Monday, December 14, 2015

लेखणीस हि त्या, पूर्ववत धार असेल…!

आज स्वताचा ब्लॉग वाचताना वाटले, खूप काही मी भुलवले आहे. कामाच्या ओघात इतका वाहत गेलो कि, लिहायला हि मी विसरलो आहे. खूप काही विचारानंतर पुन्हा लिहायचा प्रयत्न करत अहे. बघू शब्दांची सांगड कितपत जमलीये ते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज तो…ती संध्याकाळ…कोणा एक विचार
मेळ शब्दांचे जणू …आज काही बसत नव्हते
लिहावयाचे होते बरेच काही असे
शब्द रेखाटण्यास हाथ धजत नव्हते…!

होते लिहिलेले गतकाळी खूप काही
विसर आज त्या साऱ्याचा पडला होता
होती धारेधार लेखणी त्याची अशी जणू
आज बोथट कलमाने शब्द गिरवत होता…!

होती अपेक्षा सर्वांसी अशी तेव्हा
कवितांचा अथांग सागर तो भरेल
गेला वाहत काळाच्या ओघात असा
आज एक एक शब्द मांडण्यास तो धडपडेल…!

काहूर विचारांचे मनी असे
हृदयी दुख लपवले होते
न मांडले सुख दुखास कधी
शब्द आज सारे हरवले होते…!

उलगडले कोडे आज त्यांचे असे
कवितेचा विचार मनी चटका लावूनी गेला
अस्तित्व शोधण्यास स्वताचे आज तो
शब्दांशी पुनः तडजोड करू लागला…!

लिखाण्याच्या त्या शैलीवरी त्याच्या
विश्वास, आज हि हृदयी ठाम आहे
ओहोटी ने कोरड पडलेल्या सागरास
भरतीची लाट उसळायची आस आहे…!

खवळेल तो अथांग सागर पुन्हा
अशांत असे रुद्र रूप असेल,
नांदतील शब्द पुनः त्याचे कागदी
लेखणीस हि त्या, पूर्ववत धार असेल…पूर्ववत धार असेल…!
--------------- शिरीष सप्रे (१४-१२-२०१५)--------------------