Tuesday, August 31, 2010

आळस रुपी अस्त्रास पुरुनी उरायचं असत....

ब्रम्हांडी एकदा चर्चा झाली
सार्या देवांची बैठक झाली
आळस अस्त्र सोडूनी धरतीवर
मनुष्यास अद्दल घडविण्यात आली...

आळस अस्त्राचा कहर असा झाला
मनुष्य त्यापुढे हतबल झाला
निद्रे पुढे काही सुचेनासे झाले
पृथ्वीतलावावर आळसाने वर्चस्व गाजवले...

टाळं टाळ करण्याची सुरुवात झाली
तारखा पुढे ढकलण्याची सवय जडली
हातील कामे काही लवकर उरकेना
आळसा पुढे त्यांसी काही सुचेना...

जबाबदारीची जाणीव ती नाहीशी झाली
बेफिकीर पणाने मनुष्याशी मैत्री केली
आळस अजात शत्रूसी दूर न त्याने केले
आज आळसास सर्वात जवळचे त्याने केले...

चुकांची जाणीव होईलही त्याला एकदा
वेळ लागेल निसटुनी हातुनी जेव्हा
आयुष्यात चुकांचे डोंगर पार केले
आळसास जेव्हा जवळी त्याने केले...

उठ मनुष्या तू..झटक आळस आत्ता
आहे हाथी वेळ अजूनही..संधी दवडू नकोस आत्ता
कष्टानेच तर जग सारे जिंकायचं असत
आळस रुपी अस्त्रास पुरुनी उरायचं असत...आळस रुपी अस्त्रास पुरुनी उरायचं असत.......
----------------शिरीष सप्रे(३१-०८-२०१०)-----------------

गर्दीत या मी एकटा चालत राही..

असह्य वेदना सहन मी करी
सांगावे कोणाला देवही मजा घेई
दिवस असे कि मी न माझा राही
गर्दीत या मी एकटा चालत राही...

असा मी भरकटलेला
दिशांना सार्या विसरलेला
कुठे जायचे यायचे भान नाही
गर्दीत या मी एकटा चालत राही...

मनावर माझ्या स्वताचा ताबा नाही
असलो सर्वांत तरी एकटा राही
माणसांच्या लोंढ्यात हरवलेला मी राही
गर्दीत या मी एकटा चालत राही...

अनेक प्रश्न सामोरी न उलगडलेले
प्रश्न काही असे कधी न समजलेले
उत्तरांच्या शोधात मी भरकटत जाई
गर्दीत या मी एकटा चालत राही...

वाट सामोरी माझ्या कधी न संपणारी
जीवन माझे असे सुखे न मिळणारी
दुखाची घरे माझ्या आगमनाची वाट पाही
गर्दीत या मी एकटा चालत राही...

काळोखी जीवन माझे,कधीतरी संपणार
गर्दीतील मी एकटा..शेवटचा निरोप घेणार
आयुष्याची वात आज विझण्यास पाही
गर्दीत या मी एकटा चालत राही....मी एकटा चालत राही....
-------------------शिरीष सप्रे(३१-८०२०१०)---------------

Sunday, August 29, 2010

बसमधील ती अनामिका ....

८.३० च्या बसला पुन्हा ती गर्दी झाली
लोकांची पाउले बसच्या दिशेने वळाली..
गर्दीत त्या ढकला - ढकली झाली..
गोंधळलेली त्या गर्दीत मला ती दिसली...

सगळ्यांची घाई जागा पकडण्यासाठी होती
गोंधळलेली ती तिच्याच विचारात होती..
बसची रांग हळूहळू पुढे सरत होती..
माझीही पाउले त्याच बससाठी धडपडत होती..

धक्के - बुक्के खात त्या बस मध्ये मी चढलो
चढताच सर्वत्र तिला मी शोधू लागलो..
अनामिका ती मजपासून दूर पुढे उभी होती..
अंतरावर असली तरी माझ्या नजरेसमोर होती..

निरागस तिचा चेहरा..कोण्या एका विचारात होता..
होतोय गर्दीचा त्रास भाव हे चेहऱ्यावर दर्शवित होता..
बसच्या या राक्षसी गर्दीत..प्रथमच ती आली असावी..
ऐश्वर्य अन लाडात कदाचित ती मोठी झालेली असावी..

नजर माझी एकटक तिच्यावरच खिळली होती
पण गर्दीत त्या नजर काही आमुची मिळत नव्हती..
एकटक नजरेने लक्ष तिचे माझ्याकडे वेधले..
तिचा कटाक्ष माझ्याकडे पडताच..ओठी हास्याचे फुल माझ्या खिलले..

काही मिनटांची ओळख जुन्या मैत्री सारखी वाटत होती
नव्हते ठाऊक कधी अनोळखी वर प्रीत माझी जडली होती..
आज या ओळखीस पुढे मला न्यायचे होते
त्या अनामिके सोबत सारे आयुष्य मला घालवायचे होते..

