्रेमाला वारंवार..
आहे जात तुझ्या जीवनातून सखी ...
जमले तर बघ देऊन माझ्या चुकांना माफी...

घेतले ते खापर फोडुनी माझ्या डोक्यावर..
विश्वासघाताचा कलंक लावला मी माझ्या कपाळावर..
राहशील तू त्याच्याबरोबरच आयुष्यभर सुखी...
जमले तर बघ देऊन माझ्या चुकांना माफी... माझ्या चुकांना माफी...!

-----------------शिरीष सप्रे(२६-३-२०१०)----------------------

कोकिळा तू शांत का..?

वातावरणात हा गंध बहरला..
आम्रातरूचा गंध दरवळला..
वसंत ऋतू हि आज असा बहरला..
पण कोकिळा तू शांत का..?

होते कुहू कुहुने तुझ्या संध्याकाळ..
आवाजाने त्या वातावरणात हि येई बहार..
वातावरणालाही आज तुझ्या आवाजाची आतुरता..
पण कोकिळा तू शांत का..?

मला हि वाटे तुझा आवाज ऐकावासा..
सखीला माझ्या खुश करायचा..
पाहतो वाट तुझ्या मधुर स्वराची..
पण कोकिळा तू शांत का..?

मधुर स्वराने तुझ्या मन हि खिले..
आवाजाने त्या नैराश्य दूर हटे...
मंजुळ स्वराची त्या आम्हास आतुरता..
पण कोकिळा तू शांत का..?

नको राहूस शांत आता..
तुझे हि दुख सांगून टाक..
ऐकावूनी दे जगाला सार्या..
कि आज तू शांत का..?कि आज तू शांत का..?

--------------शिरीष सप्रे(२२-३-२०१०)---------------

Friday, March 19, 2010

आई - नसशील जगात या तू..

येईन बाहेरून थकून मी..
"आई" हाक मारू कोणाला..
नसशील आई जगात या तू..
तुझे नाव मी देऊ कोणाला..

विसरू कसे प्रेम तुझे आई..
मजवर जे तू केलेस...
ओवाळूनी टाकले आयुष्य स्वताचे..
अन तुझे आयुष्य तू कमी केलेस..

कसे जगू मी तुजविना आई ..
नसशील जेव्हा तू या जगात ..
उठेल घरही खायला मला असे..
असेल उभा जेव्हा मी त्या दारात..

हसणे - रडणे होते तुजपाशी..
नसशील जेव्हा तू..बोलू मी कोणाशी..?
करायचो सुरुवात दिवसाची तुझ्या नावाने..
नाहीस तू तर..दिवसाची सुरुवात करू मी कशी..?

आहे गरज बाळाला या तुझी अजूनही..
आहे लहानच मी..असेल झालो मोठा कितीही..
नको तो पैसा मला..असला मज जवळ जरी...
एक मी असेन "आई विना भिकारी"..."आई विना भिकारी"....

--------------------शिरीष सप्रे(१९-३-२०१०)--------------------

Sunday, March 14, 2010

सुख ते माझ्या नशिबात नाही...

करू किती ती तडजोड मी ..
मलाच माझे समजत नाही..
येते अपयश चौबाजूनी..
सुख ते माझ्या नशिबात नाही...

नावाला ती मोठी डिग्री..
आहे माझ्या नावा आधी..
वणवण फिरतो नोकरीसाठी रोज मी..
सुख ते माझ्या नशिबात नाही...

केले प्रेमही एकदाच मी..
केले समर्पित सर्वस्व तिच्यासाठी..
गेली सोडूनी तीही मला आधी ..
सुख ते माझ्या नशिबात नाही...

ठरवले ठेवायचे सुखी मी..
माझ्या जन्मदात्यांना नेहमी..
बनलोच कारण मी त्यांच्या दुखाना..
सुख ते माझ्या नशिबात नाही...

अपयशाचा तो डाग घेउनी..
खात आहे ठोकर पावलो - पावली..
दाखवी नियतीही दुखाचे ते चित्र..
पण सुख ते माझ्या नशिबात नाही...सुख ते माझ्या नशिबात नाही...

----------------शिरीष सप्रे(१४-३-२०१०)------------------------

Thursday, March 11, 2010

नक्की तुम्ही कविता वाचता का..?

का पाहता आधी नाव त्याचे..
मग वाचायची का ती कविता
असा विचार तुम्ही करता का..?
नक्की तुम्ही कविता वाचता का..?

असेल ती कविता..
एका मुलीने केलेली ..
करायला तिला इम्प्रेस..
तुम्ही तिला रिप्लाय देता का..?
नक्की तुम्ही कविता वाचता का..?

असेल एखादी कविता..
कोणा एका मुलाची..
कविता त्याची वाचायची..
तुम्ही मग टाळता का..?
नक्की तुम्ही कविता वाचता का..?

असतो करायचा रिप्लाय कोणालाही ..
म्हणुनी तुम्ही ती कविता..
न वाचताच रिप्लाय देता का..?
नक्की तुम्ही कविता वाचता का..?

आहो असते त्या कवितेत..
काही जणांच्या भावना..
करुनी दुर्लक्ष त्या भावनांचे..
तुम्ही स्वताचे नुकसान करता का..?
नक्की तुम्ही कविता वाचता का..?नक्की तुम्ही कविता वाचता का..?

--------------------शिरीष सप्रे(१०-३-२०१०)--------------------------

गंधाळलेले गीत माझे..

गंधाळलेले गीत माझे..
तुझेच बोल गात आहे..
ऐकशील जेव्हा गीत माझे..
तुझेच नाव मी गात आहे...

दूर त्या अंतरावरी..
हाक तुला मारत आहे..
गंधाळलेले गीत माझे
तुझेच बोल गात आहे...

बहरलेल्या फुलात आज..
तुझाच गंध येत आहे..
गंधाळलेले गीत माझे
तुझेच गीत गात आहे...

पावसाच्या या सरीमध्ये ..
तुझाच चेहरा दिसत आहे..
गंधाळलेले गीत माझे
तुझेच गीत गात आहे...

आकाशी त्या चंद्रकोरीत..
तुझेच हास्य खिलत आहे..
गंधाळलेले गीत माझे
तुझेच गीत गात आहे...

हवेची ती झुळूक आज
तुझ्या स्पर्शाची आठवण देत आहे
गंधाळलेले गीत माझे
तुझेच गीत गात आहे...तुझेच गीत गात आहे....

--------------शिरीष सप्रे (२२-२-२०१०)--------------




माझी ऑनलाइन मैत्रीण...!

कविता पोस्ट करता करता
अशीच एकीशी ओळख झाली...

तिच्या कवितेला रिप्लाय देता देता
ही ओळख फ्रेंड रिक्वेस्ट पर्यंत जाउन पोहचली...

फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट झाली
जी-टॉक वर आमची एक-मेकाशी बोलायला सुरुवात झाली,
एक-मेकांची ओळख पटताच
मन आमची एक-मेकाना ओळखु लागली ....

बोलणे आमचे दरोज होत होते,
मन आमचे तेवढेच जवळ येत होते...

एखाद्या ओळखिच्या व्यक्तीने प्रेम न द्यावे,
त्याहुन अधिक एक अनोलखी व्यक्ति ने आपल्यावर प्रेम करावे....

तिच्या विचारताच रात्र घालवावी....
सकाळ होताच ती ऑनलाइन येण्याची वाट पहावी..

ती आल्यावर कालचा दिवस कसा होता याची विचारपूस करावी
तिच्याशिच आधी बोलून मग आपल्या दिवसाला सुरुवात करावी..

ऑफिस नंतर ही तिच्याशी बोलायची अफाट इच्छा व्हावी
पण तिला तिचा नंबर मागायची हिम्मत न व्हावी..

दरोज बोलायची आपल्याला सवय लागावी
पण ही सवय मनाला आनंदायी व्हावी..

तिच्याशी बोलताच सार्या दुखाचा विसर पडावा
नव्याने पुन्हा जगायचा जोश जणू अंगात यावा..

फिरत होतो सर्वत्र एक मैत्रीसाठी
देव आहे दुनियेमधेय पाठवले तिला माझ्यासाठी...

