Thursday, August 22, 2013

पहिली अन शेवटची भेट आमुची ..!

शब्दांचे फक्त बोलणे
आवाजाचे ते ऐकणे
भावना मनातील समजुनी
चित्र आपल्या हृदयी कोरणे...

एका भेटीची ओढ आम्हास
काळापासुनी लागलेली
नियतीस नव्हती मान्य ती
आशा मनो मनी दबलेली ...

तुमच्या मनातील अबोल भावना
डायरीत अन बाप्पास माहिती होत्या
होता प्रयत्न अमुचा जाणायाच्या  त्या
प्रयत्न आमुचा कमी पडत होता...

मी संग्राम अन तू देवयानी असे
अनोखे नाते नकळत जुळले
बोल त्या मालीकेसारखे असे
नकळत मनही त्याति गुंतले...

संग्राम-देवयानी गोड भेटीचा
दिवस  अखेर तो उजाडला
आसुसले मन त्या भेटीसाठी
हर एक क्षण युगासारखा सलला...

भीती, निराशा, अन आनंद
काहूर विचारांचे मनात होते
जवळ येत होती भेटीची वेळ
मनही त्या नजरेस आतुरले होते ...

विले-पार्ले स्थानकावरी आमुची
नजर एका मेकास मिळाली
क्षणात आठवल्या सार्या गोष्टी
मनात आसवांची साठवण झाली ...

वेळेचे भान आम्हा दोघासही
आज काही उरले नव्हते
दाटल्या होत्या भावना सार्या
आज फक्त तिलाच ऐकायचे होते ...

दोन-तीन तासांची भेट आमुची
जन्मो जन्माची जणू वाटत होती
झटपट घड्याळातील काटा सरकत होता
निरोपास मात्र आमुची तयारी नव्हती...

अखेर निरोपाचा क्षण असा
कर्दन काळासारखा उभा राहिला
वचन दिले होते एका-मेकास तरीही
आसवांचा पाउस निरोपी बरसला ...

कधी तुझ्या पुढे मी बाप्पा
एकही गोष्ट ना मागितली
आज पसरतो हाथ तुजपुढे
तिची ख़ुशी हीच इच्छा मनी राहिली...

पहिली अन शेवटची भेट आमुची
हृदयावरी कोरुनि ठेवली
होत्या वाटा आमुच्या वेगळ्या तरीही
देवयानी-संग्राम  नात्याची……गाठ अतूट रहिलि…
---------------शिरीष सप्रे (२२-०८-२०१३)--------------             

Sunday, August 4, 2013

तो बिअर बार..!

वेटर ओर एक बॉटल लाना ।
.
.
शेवटचा घोट संपवत
नव्या बाटलीची फर्माईश केली
डोळ्यात होते अश्रू दाटलेले
 दारूची नशा होती आसवात साचलेली..
 

कोणते दुख मनात माझ्या होते
ज्यासाठी घोट दारूचे लागत होते
रोज दिवसा अखेर होताच क्षणी
पाउले त्या बार कडे वळत होते ..

एका हाथी जळती सिगारेट
होता दुसऱ्या हाथी दारूचा प्याला
झुरके सोडत घोट घेत होतो मी
अन दुखाचा आवंढा होता गिळलेला..

सदा हसत खेळत राहणारा
मन मिळाऊ स्वभावाचा होतो असा
अनोळख्या कोणत्याही व्यक्तीच्या
मनात असायचा माझा  वसा ..

मदतीस तत्पर सदा मी
सहकार्यास  पुढाकार असायचा
होती छबी निराळी माझी अशी
हर एकास मी आपलासा वाटायचा..

एकांत पणाच्या विळख्यात मी
अशा रीतीने अडकलो होतो
असलो चालत या गर्दीत जरीही
स्वतासी आज मी शोधत होतो ..

चटक ती दारूची अशी
या शरीरास लागली होती
होते समजत मजला कि
दारू आज मजसी  पीत होती ..

नैराश्याने माझ्या मनास आज
असे जणू जखडले होते
वैयक्तिक जीवनाच्या उलाढालीत
त्या बिअर बार ला आपलेसे केले होते..

नव्या उमेदीने लढतात सारे कसे
स्वत मी जवळुनी पहिले होते
असेल इच्छा मनाची जर प्रबळ
येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने मग होते..

 विषाचे ते प्याले मी पीत होतो
समजुनी या मनास उमजले नाही
असेल तो बार तिथेच नसलो मी जरी
पण सुखद क्षण  सोबत माझ्या राहणार नाही..

दुसर्या बाटलीतील शेवटचा घोट घेत
अखेर जीवनाचा आवंढा मी गिळला
मिळाली होती मुक्ती मजला आज
सिगारेटच्या धुरा सोबत, दिवा आयुष्याचा विझला..

होत आहे पश्चाताप या मनासी आज
पुन्हा एकदा लढायला हवे होते
आहे तो बिअर बार आजही तिथेच
पण आयुष्यातील सुंदर क्षणात .. पुन्हा एकदा जगायला हवे होते…
-------------शिरीष सप्रे(४ - ०८ - २०१३)------------------