Tuesday, July 27, 2010

पावसात जेव्हा तीही कोणासाठी तरी रडेल....

उल्हासित होते मन सर्वांचे
वर्ष ऋतूच्या आगमनाने
चातकाची ही तहान भागते
येणाऱ्या पावसाच्या त्या सरीने

झाडानाही नवीन पालवी येते
नवीन आयुष्याची संधी देते
मातीही ती सुगंधित होते
वर्षा ऋतूचे जेव्हा आगमन होते

असतो एक चालत पावसात त्या
एकांतात अन आपुल्या विचारात
नाही भान जगाचे त्याला नाही स्वतचे
कोणास ठाऊक आहे जगत तो कोणत्या जगात..

चुकांचे तिच्या खापर त्याने
स्वताच्या माथी आनंदाने फोडले
सुखाला तिच्या दारी पोहचवता
डोळ्यांनी रक्ताचे अश्रू ते ढाळले,,

भर पावसात चालतो तो एकटा
लपवूनी चेहरा जगापासून स्वताचा
दुख ते पाहण्यास वेळ कोणाकडे असते
पावसाच्या सरींत अश्रूंनाही किंमत नसते..

रडशील किती अजुनी तू रे वेड्या
आहे सुखी ती.. तोड तू स्वताच्या बेड्या
तुझ्या प्रेमाची किंमत एकदा तिला कळेल
भर पावसात जेव्हा तीही कोणासाठी तरी रडेल....कोणासाठी तरी रडेल...
---------------शिरीष सप्रे(२७-७-२०१०)--------------

Monday, July 19, 2010

बाबाही आपुले मित्र असतात..

मनात विचाराचे वादळ असे
डोळ्यात अश्रू दाटुनी उभे
सांगावे कोणाला समजेनासे झाले
या दुखातुनी बाहेर यावे कसे..

उदासी नैराश्य एकदम आले
हासर्या चेहर्याला रडवूनी गेले
हास्य चेहऱ्यावरचे नाहीसे झाले
एकटेपणाचे घर मी गाठले..

अचानक एक हाक कानावरी आली
अंधारी जीवनातूनी बाहेर काढणारी
हताश मनासी एक सामर्थ्य देणारी
उदास चेहर्यावरी हास्य उमलवणारी ...

होती हाक ती मैत्रीसाठी त्यांची
कधी न ऐकली मी गोष्ट ज्यांची
भुलवुनी चुका माझ्या सार्या
बाबांनी केली होती मैत्री माझ्यासाठी

नैराश्यात हाथ देऊनी बाहेर त्यांनी काढले
भूतकाळातील चुकांनी डोळ्यात अश्रू दाटले
ना मित्र ना मैत्रिणी कोणी कामासी आले
आज माझ्या बाबांनीच मजसी वाचवले..

चेहऱ्यावर माझ्या हास्य उमलले
नैराश्याचे जाळे ते सारे फिटले..
हताश मनासी पुन्हा एकदा
लढा देण्यासी सामर्थ्य त्यांनी दिले

जन्मदाते शेवटी आपलेच असतात
भले आपले व्हावे याच विचारात असतात
नका दुखावू त्यांसी तुम्ही कधी
बाबाही आपुले चांगले मित्र असतात...चांगले मित्र असतात...
--------------शिरीष सप्रे(१८-७-२०१०)-----------------------

Monday, July 5, 2010

आहेच मी तुझा जन्मो-जन्मांसाठी...

मीच सगळीकडे कमी पडतो..
कोणी नाही तर तूच दाखवुनी दिले मला,
बोलतेस आहे मजवरी विश्वास जास्त तुझा ..
पण ठेवत तर नाही तो खरा...

होता स्वतावरी विश्वास
म्हणुनी तुला इथे आणले...
होता सगळ्याचा विरोध याला
तरीही या घराची तुला मी केले...

सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करताना..
तुझ्या अपेक्षेचा भंग होतो..
कळते मला हि गोष्ट तुझी
घडते असे कि मीही खूप दुखावतो...

हाथ पकडला आहे तुझा मी..
तुला साथ देण्यासाठी...
नाही सोडणार साथ तुझा मी प्रिये..
आहेच मी तुझा जन्मो-जन्मांसाठी...जन्मो-जन्मांसाठी....

-----------शिरीष सप्रे(१६-१-२०१०)-----------------

प्रत्येक सेकंद..वर्षासारखा वाटत आहे..

बोलतोस मला तू..
आहे श्वासाच्या एका अंतरावर..
जाणवत नाही गंध तुझा
असलास जरी तू त्या रोमांचावर...