असे जणू का होते
एखाद्या अनोलखी व्यक्तिमुले सारे जीवन पालटून जाते...

आमचे हे नाते असेच राहुदे
तिच्या मैत्रीची साथ मला अशीच आयुष्यभर मिळत राहुदे...

अंतरावर असुनही जवळ असल्यासारखी वाटावी
अशी एक मैत्रीण आयुष्यात प्रत्येकाला मिळावी....प्रत्येकाला मिळावी....!

---------शिरीष सप्रे (२८-११-२००९)---------------

"ताई -- मोठी बहिण"

आई-वडील या नंतर कोण आपल्याकडे पाहणारी असते...
तीच ती आपली ताई असते...

लहान भावंडासाठी तडजोड करत असते
तीच ती आपली ताई असते...

लहान भावंडांच्या चुका ..आपल्या पोटात घालत असते
तीच ती आपली ताई असते...

लहान भावंडांवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला
सामोरी जी जात असते
तीच ती आपली ताई असते...

घरी आई-वडील नसताना मायेने सांभाळ करणारी असते
तीच ती आपली ताई असते...

लहान भावंडांचे प्रत्येक हट्ट पुरवणारी असते
तीच ती आपले ताई असते...

चुकीच्या वाटेवरून जात असताना..
आपल्या ध्येया पासून भरकटत असताना..
योग्य मार्ग दाखवणारी जी असते
तीच ती आपले ताई असते...

आई-वडील नंतर आपल्यावर जीव लावणारी असते
तीच ती आपली ताई असते...

स्वतच्या इच्छेला मारून
स्वताच्या जबाबदार्या ओळखून
त्यासाठी रात्र-दिवस कष्ट करणारी जी असते
तीच ती आपली ताई असते...

अशी हि ताई देव प्रत्येक भावंडाना देओ
अशा या प्रेमळ ताईच्या सर्व इच्छा पूर्ण होवो...सर्व सुख मिळो...सदा
आनंदी राहो.....!
-----------------शिरीष सप्रे(५-१२-२००९)------------------------
---

प्रेम हे काय असत...

प्रेम हे काय असत...
मनाची गोष्ट का
भावनांचा खेळ..

एक-मेकांना समजणे
का शब्दांचे ते खेळ..

तुझे-माझे करणे
का तुझ्यात मी असणे..

एक-मेकां वर रुसणे
का एक-मेकांना मनवणे..

एक-मेकांशी भांडणे
का वेळेस प्रेमाने सॉरी म्हणणे..

रात्री फोन वर तासन-तास गप्पा मारणे
का बोलता बोलता मधेच झोपणे..

दोघांनी एकाच नजरेने पाहणे
का एक-मेकांच्या स्वप्नासाठी प्रयत्न करणे..
एक-मेकांच्या आवडी-निवडी लक्षात घेणे
का तिला/त्याला जसे आवडेल तसेच राहणे..

प्रेमात एक आलिंगन देणे
का दुखात त्याच खांद्यावर डोके ठेवून रडणे..

रात्र-दिवस तिचा/त्याचा विचार करणे
का तिच्या/त्याच्या शिवाय काही न उमजणे..

प्रेमात उंच असे मनोरे बांधणे
का ती/तो सोडून गेल्यावर तेच मनोरे तुटणे..

तिच्या/त्याच्या साठी काहीही करायला तयार होणे
का ती/तो सोडून गेल्यावर जीवही द्यायला तयार राहणे...

हेच कोडं मनात असते...
नाही सुटत अजूनही ते कि
नक्की "प्रेम म्हणजे काय असतं........"........प्रेम म्हणजे काय असतं........
--------------शिरीष सप्रे (१४-१२-२००९)--------------------------

माझी कीम्मत--काय तू ठेवली...!

माझी कीम्मत--काय तू ठेवली...!

खरे प्रेम करूनही आणि त्यास जपूनही आपली कधी कधी काहीच कीम्मत नाही उरत....त्यासाठी ही एक कविता...


पाहिले रडताना मी एकाला
जणू काही बघितलेच मी स्वताला...

असाच एके काळी मी हि रडत होतो
आपल्यातल्या या दुराव्याला मी कोसत होतो...

क्षणो-क्षणी साथ तुला देत होतो
असे होऊनही तुझ्या हृदयातून मी उतरत होतो...

होतो मी फक्त तुझ्या प्रेमाचा भुकेला
तुला सदा हसत पाहायचे हेच लक्ष्य
होते माझ्या जीवनाला...

संकटाची जाणीव तुला कधी होऊ दिली नाही
दुखाची ती झळ तुजपर्यंत कधी पोहचू दिली नाही...

काचेच्या पात्राला जपावे जसे...
त्याहून अधिक तुला मी जपले...
तुझे हास्य कधी मुरणार नाही
यासाठी सारे आयुष्य मी वेचले....

पाहत होतीस तू मला होणारा तो त्रास...
तरीही मजपासून दूर जायचे ...
सोडला नाही तू हा अट्टाहास...

सांग मला दुराव्याने कोणाचे झाले भले...
रडूनी तुझ्या आठवणीत डोळेहि माझे थकले...

रात्रीचे जगणे..कोठेही रडणे..
न कामावर जाणे..न स्वताकडे पाहणे..
काय माझी अवस्था झाली...
तुला दिलेल्या या सुखी जीवनात...
काय माझी कीम्मत उरली.....नाही माझी कीम्मत ठेवलीस....

----------------------शिरीष सप्रे(१७-१२-२००९)-----------------------------------

अचानक असे काय झाले...!

आज मला अचानक असे काय झाले,
तिला फ़ोन केला अणि तिला भेटायला बोलावले,

तिने जेव्हा फ़ोन उचलला,
तेव्हा मनात प्रश्नानी थैमान घातले,
तिला कशी आहे विचारावे का आज भेटणार का असे विचारावे,
या विचारातच मन माझे गोंधलले,

आज मला भेटणार का असे विचारताच ,
तिचा उशिरा का होइना होकार आला,

आज मी तिला भेटणार या विचारानेच
मन माझे आनंदित झाले,

घाई गडाबदित ऑफिस चे काम
मी लवकरात लवकर उरकले,
अणि पाय माझे तिच्या दिशेने चालू लागले,

मनात आज तिला भेटायाचा आनंद होताच,
त्यात काय बोलायाचे हा ही प्रश्न होता,

काय नियतीचा खेळ होता की आम्ही दुरावलो होतो,
पण काही कालाने का होइना आज आम्ही भेटणार होतो,

घड्यालाचा काटा पटापट धावत होता,
तसेच माझ्या ह्रुदयाचे ठोके ही तो वाढवत होता,

आज त्या हवेने ही आपला रोख बदलला होता,
या संध्याकालाच्या हवेतही तिचाच गंध होता,

कसेही का होइना तिच्या आधी मला पोहचायाचे होते,
गुलाबाचे कोमल फूल आज मला द्यायचे होते,

अचानक असे काय झाले कोणासही न समजले,
शेवटी मात्र ते कोमल फूल एका बस खाली चिरडले,

आजही ती त्याच ठिकाणी माझी वाट पाहत आहे,
चिरडले गेलेले ते फूल हातात घेउन अश्रु आपले पुसत आहे,

असे नको करू देवा तिची तरी कालजी कर,
तुझ्या या बंधनातुन मला एकदा तरी मुक्त कर...एकदा तरी मुक्त कर.....

------शिरीष सप्रे (१८-११-२००९)------------

तुझा आत्मविश्वास...!

तुझा आत्मविश्वास...!
(खूप संकटे आली पण आत्मविश्वास होता म्हणून ती यशस्वी व्यक्ति झालीस.....)

