Wednesday, September 22, 2010

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
चहा वाला पाहून हसला
"बहोत दिनो के बाद साहब" म्हणुनी पुसले..
खूप दिवसांनी का होईना,
चेहरा माझा त्याने ओळखला...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
दुकान त्याचे तसेच होते,
चहाचे ग्लास हि तेच होते
आहेस तू हि माझ्याबरोबर
भास हे मला होत होते...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
पावसाची ती सर लागली होती,
चहा पिणार्यांची ती गर्दी होती..
मी हि एका आडोशाला होतो
गर्दीत त्या तुला शोधत होतो...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
सिगारेटचे झुरके कोण सोडत होते
कोणी सिगारेट शिलगावत होते...
सिगारेट घ्यायला पाऊले माझी जात होती..
पण तेव्हा मला अडवणारी मात्र तू नव्हती...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
चहाचा आस्वाद घेणारे सारे होते,
सुरके मारत सारे चहा पीत होते
वाफाळत्या चहाचा ग्लास माझ्या हाती होता,
चहाच्या त्या वाफेतही तुझ्याच गंधाचा भास होता...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
आपले बाकडे हि तसेच होते
नाव ज्यावर आपण कोरले होते..
बाकड्यावर त्या आज मी एकटा होतो,
येशील तू कधीतरी याचीच स्वप्ने पाहत होतो...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
चहाचे पैसे पुढे देण्यास गेलो
" मेडम नही आज..? " या प्रश्नाला ना उत्तरलो..
डोळे माझे भलतेच सांगत होते...
नाहीस तू बरोबर चहावाल्यालाही हे कळले होते...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
आठवणीना त्या आपुल्या
पावसात भिजवायला गेलो...
सरीत त्या अश्रुना लपवायला गेलो...
आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
------------शिरीष सप्रे(२२-९-२०१०)------------------

Tuesday, September 21, 2010

जिवंतपणे मला मारुनी गेली...

प्रेमाचे ते शब्द गुंफता गुंफता
शब्दांना त्या अर्थहीन करुनी गेली...

प्रेमाची प्रीत गाता गाता तू
प्रीत ती अबोल करुनी गेली...

उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहताना
डोळ्यांना अश्रूत बुडवुनी गेली...

नव्या दिवसाची वाट पाहत असताना
काळाला तिथेच थांबवूनी गेली...

आशेचा किरण जीवनात पाहताना
जीवनच अंधारमय करुनी गेली...

सात जन्माचे वचन देता देता
पहिलेच वचन तोडूनी गेली...

चंद्रात तुझा चेहरा पाहत असताना
अमावस्या आकाशी करुनी गेली...

सुखाची कुठे चाहूल लागत असताना
दुखाचे वार मजवरी करुनी गेली...

परतफेड माझ्या प्रेमाची करुनी तू
जिवंतपणे मला मारुनी गेली...जिवंतपणे मला मारुनी गेली...
------------शिरीष सप्रे(२१-९-२०१०)-------------

Monday, September 20, 2010

गीत हे गातील वारे...

प्रेमाचे आपुल्या वाहतील झरे
प्रेमाचा आस्वाद घेतील सारे
प्रेमाला जेव्हा समजतील सारे
प्रेमाचे गीत हे तेव्हा गातील वारे...

विरोधकांसाठी बंद होतील द्वारे
जेव्हा प्रेमासाठी खुलतील द्वारे
प्रेमाच्या दुनियेत राहतील सारे
अन प्रेमाचे गीत हे गातील वारे...

प्रेमाचा गंध दरवळेल वातावरणी
गंध प्रेमाचा अनुभवतील सारे..
शत्रूत्वास आज विसरतील सारे
प्रेमाचे गीत जेव्हा गातील वारे...

शत्रूत्वास या कोणीही न पुसले
प्रेमाचेच पारडे जड सदा दिसले
निस्वार्थी प्रेम करूयात सारे
प्रेमाचे गीत हे तेव्हा गातील वारे....

प्रेमाला या सीमा न कुठली
गोष्ट प्रेमाचीच सदा रंगली
करूयात वर्षाव प्रेमाचाच सारे
प्रेमाचे गीत हे तेव्हा गातील वारे....प्रेमाचे गीत हे तेव्हा गातील वारे....
------------शिरीष सप्रे(२०-९-२०१०)---------------

Saturday, September 18, 2010

लाखात एक म्हणुनी ओळखला तू जाणार...

लाखात एक मनुष्य जन्मतो
कष्ट करूनही अपयश मिळवतो
दुखांचा डोंगर सदा सामोरी असतो
सुख या शब्दालाही तो मुकतो....

ओझी दुसर्यांची वाहता वाहता तो
स्वताचे दुख हास्यामागे लपवतो
असते गरज त्यालाही एका साथीची
नसते कोणी तेव्हा..एकांतात तो रडतो....

अस्तित्व स्वताचे शोधण्यासी
जीवाचा आटापिटा तो करतो
व्यर्थ जातात कष्ट सारे सदा त्याचे
अन देवही त्याची मजा घेत असतो...

त्याच्या मुक्या हृदयाचे हुंदके
आज त्याने सांगावे कोणाला
आहे शोधात तोही एका साथीच्या
व्यथा त्या मनाची कळावी कोणाला...

अपयशाच्या खडतर प्रवासात या
यशाचा रस्ता जरूर तुला दिसणार
ठेव जिद्द मनात तू युद्ध हे तू जिंकणार ..
लाखात एक म्हणुनी ओळखला तू जाणार...लाखात एक म्हणुनी ओळखला तू जाणार...
--------------शिरीष सप्रे(१८-९-२०१०)------------------------------

Sunday, September 12, 2010

देवा का तू माझ्याशी वैर केले..

आले आले गणपती आले..
सुख अन समृद्धी घेउनी आले..
मनोकामना पूर्ण करण्यास भक्तांच्या
आशीर्वाद सारे घेउनी आले..

मनोकामना माझी पूर्ण होण्यास
उपास तापास सारे मी केले
देवालाच नको हवे होते सुख माझे
दुर्लक्ष सदा त्याने माझ्या कडे केले...

मंदिरे सारी पालथी घातली
नवसांची ती मी शिखरे गाठली
भक्तांच्या गणनेत मला न मोजले
प्रार्थनेस त्या कधी न पूर्ण केले

तिच्या सुखाचीच मागणी सदा
निस्वार्थी पणे तुझ्याकडे केली
देशील का रे उत्तर देवा मला तू
भक्तांमध्ये माझी गणना का न तू केली..

भक्तास या तू सदा रडवले
समोरच उभा होतो..तरीही न पहिले
जाता जाता एक विचारतो देवा तुला
देवा का तू माझ्याशी वैर केले...का तू माझ्याशी वैर केले...
---------------शिरीष सप्रे(११-९-२०१०)---------------