ठेवला होता हाथ मी..
होते ते क्षण असे...
जाववत नव्हते मला हि दूर..
पण जाणे मला भाग होते..

तुझी श्रद्धा तुझी भक्ती..
यावरच मी जिवंत आहे..
घेतलेस समजून मला तू..
तुझ्या पापनीतील अश्रू ते..
अजून माझ्या ओंजळीत आहे..

ये तू लवकर आत्ता..
जगणे कठीण होत आहे..
जाणारा तो प्रत्येक सेकंद..
एका वर्षासारखा वाटत आहे..वर्षासारखा वाटत आहे......!

--------------शिरीष सप्रे (२२-१-२०१०)------------------

चंद्र - तार्यांची साथ...

चंद्र - तार्यांची साथ हि,
असे रात्री पुरती...
आहे आपुले प्रेम जन्मो-जन्मीचे
नाही अवलंबुनी ते अंधारावरती...

सहवास हा आपला
जपला आहे माझ्या श्वासात...
नाही तुटू देणार तुला मी
मीही सामावले आहे त्याच्यात...

असतील तारे अवलंबुनी ते
त्या निशेवरती..तसेच
आहे अस्तित्व माझे हि सख्या
अवल्म्बुनी तुझ्या अस्तित्वावरती...

ठेवले आहे तुझ्या जागी स्वताला मी आत्ता
नाही होऊ देणार त्रास तुला कधी..
सोसला आहेस जो तू माझ्याकरता......
---------शिरीष सप्रे (१२-१-२०१०)-----------

Sunday, July 4, 2010

आई-बाबा तुमच्या चरणी....

आपण लहानाचे मोठे होतो पण अनेकदा आपण कडून अशा चुका होतात कि त्यामुळे आपल्या आई-वडिलांना मान खाली घालावी लागते...या चुका पुन्हा होणार नाही आणि या मातृपित्यांची मान खाली जाणार नाही...ही कविता त्या चुकांची माफी मागून.....शिरीष


दिले अस्तित्व मजसी तुम्ही
लहानचे ते मोठे केले,
काढुनी चिमटे पोटाला स्वताच्या
पोट माझे सदा भरले..

घालूनी चादर चुकांवर माझ्या
योग्य मार्गाचे मार्गदर्शन केले
येणाऱ्या संकटांची चाहूल भासताच
संकटाना त्या स्वतावर तुम्ही ओढविले..

मायेच्या त्या छत्रछायेत तुमच्या
सदा तुम्ही मला जपिले,
दुखाच्या झळीला न पोहचू दिले
सदा सुख माझ्यावर बरसविले..

प्रेमाची ती माया तुमची
कधी न मी जाणली..
तोडूनी मायेला तुमच्या सदा
दुख फक्त मी तुम्हाला दिली..

ठेवतो माथे माझे मी
आई-बाबा तुमच्या चरणी
केल्या आहेत चुका आजवरी फार
भुलवुनी आज सारे द्या मजसी माफी..

माझ्या चुकांमुळे पुन्हा कधी
डोळ्यात पाणी येऊ देणार नाही
होईल गर्व तुम्हाला ही एकदा
शरमेने मान खाली जाऊ देणार नाही.....मान खाली जाऊ देणार नाही...
-----------------शिरीष सप्रे(४-७-२०१०)----------------

Saturday, July 3, 2010

अस्थिंवर माझ्या तुझेच नाव दिसले...

नाही किंमत माझ्या शब्दांची ..
न मी केलेल्या प्रेमाची..

नाही किंमत माझ्या त्या अश्रूंची..
न मी रडलेल्या रात्रींची..

नाही किंमत माझ्या बोलीची.
न प्रेमाने मारलेल्या त्या हाकेची..

नाही किंमत तुला माझ्या वेळेची..
वाट पाहत राहिलेल्या त्या दिवसांची..

विसरलो होतो जगणे स्वतासाठी..
अन जगलो फक्त तुझ्या हास्यासाठी..

कशी ग तू अशी बनलीस स्वार्थी..
अन विसरलीस केले होतेस प्रेम माझ्यावरती..

सहज पणे नाही म्हणुनी गेलीस
डोळ्यात अश्रू आणुनी गेलीस..

प्रेमाला माझ्या असे धुडकाविले
हृदयाचे ठोके तिथेच थांबिले...

खर्या प्रेमिला या वेडे तू ठरविले...
या प्रेमी वेड्याने तुझेच नाव जपिले ..

एका हास्यासाठी स्वताला संपविले
अस्थिंवर माझ्या तुझेच नाव दिसले...अस्थिंवर माझ्या तुझेच नाव दिसले..
----------------शिरीष सप्रे(३-७-२०१०)---------------------