शाळा संपवून तू कॉलेज ला आलीस,
अणि स्वप्नाच्या त्या दुनियेतील एक पायरी पार केलिस,

इतर लोक कॉलेज मधे मजा करत होती,
मजा तुला देखिल कराविशी वाटत होती,
पण खर्या परिस्थितीची तुला ती जाणीव होती,

मजा आपल्याला नंतरही करता येइल,
हे तुला माहिती होते..पण त्या आधी,
चांगल्या मार्कानी पास व्हावे हेच तुझे धेय होते,

अखेर तो दिवस उजाडला अन तुझा रिजल्ट येउन,
स्वप्नाच्या त्या दुनियेतला एक पर्व पार पडला,

काहीतरी नवीन करून तुला दाखवायचे होते,
आर्किटेक्ट आपण व्हावे असे तुला वाटत होते,

पाच वर्षांची आर्किटेक्ट डिग्री घेताना,
खूप कठीण परिस्थितिना तू सामोरे गेलीस,
पण त्या परिस्थितिसमोर तू तुझी हिम्मत कायम ठेवालिस,

येणार्या प्रत्येक संकटाला तू बिनधास्त पणे सामोरे गेलीस,
अन यशाचे ते शिखर तुला गाठायचे आहे हीच गोष्ट तू ध्यानी ठेवालिस,

तू केलेल्या प्रत्येक मेहनातिचे चीज झाले,
अन तुला आर्किटेक्ट हे पद मिळाले,

आज ही तू अशीच मेहनत करत रहावी,
येणार्या प्रत्येक संकटावर हसत खेळत मात कराविस,

तुझ्या दुनियेतील स्वप्नाचे ते शिखर तुला गाठायचे आहे,
मार्गात येणार्या प्रत्येक अड़थल्याना परतीचे मार्ग दाखवायचे आहे,

तुझ्यातला तो आत्मविश्वास असाच कायम ठेव,
कितीही काही झाले तरी स्वताला भक्कम ठेव,

अशीच तू तुझी स्वप्ने पूर्ण करावी ही एक आशा आहे,
अशीच तू यशस्वी होत रहाविस हीच माझी इच्छा आहे.....हीच माझी इच्छा आहे....

---------शिरीष सप्रे(२३/११/२००९)-----------

माझी व्यथा---एक प्रेमी

कशी सांगू माझी व्यथा,
आयुष्यातल्या पुस्तकातली न संपणारी एक कथा,

दिवसा मागुन दिवस गेले,
मन माझे तुझ्या विचाराने वेडे झाले,

ह्रुदयाचे ठोके तिथेच बंद पडले,
जेव्हा "माझ्या आयुष्यातून निघून जा "
असे तू म्हटले,

देह माझा जीवंत आहे,
प्रत्येक वलनावर ठोकर तो खात आहे,
वार्यसार्खा सैरभैर फिरत आहे,
नको त्या दिशेने तो जात आहे,

डोळ्यात माझ्या एक चेहरा आहे,
ह्रुदयात कोरलेले तुझे नाव आहे,

शरीरातले रक्त सारे संपत आहे,
दारू रक्ताची जागा घेत आहे,

वेड्या सारखा मी कुठे ही रडतो,
दारूच्या नशेत मी कुठे ही जाउन पडतो,

आकाशात पाहून तुटनार्या तार्याची वाट मी बघतो,
तू पुन्हा यावी हीच वेड्यासारखी मागणी मी करतो,

माझ्या हातात तुझ्या हाताचे ठसे मी शोधतो,
कसे सापडणार मला तुझ्या हाताचे ठसे ...
त्याच हाताने दारुची बाटली मी तोंडाला लावतो,

तू आयुष्यभर सुखी रहावे,
हीच एक आशा आहे,
माझे आयुष्य लवकर संपत नाही,
हीच माझी व्यथा आहे...हीच एक व्यथा आहे......

------------शिरीष सप्रे (२१/११/२००९)--------------

प्रेमाचा अंत मीच करत गेलो.....!

फोन नाही केला म्हणुन...
तिच्यावर मी रागावत गेलो,

फोन का नाही उचलला म्हणुन...
तिच्याशिच मी भांडत गेलो,

भेटणार आहेस का नाही न समजता...
तिच्याशिच वाद घालत गेलो,

अथांग सागरा सारख्या तिच्या प्रेमाला..
मी धुडकावत गेलो,

मूल्यवान अशा तिच्या अश्रुना...
तिच्या डोळ्यातून मी ओघालत गेलो,

प्रेमाच्या त्या हृदयाला...
वेळोवेळी मी तोडत गेलो,

मीच प्रेम करतो असे म्हणत..
तिच्या प्रेमाला ठोकर मारत गेलो,

तिला न समजता...
तिच्या भावनाना मी दुखावत गेलो,

प्रेम तिचे ही खूप होते..
प्रेमाचे अंदाज वेगले होते..
पण या गोष्टीना मी दुखावत गेलो,

प्रेमाची तिच्या जेव्हा जाणीव झाली..
तेव्हा सार्या चुकांची आठवण झाली..
की माझ्या या क्रोधात...
प्रेमाचा अंत मी स्वता करत गेलो...मीच अंत करत गेलो...मीच अंत करत गेलो...

-------शिरीष सप्रे(४/११/२००९)-------

गोंधळलेला मी असा..!

नाही कळत नक्की करावे काय
नाही समजत मज पाहिजे काय...

मन आहे थोडे गोंधळलेले थोडे वैतागलेले
कसला हा गोंधळ कसला हा वैताग,
समजत नाही मला हवे काय मनाला आज...

वाटे कधी लिहावी कविता ,
वाटे कधी लिहावी एक कथा,
वाटे कधी फिरावे आज ,
तर वाटे कधी घरीच बसावे आज..

मन हि किती वेडे असते ,
नको त्या गोष्टींच्या मागे असते,
असतात जे सोबत आपल्या तरीही
नसलेल्यांच्या मागे ते धावत असते...

करावे नक्की काय आता ते
मला समजत नाही..
गोंधळलेल्या मनाला माझ्या
निर्णय घेता येत येत नाही...निर्णय घेता येत नाही.....

------------शिरीष सप्रे (११-१-२०१०)---------------

नवे वर्ष...तेच दुख...!

..............नवीन वर्ष ते येतच असते पण दुख मात्र माझे तेच असते.....!

३१ डिसेंबर करत होते साजरा सारे...
होतो बसलेला मी कोपर्यात एका...
हताश अन उदास....

काय मी मागणी येत्या वर्षी करावी,
कोणती बोलणी मी या नव वर्षी ऐकावी,

झगमगाट होता चहुबाजूला...
अंधाराचा खेळ होता तो...
फक्त माझ्याच बाजूला.....

पाहुनी आनंदी सर्वाना खुश मी होत होतो,
दुख माझे मी त्यांपासून लपवत होतो,

हसत होते सारे आपल्या मित्रांसोबत...
दुखी मी... कोपर्यात बसलो होतो एकटा...
दारूच्या त्या बाटली सोबत...

असतात नशिबी काही.. प्रेम ज्यांना मिळते...
माझ्या सारख्या दुर्दैवाना फक्त...
दारूची बाटली मिळते...

प्रत्येक घोट घेताना जाळत असतो
आठवणी मी तिच्या...
नाही संपत आठवणी त्या..
न जात मनातुनी माझ्या...

आहे खुश ती मजशिवाय...
तरीही तिच्यासाठी मी झुरतो...
नाही येत का तिला माझी आठवण?
हा प्रश्न रोज देवाला मी विचारतो...

होती काय चूक माझी....शिक्षा अशी मला दिलीस..
प्रेमाचेच रोप मी लावले होते,
पण फळे नासकी दिलीस....

करतात आनंद साजरे सारे..
प्रत्येक वर्ष सरताना...
असतो मी रडत एकटा..
वर्षातील त्या प्रत्येक दिवसांना..

उरलेल्या वर्षाचे आयुष्य संपावे...
हीच इच्छा माझ्या मनी ...
मिळावी मुक्ती कायमची मला..
अन सुखी व्हावे मी...अन सुखी व्हावे मी.....!

-----------------शिरीष सप्रे(४-१-२०१०)-----------------

प्रेम - फक्त वेड्यांसाठी.

प्रेम - फक्त वेड्यांसाठी.

म्हणतात ना वेडी लोकच प्रेम करू शकतात...बाकीची लोक फक्त हिशोब ठेवतात...प्रेमात थोडा वेडेपणा असावा लागतो....


