Thursday, March 11, 2010

आई - तुज्याशी नाही भांडायचे मला..!

अनेकदा आपण अपयश पाहत असताना सर्व राग आपण आपल्या जवळच्या व्यक्तीवर काढतो अन आई वर जास्त आपण राग काढतो..पण तो तर ममतेचा झरा आहे..ते प्रेम कधीच कमी नाही होणार....यावरून केलेली एक कविता....शिरीष सप्रे



आहे मी अजुनी तुझाच..
असा एक लाडका बाळ..
पण आली आहे अशी वेळ मजवर.
कि बदलत आहे माझा काळ..

असाच मी एकटा भटकत असतो..
येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जातो.
नाही सध्या नशिबाची मला साथ..
त्या अपयशाने तुझ्याशी मी भांडत असतो..

नियतीही माझ्या बाजूने नाही..
जाईन जिथे मी..
यशाची पायरी मला
आज सापडत नाही..

येणाऱ्या अपयशाने मी खचतो..
तरीही या अपयशाशी मी लढतो..
अपयशाच्या वाराने घायाळ मी होतो..
रागाने त्या तुझ्याशी मी भांडतो..

प्रेमाची साथ तुझी अजूनही आहे,
अपयशाची बाजू हि आज मोठी आहे,
सांग मला तोंड देऊ कसे अपयशाला..
पण तुज्याशी आई नाही भांडायचे मला..

आज पुन्हा माझ्या या चुकांना
माफ तू कर..
आहे तुझी ममता अजूनही
असेच प्रेम माझ्यावर कर..

तुझ्या या स्वप्नांना आई..
नक्की मी पूर्ण करीन..
येउनी तुझ्या मिठीत एकदा..
मन माझे मोकळे मी करीन..

असे एक वाचन आई देतो तुला..
होणार नाही चूक पुन्हा अशी..
पण तुज्याशी आई नाही भांडायचे मला...आई नाही भांडायचे मला....!

--------------शिरीष सप्रे (२२-२-२०१०)----------------------

1 comment:

  1. कविता वाचल्यावर माझ्या मनातहि एक क्षण असेच काहिसे विचार आले माझ्याकडुन होते अशी चुक..

    ReplyDelete