सुखाची ती स्वप्ने काही काळापुरती होती
जेव्हा पाउले तिची उतरण्यासाठी पुढे सरत होती..
उतरताना तिने मजकडे मागे वळूनी पहिले
वेडे मन माझे तिच्या प्रेमातच वाहिले..

रोज मी वेडा असा त्याच बसला असतो
आज तरी येईल ती याचीच वाट पाहत असतो
अनामिकेशी ती भेट त्या दिवसापुरती होती..
प्रेमाची माझी गोष्ट सुरु होण्याआधीच संपली होती...गोष्ट सुरु होण्याआधीच संपली होती...
----------------शिरीष सप्रे(२८-८-२०१०)----------------

Wednesday, August 25, 2010

तू नसताना पाऊस का येतो...

तू नसताना पाऊस का येतो...
आठवणींच्या शिदोरीला माझ्या
हसत तो भिजवुनी जातो..

तू नसताना पाऊस का येतो...
डोळ्यातुनी ओघळणाऱ्या अश्रूला
सरींच्या सोबत घेउनी जातो..

तू नसताना पाऊस का येतो...
दिवसा पाहणार्या स्वप्नांना डोळ्यांदेखत
काळ्या ढगात लपवूनी जातो..

तू नसताना पाऊस का येतो...
रस्त्यावरील तुझ्या पाऊल खुणांना
सहजरीत्या मिटवूनी जातो..

तू नसताना पाऊस का येतो...
तुझ्या जवळी येणाऱ्या मार्गाला
डोळ्यांदेखत धूसर करतो..

तू नसताना पाऊस का येतो...
पावसात अश्रू ढाळणार्याची
बरसुनी तो मजा घेउनी जातो...

तू नसताना पाऊस का येतो...
पडणाऱ्या त्या प्रत्येक थेंबात
तुझाच चेहरा शोधायचा प्रयत्न मी करतो...चेहरा शोधायचा प्रयत्न मी करतो...
----------------शिरीष सप्रे(२४-०८-२०१०)--------------------

Wednesday, August 18, 2010

आज माझे पाकीट हरवले...

आज माझे पाकीट हरवले
.
.
.
होते थोडे फार पैसे
काही माझे कार्डस होते..
त्यात फर्स्टक्लास चा पास ही होता
आणि काही चिटोरे होते...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
सोबत हरवला तो फोटो
आपण एकत्र काढला होता
हरवला तो एक कागद ज्यावर
तुझ्या प्रेमाचा कबुलीजबाब होता...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
हरवली ती सारी तिकिटे
एकत्रित आपण जेथे प्रवास केला होता...
अन त्या तिकीटावरही तू
हसत हिशोब मांडला होता...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
हरवली ती गुलाबाची पाकळी
जे फुल तुला मी दिले होते..
माझ्याशी अखेरचा निरोप घेताना
फुल ते हसत परत केले होते...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
हरवला तो कागद सोबत
ज्यावर तुझ्यासाठी काही कविता केल्या होत्या
होत्या वाचून दाखवायच्या तुला एकदा
पण कवितांना त्या अर्थ राहिला नव्हता...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
हरवले ते पत्र सोबत
कधी काळी तुला लिहिले होते..
प्रेमाचे शब्द ऐकण्या अगोदर..
शब्दांनाही तू नाकारले होते...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
होता तुझा एक फोटो
ज्याच्याशी माझा संवाद असायचा
तुजवरील प्रेम ऐकताना
फोटोही कधीतरी लपून रडायचा...

आज माझे पाकीट हरवले...
.
.
.
हरवल्या त्या आठवणी सार्या
ज्यांच्या आधारे मी जगत होतो..
मिळाले पाकीट तर द्या हो पुन्हा मला
आठवणींविना त्या मी अधुरा होतो....मी अधुरा होतो...
------------शिरीष सप्रे(१८-८-२०१०)-----------------

एका पाण्याच्या थेंबासाठी तहानलेला...

मित्रानो सारे प्रेम करतात...काही नशीबवान असतात ज्यांना त्यांचे प्रेम मिळते...आणि काही प्रेमाच्या शोधात असतात...अशाच एका प्रेमापासून दुरावलेल्या प्रेमीची व्यथा कि ब्रेकअप नंतर कसे सारे बदलत जाते......


हसत खेळत तो असायचा
सुखानं जगात वावरायचा
ब्रेकअप च्या दिवसापासून तो
नैराश्याच्या घरात राहायचा...

कामासाठी तो धडपडायचा
ऑफिसात सदा वेळेत असायचा
ब्रेकअप च्या दिवसापासून तो
वेळेशी त्याचा ताळ-मेळ नसायचा...

मित्रांमध्ये वेळ घालवायचा
स्वताची सर्वांत छाप पाडायचा
ब्रेकअप च्या दिवसापासून तो
स्वताच्या अस्तित्वाच्या शोधात असायचा...