मैत्रीण म्हणुनी माझ्या आयुष्यात आली,
सोबती म्हणुनी मजबरोबर राहिली,

नाही विचारले मी कधी तुझ्या भूतकाळाबद्दल,
विचार करायचा होता मला आपल्या भविष्याबद्दल,

१-२ वर्षे अशी सुखात गेली,
प्रेमाच्या या दुनियेत ती घरे हि बांधली...

बदलावे वातावरण अचानक जणू काही,
एक वीज ती माझ्यावर कोसळली...
नाही ठेवली किंमत तू माझ्या प्रेमाला,
असूनही तुजबरोबर मी सदैव
भेटलीस तू त्या दुसर्याला,

विचार त्याला करशील का रे तू मजसाठी,
झुरशील का तू मजसाठी ?
जसा झुरतो एक वेडा माझ्यासाठी...

हसशील का तू मला हसवण्यासाठी..?
झटशील का तू मला मनावण्यासाठी..?
घेशील का माझ्या चुकांचे खापर स्वतावर..?
रडशील का तू माझ्या प्रत्येक चुकांवर..?

नाही कळणार माझ्या प्रेमाचे अस्तित्व तुला
वेडी लोकच करू शकतात प्रेम खरे,
नाही जमत ते हिशोब ठेवणार्याला....नाही जमत ते हिशोब ठेवणार्याला.....

-------------शिरीष सप्रे (१०-१-२०१०)-----------------------

८-१२ ची ती फास्ट ट्रेन....!

सकाळ होताच धावपळ सुरु होते,
प्रत्येकाला आवरून पटकन
ट्रेन जी पकडायची असते..

८-१२ ची ती फास्ट ट्रेन लागते
प्लाटफोर्म गर्दी अधिकच वाढते..

असते प्रत्येकाला जायची घाई..
दिसली ट्रेन कि चढायची घाई..

असतो मी हि त्या ट्रेन मध्ये
फर्स्टक्लास च्या त्या डब्यातुनी
एकटक पाहत एका मुलीकडे...

तीही मज बघत असते..
तिरक्या कटाक्ष देऊनी...
मज पाहायचा प्रयत्न ती करते...

ट्रेन मधील लोकांना असते
कामावर जायची ती घाई
वाटत असते मला एकट्याला
आज तरी ट्रेन लेट व्हावी..

असतो सुरु नजरेचा तो खेळ
विसरतो जगाला त्या आम्ही
नाही राहत कसला तो ताळ - मेळ

दादर स्टेशन येऊ लागताच
मैत्रिणी बोलावतात तिच्या...
नाईलाज असतो रे तिचा तो
उतरायचे असते जे दादरला तिला...

ती गेली कि मीही
स्वप्नाच्या दुनियेत असतो..
उद्या तरी बोलायचे तिच्याशी ठरवुनी...
८-१२ च्या फास्ट ट्रेन ची वाट मी पाहत असतो...वाट मी पाहत असतो....

---------------शिरीष सप्रे (१२-१-२०१०)--------------------------

स्वार्थी - मनुष्य कसा..

असतो हसत मी सदा
नाही कसली काळजी मला..

येतात सारे मित्र म्हणुनी
झाले काम त्यांचे पूर्ण कि,
जाती सारे मज विसरुनी...

पुढावलेला हाथ.. मी कधीच झिडकारत नाही
पकडलेला हाथ तो अर्ध्यात मी सोडत नाही...

येतो जो-तो आपल्या कामापुरते
झाले काम आपले कि त्यांना
कसली आपली आठवण उरते...

मित्र म्हणुनी आधी जवळ ते घेतात.
झाला आपला स्वार्थ पूर्ण कि
"कोण तू?" असे म्हणुनीहि पुसता...

नाही समजणार माझा साथ तुला आत्ता
पाहशील स्वत तू जेव्हा दुनियेला..
समजेल तेव्हा स्वार्थी असतो कसा..स्वार्थी असतो कसा...

-----------शिरीष सप्रे (११-१०-२००९)-------------

तुझा विचार....!

सकाळ होताच तुझा विचार मनात येतो,
आणि डोळ्यावरची झोप उडत मी जागा होतो.

ऑफिस ला जाताना तू दिसशील हा विचार खेळ खेळत असतो,
पण तुझी ट्रेन येण्याच्या आधी तुला पाहायला मी चुकतो.

सुरु होतो पुन्हा तोच हृदयाचा खेळ,
वाटते बसच्या रांगेमध्ये तरी बघायला मिळेल वेळ.

दरोज हा नजरेचा खेळ सुरु असतो,
पण तुझ्याशी येऊन बोलायचा धीर माझा खचत असतो.

तुझे डोळे , तुझे गोड हास्य बघताना मी स्वप्नाच्या दुनियेत असतो,
तुझ्या गोड हास्यातच माझे हास्य शोधायचा प्रयत्न मी करत असतो.

उशिरा का होईना मला तुझ्याशी बोलायचे आहे ,
माझ्या मनातले गाणे तुला ऐकवायचे आहे .

तू दिसताच तुझ्याशी बोलायचा प्रयत्न मी अनेकदा करतो,
परंतु तुला पटणार नाही या विचाराने मी स्वताला थांबवतो.

या मुक्या हृदयःचे हुंदके कोणाला सांगावे कसे;
माझ्या मनातले गाणे तुझ्या पर्यंत कळवावे कसे.

अशीच हसत राहा , अशीच खिलत राहा ,
माझ्या या स्वप्नांच्या दुनियेत अशीच येत राहा .....अशीच येत राहा ......!

------शिरीष सप्रे (23-10-09)------

तुझे वचन...!

येत्या आयुष्यात साथ द्यायचे वचन...
तू ते झिडकारले,

माझ्या सुखात-दुखात बरोबर रहायचे वचन...
तू ते झिडकारले,

हसत खेळत बोलत रहायचे ते वचन...
तू ते झिडकारले,

ठरवले होते प्रेमाचे घर ते आपण बांधायचे..
प्रेमाच्या त्या घरात सुखाने आपण नान्दायचे..
प्रेमाचे घरटे बांधायचे ते वचन...
तू ते झिडकारले,

येत होती झोपेत एक गोड स्वप्न बनुन..
उमलत होते गोड हास्य तुला पाहून....
स्वप्नात भेटायचे ते वचन देखिल...
तू ते झिडकारले,

उभा होतो तुझ्यापुढे तुला येणार्या दुखाना वाचवत...
प्रयत्न करत होतो प्रत्येक सुखाला तुझ्या दारी पोहोचवत...
त्या प्रयतनाना सार्थक करायचे ते वचन देखिल....
तू ते झिडकारले,

तुझे दुःख सहन करता करता पूर्ण मी झिझलो....
नशिबाने स्वताशिच आज मी खचलो...
आज माझ्या जिवानाने तुझ्या आयुष्यात रहायचे देखिल....
त्या वचनाने ही देखिल आज मला झिडकारले....मला झिडकारले.....!

------शिरीष सप्रे(१/११/०९)----------

अस्तित्व - आपल्या प्रेमाचे..

चंद्र - तार्यांची साथ हि,
असे रात्री पुरती...
आहे आपुले प्रेम जन्मो-जन्मीचे
नाही अवलंबुनी ते अंधारावरती...

सहवास हा आपला
जपला आहे माझ्या श्वासात...
नाही तुटू देणार तुला मी
मीही सामावले आहे त्याच्यात...

असतील तारे अवलंबुनी ते
त्या निशेवरती..तसेच
आहे अस्तित्व माझे हि सख्या
अवल्म्बुनी तुझ्या अस्तित्वावरती...

ठेवले आहे तुझ्या जागी स्वताला मी आत्ता
नाही होऊ देणार त्रास तुला कधी..
सोसला आहेस जो तू माझ्याकरता......जो तू माझ्याकरता
---------शिरीष सप्रे (१२-१-२०१०)-----------

साथ माझी ...

मीच सगळीकडे कमी पडतो..
कोणी नाही तर तूच दाखवुनी दिले मला,
बोलतेस आहे मजवरी विश्वास जास्त तुझा ..
पण ठेवत तर नाही तो खरा...

होता स्वतावरी विश्वास
म्हणुनी तुला इथे आणले...
होता सगळ्याचा विरोध याला
तरीही या घराची तुला मी केले...

सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करताना..
तुझ्या अपेक्षेचा भंग होतो..
कळते मला हि गोष्ट तुझी
घडते असे कि मीही खूप दुखावतो...

हाथ पकडला आहे तुझा मी..
तुला साथ देण्यासाठी...
नाही सोडणार साथ तुझा मी प्रिये..
आहेच मी तुझा जन्मो-जन्मांसाठी...जन्मो-जन्मांसाठी....

-----------शिरीष सप्रे(१६-१-२०१०)-----------------

MKP चे आभार...

होती उमलत कळी एक
या कविता प्रेमी मध्ये..

फुलवत होते तुम्ही सारे कळीला त्या
फार मोठ्या काळजीने

कळी हि मोठ्या आनंदाने उमलत होती
पहिल्या कवितेतून ती तुम्हा
काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत होती...

उमलू दिले कळीला तुम्ही सर्वांनी...
जपले तुम्ही कळीला त्या प्रेमानी...
पाहता पाहता कळीचे ते फुल झाले
पाहुनी फुलाला त्या ...
मन हि तुमचे आनंदित झाले..

आज हे फुल आनंदाने खिलत आहे
पाहुनी प्रेम तुम्हा सर्वांचे
आज आभार ते मनात आहे...आभार ते मानत आहे....
------------शिरीष सप्रे (१६-१-२०१०)----------

वाट पाहते तुझी....

बोलतोस मला तू..
आहे श्वासाच्या एका अंतरावर..
जाणवत नाही गंध तुझा
असलास जरी तू त्या रोमांचावर...

ठेवला होता हाथ मी..
होते ते क्षण असे...
जाववत नव्हते मला हि दूर..
पण जाणे मला भाग होते..

तुझी श्रद्धा तुझी भक्ती..
यावरच मी जिवंत आहे..
घेतलेस समजून मला तू..
तुझ्या पापनीतील अश्रू ते..
अजून माझ्या ओंजळीत आहे..

ये तू लवकर आत्ता..
जगणे कठीण होत आहे..
जाणारा तो प्रत्येक सेकंद..
एका वर्षासारखा वाटत आहे..वर्षासारखा वाटत आहे......!

--------------शिरीष सप्रे (२२-१-२०१०)------------------

कलियुगाचा मी माकड ...

असते नशीब चालत जसे ...
इथून-तिथून उड्या मारत मी नाचे..

असे मी कधी या फांदीवर..
तर क्षणात असे कधी दुसर्या फांदीवर..

नाही एकमेव ठिकाण माझे..
नशिबाच्या तालावर मी सदा नाचे..

आली वेळ कि इतरांना हसवतो..
नसले काम काही कि..
हळूच लपुनी मी जातो..

खोड्या काढण्यात पुढे मी असतो..
चिडवले मला कोणी कि..
धावुनी त्यांच्यावर मी जातो..

नसेल माकड कोणता माझ्यासारखा..
पाहाल तुम्हीही कलियुगातील आता ..
माकड एक माझ्यासारखा...माझ्यासारखा...

-----------शिरीष सप्रे(१-२-२०१०)----------------

थट्टा हि नशिबाने केली...!

आलीस आज वाळूवरुनी चालायला..
पण पहिले नाहीस मला...
विसरलोच नाही आपुले चालणे ते..
सामाविले हाथी माझ्या तुझ्या पायातील वाळूला...

आहेत अजुनी ते भिरभिरणारे वारे..
आहे मी एकटा असे वारा हि करितो मज इशारे...

आहे अजुनी तिथेच मी..
होतो बसलो आपण जिथे..
करितो प्रयत्न अजुनी ते सूर ऐकायचा..
धरले होतेस सूर असे तू तिथे...

आठवितो ती स्पर्श मखमली असा..
शोधितो अजुनी मी माझ्या हाथावारी तुझ्या स्पर्श रेषा....

स्पर्श तो तुझा मनी हवासा वाटे..
आठवूनी दिवस ते.. डोळे माझेही दाटे...

जन्मजन्मंताराची प्रीती..
एका क्षणातच दुभागली..
काय अशी थट्टा हि नशिबाने केली....नशिबाने केली....

-----------शिरीष सप्रे(२६-१-२०१०)--------

आई - तुज्याशी नाही भांडायचे मला..!

अनेकदा आपण अपयश पाहत असताना सर्व राग आपण आपल्या जवळच्या व्यक्तीवर काढतो अन आई वर जास्त आपण राग काढतो..पण तो तर ममतेचा झरा आहे..ते प्रेम कधीच कमी नाही होणार....यावरून केलेली एक कविता....शिरीष सप्रे



आहे मी अजुनी तुझाच..
असा एक लाडका बाळ..
पण आली आहे अशी वेळ मजवर.
कि बदलत आहे माझा काळ..

असाच मी एकटा भटकत असतो..
येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जातो.
नाही सध्या नशिबाची मला साथ..
त्या अपयशाने तुझ्याशी मी भांडत असतो..

नियतीही माझ्या बाजूने नाही..
जाईन जिथे मी..
यशाची पायरी मला
आज सापडत नाही..

येणाऱ्या अपयशाने मी खचतो..
तरीही या अपयशाशी मी लढतो..
अपयशाच्या वाराने घायाळ मी होतो..
रागाने त्या तुझ्याशी मी भांडतो..

प्रेमाची साथ तुझी अजूनही आहे,
अपयशाची बाजू हि आज मोठी आहे,
सांग मला तोंड देऊ कसे अपयशाला..
पण तुज्याशी आई नाही भांडायचे मला..

आज पुन्हा माझ्या या चुकांना
माफ तू कर..
आहे तुझी ममता अजूनही
असेच प्रेम माझ्यावर कर..

तुझ्या या स्वप्नांना आई..
नक्की मी पूर्ण करीन..
येउनी तुझ्या मिठीत एकदा..
मन माझे मोकळे मी करीन..

असे एक वाचन आई देतो तुला..
होणार नाही चूक पुन्हा अशी..
पण तुज्याशी आई नाही भांडायचे मला...आई नाही भांडायचे मला....!

--------------शिरीष सप्रे (२२-२-२०१०)----------------------

मुली - अशा का असतात..?

मुली - अशा का असतात..?
------------------------------------------------------------------------------------------------
हि कविता कोणाला हि दुखावण्यासाठी लिहिली नसून ती एक कविता आहे असे मानून याचा आपण आनंद घ्यावा..जर कोणत्याही मुलीच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमा असावी...आपला शिरीष
-----------------------------------------------------------------------------------------------

असे आधी आमची चिंता..
गेले काही दिवस कि..
का करू तुझी मी चिंता.?..

आधी आवडे बोलायला रात्रभर..
नाही मिळत वेळ नंतर त्यांना ..
अन पाहतो वाट आम्ही मुले दिवसभर..

तू माझा जानू.. तूच माझा जीव..
लोटले काही दिवस कि मग..
आपण आपलेच असतो जसे..
एकटा जीव सदाशिव...

असते आवडत प्रेमाचे आपले शब्द.
असतात आवडत प्रेम करायचे आपले मार्ग..
लोटले काही दिवस कि मग..
बोलताना असे त्या जणु निशब्द...

नाही ठेवत किंमत त्या
आपण केलेल्या प्रेमाची ..
नसे वाटत काही त्यांना..
किंमत त्या ओघळलेल्या अश्रूंची...

कुठे चुकत असतो आम्ही..
तुम्हाच सारे महत्व देतो..
नसते काळजी आम्हा आमुची..
तुम्हालाच तर सुखी ठेवतो..

कळेल तुम्हालाही एकदा..
खरे प्रेम म्हणजे काय..
कराल तुम्हीही प्रेम कोणावर जेव्हा..
अन मिळणार नाही जेव्हा तुम्हाला न्याय..तुम्हाला न्याय...

------------शिरीष सप्रे (५-२-२०१०)---------------

घर तुझ नि माझ....

होते ते हि एक घर असे..
स्वप्नांच्या दुनियेत..
दोन प्रेमी राहतात जसे..

होते ते हि हसत खेळत..
येणाऱ्या प्रत्येक संकटावर..
प्रेमाचा आनंद ते लुटवत...

