Thursday, June 30, 2011

तिचा वाढदिवस ....

शब्दात आज मांडू कसे
खास असा आजचा दिवस
जीव लावला आहे तुजवर
आज त्या परीचा वाढदिवस...

सुख-शांती, हास्य आनंद
चरणी सदा तिच्या नांदो
दुखाने ही रस्ता भुलावा
आयुष्य तिचे बहरत जावो...

चंद्रालाही ईर्ष्या व्हावी
रुप तिचे असेच खिलावे
ना पडावी दुखाची सावली
हास्य ओठी सदा खिलावे...

अभिनंदन माझे आज फक्त
कवितेतच अडकुनी राहिले
ना जाणले तू ही देवा कधी
तिच्याविना कसे दिवस लोटले...

साथ या जन्मापुरती मजला
हीच तर मागणी केली होती
हास्याची चंद्रकोर अशीच बहरावी
हीच इच्छा या वेड्या मनाची होती...

योग विरहाचा मजला दाखवला
तिच्या सुखाची हमी मजला दे
खिलत राहील हास्य ओठी सदा
हेच वचन तू मजसी दे...वचन तू मजसी दे....
-------------शिरीष सप्रे(३०-६-२०११)-------------

Sunday, June 26, 2011

ती आणि डायरी...

मेळ शब्दांचा प्रेमाशी
प्रयत्न तसा कठीण होता
रेखाटायच्या होत्या भावना
त्या "डायरी" चाच साथ होता...

मनातील भावना मनातच
बोल प्रेमाचे ओठी अडकायचे
व्यक्त होते करायचे प्रेम सारे
अखेरीस शब्द डायरीतच राहायचे...

डायरीतील प्रत्येक पानात तिच्या
माझ्याच तक्रारींची गोष्ट होती
तक्रारीतही पाने रंगुनी जायची
भावना प्रेमाची रेखाटत ती होती...

संवाद तिचा सदा डायरीशी असायचा
ज्या भावनांना बांध ती घालायची
डायरीही तिला सदा विचारायची
का ग तू त्याची तक्रार लिहायची...?

घेईल तो ही समजुनी मजला
आशेने या भावना रंगवायची
पहिले होते मी ही प्रेम तिचे
सुरुवात अन शेवट माझ्याच नावाने करायची...माझ्याच नावाने करायची...
---------शिरीष सप्रे(२६-६-२०११)---------------

Thursday, June 2, 2011

आजही आठवतो...पहिला पाऊस

तो पहिला पाऊस...
.
.
खूप काही सांगून जातो,
मातीचा ओलावा, आठवणीना जागवतो...
उल्हासित करीतो वातावरणास या
ओठांवरी हास्य खिलवूनी तो बरसतो...

आजही आठवतो...पहिला पाऊस
.
.
पावसाच्या त्या सरीत
लखलखत्या विजेसारखे हास्य तुझे
ओठी दवबिंदू पावसाचे
एकटक पाहणारे नयन माझे...

आजही आठवतो...पहिला पाऊस
.
.
सुगंध मातीचा दरवळणारा
पावसात रूप तुझे खिलवणारा
शोधती नजर तुजवर खिळवणारा
मनास या वेड लावणारा...

आजही आठवतो...पहिला पाऊस
.
.
हट्ट तुझा पावसात भिजायचा
नकार माझा तुला सतवायचा
क्षणात विचार बदलूनी मी अन
हास्य तुझे पाहुनी..पाउस ही बरसायचा...

आजही आठवतो...पहिला पाऊस
.
.
बेधुंद होऊनी तू भिजायची
चिंब भिजुनी...मिठीत यायची
आपल्याच विश्वात तू रमायची
प्रेमाची ती सर हर्षाने बरसायची...

आजही आठवतो...पहिला पाऊस
.
.
सुगंध ही मातीचा तसाच आहे
गोडवा पावसाचा ही तोच आहे
चिंब भिजुनी मिठीत येणारी तू
आज मिठीत...तुलाच मी शोधत आहे...तुलाच मी शोधत आहे..
---------शिरीष सप्रे(--२०११)---------