घोळक्यात सर्वात उठून दिसायचा
इतरांना ही हवाहवासा वाटायचा
ब्रेकअप च्या दिवसापासून तो
गर्दीत हरवलेला असायचा...

मैत्री त्याची सर्वांपेक्षा न्यारी
मदतीसाठी सदा पुढे असायचा
ब्रेकअप च्या दिवसापासून तो
स्वताच्या मदतीसाठी धावा करायचा...

आजही तो असा हरवलेला
सुखापासून सध्या दुरावलेला
आहे सारा समुद्र जवळी त्याच्या
तरीही एका पाण्याच्या थेंबासाठी तहानलेला....पाण्याच्या थेंबासाठी तहानलेला...
-------------शिरीष सप्रे(१८-८-२०१०)----------------

Friday, August 13, 2010

स्वताला सिद्ध तू कर...

डोंगरांमागे सूर्य तो मावळताना
आज काहीतरी खुणावत राहील ..
जाता जाता भरलेला विषाचा
पेला तो बोलवत राहील ...

तिची वाट पाहण्यापेक्षा वेड्या
घसा तुझा ओला तू करशील..
आहे माहित ती येणार नसल्याची
दारूचा पेला तू खलास करशील...

तिच्या आठवणीत रडण्यापेक्षा
नशेत स्वताला हसते करशील..
स्वताच्या चुकीवर हसुनी तू आज..
दारूचा पेला तू खलास करशील...
.
.
.
पण

प्रेम प्रेम घेउनी काय रडतो
स्वतावर आत्ता तू प्रेम कर
खूप केले दुसर्यांसाठी आजवर..
स्वतासाठी जग तू क्षणभर..

तिच्यासाठी रोज झुरण्यापेक्षा
स्वतासाठी तू जगायचा प्रयत्न कर
खूप बाकी आहे आयुष्यात अजुनी
दारूचा पेला तू खलास कर...

आज रडत आलास इथे
शेवटचे तुझे येणे होते
प्यायलास दुखाचे औषध हे
अन शेवटचे तुझे रडणे होते...

उद्या सूर्य उगवताना
नवीन पहाट आणणार आहे...
दारूच्या नशेतील बेधुंद तू..
पुढील आयुष्याचा विचार करणार आहेस..

नवीन पहाट नवीन दिशा
नवी उमेद घेउनी सुरुवात तू कर..
आहेस तुही कर्तबगार असा...
आज स्वताला सिद्ध तू कर....स्वताला सिद्ध तू कर...
--------------शिरीष सप्रे(१३-०८-२०१०)------------------

Thursday, August 12, 2010

खरच कुणीतरी असावे असे..

कुणीतरी असावे असे..
मनातील विचार ओळखणारे..

कुणातरी असावे असे..
ओठांवरी नाव येणारे..

कुणीतरी असावे असे..
डोळ्यातील प्रेम पाहणारे..

कुणातरी असावे असे..
प्रेमाचे गीत ऐकवणारे..

कुणीतरी असावे असे..
बेरंगी जीवनात रंग उधळणारे..

कुणातरी असावे असे..
स्वप्नात येउनी सतावणारे..

कुणीतरी असावे असे..
दिवसाच्या प्रारंभी पहिला विचार बनणारे..

कुणातरी असावे असे..
दुखात सुख बनुनी येणारे..

कुणीतरी असावे असे..
ओठी हास्य उमलवणारे..

कुणीतरी असावे असे..
आयुष्यभराचा हाथ पकडणारे..

कुणीतरी असावे असे..
वचनांची पूर्तता करणारे..

कुणीतरी असावे असे..
कळीचे फुल खिलवणारे..

खरच कुणीतरी असावे असे..
माझ्यासाठीही जगणारे...माझ्यावरी प्रेम करणारे...
------------शिरीष सप्रे(१२-८-२०१०)------------

Wednesday, August 4, 2010

आठवतात का तिला त्या आठवणी..

आले नभ भरुनी ..
दाटतात त्या आठवणी ..

पावसाच्या त्या थेंबात
दिसतात त्या आठवणी...

डोळ्यात अश्रू बनुनी
उभे राहतात त्या आठवणी...

दिवसाच्या त्या प्रारंभास
पहिला विचार बनतात त्या आठवणी...

रात्रीच्या त्या काळोखात
जागवतात त्या आठवणी...

कामाच्या त्या ओघात
सतावितात त्या आठवणी...

चहाच्या त्या वाफेतही
दरवळतात त्या आठवणी...

दारूच्या त्या नशेतही
धुंदावितात त्या आठवणी...

पाहत आहे वाट अजूनही तिची...
पण...आठवतात का तिला त्या आठवणी.....?...आठवतात का तिला त्या आठवणी.....
----------------शिरीष सप्रे(४-८-२०१०)-----------------------