होती अशी एक त्यांची..
गोड प्रेम कहाणी..
होता एक राजा अन एक राणी..

बांधले आपुल्या प्रेमाचे..
घर त्यांनी असे..
आलात कधीही आपण तरी..
प्रेमच प्रेम सर्वत्र दिसे..

सकाळ होताच तो सूर्यही..
प्रेमाने घर उजळूनी देई..
चंद्रही मग शीतल रात्री..
प्रेमाचे ते पांघरूण देई...

असे घर...
तुझ नि माझ...
घर प्रतिक प्रेमाच....प्रेमाच....

---------शिरीष सप्रे(१८-२-२०१०)-------------

एकच प्याला...!

नाही पाळत मी वचन आत्ता
असा मी एक वेडा प्रेमी..
कोपर्यावर्ती त्या दारू पियुनी पडलेला..

दारूचा एक घोट हा
जसा या शरीरात जातो..
गरम वाटल्याचा भास होत
आठवणीना तुझ्या जागा करतो...

पितात दारू सारे आठवणीना
विसरण्यासाठी...
असतात माझ्यासारखे काही लोक ती
पितात आठवणीना जागवण्यासाठी...

दारूच्या त्या प्रत्येक घोटात
तुझेच नाव पीत असतो ...
झालेल्या त्या धोक्याला
मी समोर पाहत असतो..

अशी काय थट्टा नशिबाने केली..
थामवूनी हाथी दारूची बाटली..
काळजी घे म्हणुनी गेली...

सोड्याच्या त्या बुड-बुड्यात
तुझाच चेहरा दिसतो...
वाटते लाज स्वताचीच मला..
कि अजूनही तुझ्यावर मी प्रेम करतो...

दारू हि कमालीची
कोणी हि बनवली..
एकच प्याला पिता पिता..
रक्तात दारू मिसळली...रक्तात दारू मिसळली....

---------------शिरीष सप्रे (२२-२-२०१०)--------------

राजा - मी या गाडीचा

अशीच आमुची एक कहाणी
मी एकटा गाडीचा या राजा
दूर बांधलेली माझी राणी...

ओझे नेणे माझे काम..
गाडी हाकणाऱ्याचे ओझे वाहणे..
हाच माझा मोठा मान..

पोळ्या च्या दिवशी असतो
मी असा ऐटीत..
राणी हि माझी पाहे
मजकडे अशा खुशीत..

डौलदार शिंगे
हाच माझा रुबाब..
नडते का कोण आपल्याला..
चला पाहू तरी आज..

गाडीला जिंकावणे..
हाच आपला धर्म..
कामे आपले पार पडणे..
अशीच करतो मी कर्म....

नाही हे काम कोणा साध्याचे..
गाडीला जुम्पुनी ऐटीत चालणे..
हेच तर खरे काम
माझ्यासारख्या एका राजाचे...एका राजाचे....

---------------शिरीष सप्रे(२३ -१०-२०१०)--------------

तिनेच आज मला डिलीट केले..

जगायची रात्र जिच्यासाठी..
तिनेच आज मला डिलीट केले..

जिच्याशी बोलण्यासाठी..
काढायचो वेळ दिवसभर..
तिनेच आज मला डिलीट केले..

ती ऑनलाईन येण्याची मी..
वाट पाहायचो तासभर..
तिनेच आज मला डिलीट केले..

जिच्या प्रत्येक कठीण समयी..
साथ द्यायचो त्या वळणावर
तिनेच आज मला डिलीट केले....

जिच्या एका स्मायली साठी..
खुश व्हायचो रात्रभर...
तिनेच आज मला डिलीट केले..

जिच्या एका वाक्यासाठी...
नेट रीन्यू करायचो महिनाभर..
तिनेच आज मला डिलीट केले..

ऑनलाइन तिच्याशी बोलण्यासाठी..
जेवण चुकवायचो आठवडाभर
तिनेच आज मला डिलीट केले..

नाही गम आज मी
तिच्या फ्रेंड लिस्ट मध्ये नसल्याची
पाहतो वाट मी ती ऑनलाईन येण्याची... ऑनलाईन येण्याची

--------------------शिरीष सप्रे(२५-२-२०१०)-----------------------------

मी मोबाईल बोलतोय...

असा मी कधी रिकामा नसतो..
तासन - तास सतत मी बोलत असतो..

नाही फिकीर मला जगाची..
सतत बोलत राहावे हीच इच्छा मनाची..

आलेल्या प्रश्नांना उत्तरे
मी लगेच देतो..
आला मनात प्रश्न कि.
लगेच त्याला विचारतो..

धोका मला हा कधी..
त्याच्याकडून मिळणार नाही..
आहे खात्री मला हि..
नसला तो जरी, तरी मी जाणार नाही..

असलो मी सोबत कि..
जगाला तो विसरतो..
नसली कुणाची साथ जरी..
मी मात्र साथ त्याला देतो..

विविध रूप माझे ..
सगळीकडे तो पाहतो..
त्याच्या जवळचे असलेले रूप माझे ..
त्यावरच सर्वाधिक प्रेम करतो ...

आहे मी सध्या काळाची गरज..
असलो मी सोबत आपल्या कि..
नाही कुणाच्या साथाची गरज..

मुलीनाही मी हवा-हवासा वाटतो..
असला किती दूर कोणीही तरी ..
त्यांना अधिक जवळचा मी वाटतो..

गर्व आहे मला आज..
तुमचे प्रेम मिळाल्याचा...
आहे तो ताज मजकडे..
मी एक मोबाईल असल्याचा...एक मोबाईल असल्याचा...

----------------शिरीष सप्रे (२७-२-२०१०)----------------------

सचिन- क्रिकेट बादशाह

२४ एप्रिल ला झाला एकाचा जन्म..
वातावरणही जणू सारे झाले होते दंग...

मुलाच्या त्या आगमनाने
घर सारे खिलले होते...
जणू सारे देवही त्याच्याच आगमनाची
वाट ते पाहत होते...

होता त्याचा जन्म फक्त
एका गोष्टीसाठी...
क्रिकेटला आपण सर्वस्व द्यायचे..
ठरवुनी मनी ते ध्येय आपले तो गाठी...

"सचिन" असे म्हणतो आपण..
आहे तो क्रिकेटचा राजा...
धारधार खेळाने आपुल्या...
वाजवतो तो सर्वांचा बेण्ड बाजा...

नाही भीती त्याला ...
समोर असलेल्या बॉलरची...
करुनी चौकाराची आतषबाजी..
पाहतो पकड आपण त्याच्या खेळाची...

नवोदितानाही खेळात प्रेरणा तो देई..
पाहताना खेळ त्या राजाचा..
मन हि आपले हरपुनी जाई...

आहेत सारे विक्रम खेळातले..
या राजाच्या नावावरती...
धावांचा हि डोंगर पाहता..
भल्या भल्यांचे डोळे फिरती...

क्रिकेटचा बादशहा तू
असाच धावांचा पाउस पडत राहा..
नाही फिकीर वयाची आपल्याला..
राजा तू असाच बहारत राहा...असाच तू बहारत राहा...

----------------शिरीष सप्रे (२४-२-२०१०)----------------

प्रतिक - आपल्या प्रेमाचे...

आठवतो तो वाडा..
बांधला होता आपण..
प्रेमाच्या त्या आठवणीत..
पाया रचला होता आपण..

सुंदर असा वाडा तो..
नजरेत प्रत्येकाच्या भरायचा..
येणारा - जाणारा पाहुनी त्यास..
आपल्या प्रेमाची दाद तो द्यायचा...

क्षणात काही चित्र पालटले..
अन प्रेमाच्या वाड्याचे तळ ते..
अचानक दुभंगले....

प्रेमाची ती देणगी..
नियतीला मान्य नव्हती...
आपल्या प्रेमाची ती मूर्ती..
जगाला पाहू द्यायची नव्हती..

असले उरले जरी ते अवशेष..
जिद्द मात्र माझी जिवंत आहे..
पाहुनी वाट दरवाजावर त्या मी..
प्रेमाचे प्रतिक ते बनवत आहे...प्रतिक ते बनवत आहे...

---------------शिरीष सप्रे (३-३-२०१०)-------------

का हसावा तो चंद्र गगनी.....

देखणे असे रूप तुझे..
पाहुनी मन प्रसन्न होई..
चंद्र हि दिसे फिका तुजसमोर..
तर का हसावा तो चंद्र गगनी.....

शीतल असे हास्य तुझे..
पाहणाराही दंग होई..
करताच तुलना चंद्रकोरीशी हस्यानी..
तर का हसावा तो चंद्र गगनी...

सखा तुझा वेडा असा..
चंद्रातही तुझा चेहरा पाही...
पाहे हास्याला तुझ्या त्या चंद्रकोरीत..
तर का हसावा तो चंद्र गगनी..

अशा तुझ्या रुपाला..
नजर न कोणाची लागे ...
आहे सारे जग जाहीर ते ...
त्या चंद्रावरही काळे डाग असे...

पाहुनी डाग चंद्राचे ते..
मनो मनी तो हि रडी...
निखळ असे रूप तुझे पाहुनी..
का हसावा तो चंद्र गगनी...का हसावा तो चंद्र गगनी......

-----------------शिरीष सप्रे(३-३-२०१०)---------------

मला न बघता तू निघून गेलीस..

विचारातच तू अशी अडकली
वास्तव होते समोर तुझ्या..
परिस्थितीला तू न जाणली..

अश्रू ढळा ढळा तुझ्या
डोळ्यातून वाहत होते..
काळजाचे इथे माझ्या ..
पाणी पाणी होत होते...

आलो होतो मी जेव्हा
तुला ते न पटले..
होतो सांगत समजावुनी तुला..
पण तू ते न ऐकलेस..

चुकीच्या रस्त्यावरूनी त्या ..
तुला मी आणत होतो..
होतो करीत विनवण्या तुला..
अन तुलाच तर मी समजावत होतो..

माझ्या चुका शोधता शोधता..
तू चुकत गेलीस..
होतो उभा तिथेच मी..
पण मला न बघता तू निघून गेलीस...तू निघून गेलीस...

-----------------शिरीष सप्रे(५-३-२०१०)-----------------

विझता विझता..

येशील ना आज तरी तू..
एक भेट द्यायला मला..
प्राणज्योत हि विझता विझता..
अखेरचे दर्शन द्यायला मला...

कर माफ माझ्या चुकांना..
केल्या होत्या ज्या मी नकळत...
करीत होतीस प्रेम तेव्हाही तू..
बैचेनी माझी होती तुला कळत...

कशी सहज तू मला माफ करायची..
असलो भांडत तुझ्याशी मी जरी...
ओशाळणे डोळ्यात माझ्या तू..
प्रेम शोधत बसायची...

विझता विझता प्राणज्योत माझी..
तुलाच हाका मारत आहे...
अजून थोडा हवा वेळ मला म्हणुनी..
देवाचा धावा मी करत आहे...

नसलो जरी मी या दुनियेत..
कमी माझी तुला भासणार नाही..
विझला असला जरी जीव माझा..
पण प्रेम माझे विझणार नाही...प्रेम माझे विझणार नाही....

--------------शिरीष सप्रे(४-३-२०१०)-------------------------

तो हि आता विझत आहे....

समजावू कसे तुला..
काहीच मुळी कळत नाही..
पाहतेस रडताना मला असे..
तरीही दया तुला येत नाही..

यावे वादळ समुद्रात जसे...
तसे आपल्या जीवनात आले..
जाणार्या प्रेमाच्या नौकेला त्या..
पूर्णता डूबवूनी गेले...

सच्चे आहे प्रेम माझे..
म्हणुनी पोहत किनार्यावर आलो..
पहिले दूर जाताना जेव्हा तुला..
मी न माझा राहिलो....मी न माझा राहिलो..

समजावले तुला अनेकदा मी..
तुला न ते कळाले..
ढाळले रक्ताचे अश्रू ते..
तेही तू न जाणले...

आयुष्याच्या दिव्याचे तेल
ते आता संपत आहे..
तेवणारा दिवा तुझ्या नावाचा..
तो हि आता विझत आहे..तो हि आता विझत आहे....

--------------------शिरीष सप्रे (७-३-२०१०)------------------

स्त्री - तिची रूपं (महिला दिन विशेष)

काढते चिमटे पोटाला स्वताच्या..
बाळाचे पोट ती भरत असते...
मायेच्या छायेत त्याला..
ती वाढवत असते अशी हि..
" आई " असते...

लहानांच्या चुका ती..
स्वतावर घेत असते..
करते त्रास सहन स्वत ती..
लहानांचा आधार ती बनत असते..
अशी ती " ताई " असते..

करते आपल्या कुंकूचे रक्षण..
त्याच्या सुखासाठी ती झटत असते..
ठेवुनी व्रत वट - पौर्णिमेचे ती..
त्याच्या आयुष्याची मागणी देवाकडे करत असते..
अशी ती एक " अर्धांगिनी " असते...

घेते समजुनी आपल्याला ती..
वेळो वेळी आपलीच काळजी असते..
असते सामावलेले गोड हास्य तिचे..
आपल्याच त्या हास्यात..
अशी ती एक " सखी " असते...


खेळवते जी स्वतच्या अंगावर त्यांना..
सांगुनी गोष्टी त्यांना बाळकडू देत असते..
दाखवुनी योग्य मार्ग लहानांना त्या..
प्रेमाचा वर्षाव ती करत असते..
अशी ती एक " आजी " असते..

अशी हि स्त्री
विविध रुपात जगत असते..
करुनी समर्पित आयुष्य आपल्यासाठी..
आपुले आयुष्य ती बहारत असते...बहारत असते...


-------------शिरीष सप्रे(८-३-२०१०)------------

Wednesday, March 10, 2010

"तू अन मी"--एक नाते

तू फुल..मी काटा
तू समुद्र.. मी लाटा

तुझे बोल... मी शब्द
तुझे ओठ... मी त्याचे हास्य

तुझे मन... मी तुझा विचार
संकटाला प्रत्येक...मी असीन तुझा आधार

नजर तुझी डोळे माझे
डोळ्यात एकच चित्र ते हि.. तुझे

झोप माझी... तुझेच स्वप्न
स्वप्नात देखील तूच माझी असण

आवाज तुझा... मी त्याचे स्वर
तूच माझी बायको अन मीच तुझा वर

तुझे दुख... होई मला त्रास
तुला हसत बघण हाच एक ध्यास..

एक वचन एक विश्वास
तूच माझी राहोस हीच एक आस...हीच एक आस....

-------------शिरीष सप्रे(१३-१२-२००९)-------------------

खेळ - "एका नोकरीचा"

दहावी झालो पास चांगल्या मार्कांनी..
घेतली सायन्स ला admission फार मोठ्या हौशीनी

११ वी गेली बारावी तोंडावर आली...
पण दहावीची ती हवा माझी अजूनही नवती जिरली...

कशी बशी बारावीची ती परीक्षा मी दिली...
सुदैवाने रिझल्ट मध्ये प्रथम श्रेणी आली...

गेलो मी engineering ला फार मोठ्या खुशीत...
अडकलो जणू तुरुंगात त्या चार वर्षाच्या भेटीत...

केटी सोडवता सोडवता नाकी नऊ माझ्या आले...
कसे सांगू तुम्हाला कसे वर्ष मी वाचवले...

सुरु होता हा खेळ प्रत्येक वर्षी...
कधी संपणार ती चार वर्ष कोणास ठाऊक कोणत्या जन्मी...

शेवट ती अशी वेळ आली...शेवटची परीक्षा संपवून...
Engineer ची डिग्री माझ्या हाथी आली...

होते खुश सगळे माझ्या घरी..
झाला मुलगा Engineer आत्ता पहा छोकरी...

सांगावे कसे त्यांना हेच कळत नाही...
डिग्री असली जरी हाथी काहीच उरत नाही...

भटकत आहे सर्वत्र एका नोकरीसाठी...
आहे मी Engineer देता का हो मज नोकरी....

रिसेशन आलेले अजून संपले नाही...
माझ्यासारखे आहेत अनेक Engineer ....
नोकरीवर अजूनही ते कुठेच रुजू झाले नाही...

नाही खेळ हा सोप्पा एका जागेचा....
नशिबी असावे लागते प्रत्येकाच्या...
हा तर खेळ आहे एका नोकरीचा....एका नोकरीचा....!

----------------शिरीष सप्रे (२२-१२-२००९)-------------

"मामा-मामी"-- आई-बाबांचे दुसरे रूप

आई-बाबा कामावर गेल्यानंतर...
मायेने आम्हाला तुम्ही वाढवले.....
त्यांच्या गैरहजेरीत स्वताच्या मुलांसारखे...
आम्हावर तुम्ही प्रेम केले....

केलेला प्रत्येक हट्ट तुम्ही पुरवत गेला
आई-बाबा कडे मागतो जसे तसे तुम्ही आम्हास देत गेला....

होती तुमची हि मुले ..ज्यांच्याशी आम्ही भांडत होतो...
पण आमच्या या चुकीवर आम्ही कधीच ओरडा खात नवतो....

आमच्यात - त्यांच्यात कधी फरक तुम्ही केला नाही...
पहिले आहे आम्ही...प्रेमाचा तो रंग कधीच बदलला नाही...

दुखाची ती सर येताच तुमची आठवण येते..
घ्यावे तुम्ही मनी कवटाळून दाट इच्छा अशी होते ...

आठवते अजूनही मायेने भरवलेला तो घास...
खेळवले होते आम्हाला अन आम्ही दिलेला तो त्रास....

आठवते आम्हास अजूनही कसे तुम्ही आम्हाला जपत होता...
आम्ही केलेल्या चुकांना आई-बाबा पासून लपवत होतात...

करितो जेवढे प्रेम आई-वडलांवर त्याहून अधिक तुम्हास करतो...
पुढच्या जन्मी तुमच्या पोटी जन्म घ्यावा अशी प्रार्थना देवाकडे करतो...

तुमच्या या २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
तुमचे जीवन अजुनी सुखी जावो हीच आम्हा सर्वांची सदिच्छा...हीच सदिच्छा....

--------------------------शिरीष सप्रे (२०-१२-२००९)-------------------------

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!

रात्रि झोपेतून दचकून मी जागा होतो,
अणि या अंधारात तुला शोधायचा प्रयत्न मी करतो,
हताश होउन पुन्हा झोपायचा प्रयत्न मी करतो,
तेवढ्यात एक अश्रु डोळ्यातून गालावर ओघलतो,

सुरु होतो आठावनिचा तो खेळ,
नाही रहात पुन्हा झोपायचा ताल-मेळ,

असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करावे,
त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे,
आणि स्वप्नाच्या दुनियेत बांधलेले घर,
खाडकन फुटावे,

कुठे कमी पडत होतो,
प्रत्येक वेळी तुलाच तर समजुन घेत होतो,
तुझ्यावर येणार्या संकटाना,
परतीचा रस्ता मी दाखवत होतो,

तू केलेल्या प्रत्येक चुकावर,
माफ़ी मी मागत होतो,
तुझ्या चुकानी होणार्या त्रासाने ,
वेळोवेळी मीच रडत होतो,

तुझ्याकडून झालेली चुक तुला कधीच दिसली नाही,
माझ्या डोळ्यातून येणार्या अश्रुनाही किम्मत राहिली नाही,

कामाचा दबाव आहे असे म्हणून,
तू माला टाळत होतीस,
पण या कारणा खाली,
तूच माझ्या पासून दुरावत होतीस,

काम तेव्हा मीही करत होतो,
माझ्या कामाचा दबाव तुला दाखवत नव्हतो,
वाटत होते तुला माझ्या साथाची गरज आहे,
तुलाच मी समजुन घेणे हेच माझ्या नशिबात आहे,

तुझे काम हे कधी संपले नाही,
आपल्यातील वाढत गेलेले अंतर,
हे तर कधीच मिटले नाही,

दरोज झोपताना देवाकडे एकच गार्हने असते,
तू सदैव खुश रहावी हेच माझे मागणी असते,

आशा आहे तू पुन्हा माझ्याकडे परतावी,
पण तू येणार नाही हे वास्तव स्वीकारता येत नाही,

प्रेम माझे संपणार नाही मी मेल्यावर,
पण आठवण माझीही येइल मी गेल्यावर...आठवण माझीही येइल मी गेल्यावर

---------शिरीष सप्रे (१८/११/२००९)----------

बाबा - एक दोस्त..

श्रीफळ जसे बाहेरून कठीण असते पण आतून त्याला मलई असते..."बाबा" हेही कठोर असले तरी आतून प्रेमाचा एक अथांग असा सागर असतो...त्यावर माझा एकप्रयत्न...

कठोर असे वा असे शिस्तबद्ध..
असतो असा एकच व्यक्ती ...
असतो तो लयबद्ध...

"बाबा" म्हनीतो आपण ज्यांना
असतात ते एक मित्र...
घेतात सांभाळुनी आपल्यासारख्या तरुणांना..
असे ते एक सच्चे दोस्त..

येती भय मनी जेव्हा..
बाबांची येते मज आठवण..
ठेवुनी खांद्यावरती हाथ विश्वासानी..
"घाबरू नकोस बाळ" लढ तू असे ते म्हण..

दाखवत नाही प्रेम कधी ते तुम्हा..
असते मनी प्रेम खूप..
व्हावा मुलगा मोठा आपुला..
करावी त्याने काही चूक...

कठोर दिसे बाहेरुनी जरी ते..
मनी असे प्रेमाचा झरा..
समजेल आपणास प्रेम ते..
विचार तर तुम्ही खरा करा...

दमले आहेत बाबा आत्ता..
द्यावे त्यांना आपण सुख..
घ्या मिठीत मज तुम्ही एकदा..
नाही होणार आत्ता कोणतीच चूक...कोणतीच चूक....

------------शिरीष सप्रे (१६-०१-२०१०)----------

आई... फक्त तुझ्यासाठी....!...

आई -- तुझे मातृत्व

तुझेच बोट पकडून चालायला मला शिकवले
वास्तविक जगात चालता चालता अनेकदा मी पडलो...
पण वेळोवेळी तुझ्याच हाथानी मला सावरले,

तुझाच हाथ पकडून शाळेत मी पहिल्यांदा गेलो
तुला दूर जाताना पाहताच खूप मी रडलो..
धावत आलीस मजजवळ दिलास गोड पापा
उचलून घेउनी मला म्हटलेस "बाळ कुठे हि जात नाही मी आता",

लहानाचे मोठे मला फार लाडात केले
तुझ्या पोटाला चिमटे काढून मला घास तू भारावालेस,

माझे पोट भारता भारता उपाशी तू झोपत होतीस
बाळाला माझ्या भूक लागणार नाही याची काळजी तुला होती,

मी केलेल्या प्रत्येक चुकांना सामोरे तू गेलीस
माझ्या चुकांची शिक्षा हसत तू सहन केलीस,

जपून ठेवले मला येणाऱ्या प्रत्येक संकटापासून
कधीही दूर केले नाही मला तुझ्या मायेपासून,

आजारी मी पडताच रात्र-दिवस माझ्या जवळ बसायची
"लवकर बरा होशील बाळ" असे म्हणत मला तू गोन्जारायाची,

अजूनही आमच्यासाठी सतत तू झटत आहे
डोळ्यात आला आहे थकवा तरीही आमच्यापासून तू तो लपवत आहेस,

आई हाक मारत डोळ्यातील मातृत्व मला दिसते
बाळावरचे प्रेम पाहून डोळ्यात माझ्या हि पाणी येते,

देवासमान स्थान आई तुला आहे ...
नाही कोठेही तो स्वर्ग...तो तर तुझ्याच चरणी आहे,

जास्त काही नाही आई एक वचन करतो तुला
पूर्ण करीन क्षणं-क्षण तुझ्या त्या स्वप्नातला,

अशी हि आईची माया सतत मिळत राहावी
अशी हि आई देवा शतायुषी व्हावी.....दीर्घायुषी व्हावी........!

-----------शिरीष सप्रे (-१२-२००९)----------