Thursday, March 11, 2010

स्त्री - तिची रूपं (महिला दिन विशेष)

काढते चिमटे पोटाला स्वताच्या..
बाळाचे पोट ती भरत असते...
मायेच्या छायेत त्याला..
ती वाढवत असते अशी हि..
" आई " असते...

लहानांच्या चुका ती..
स्वतावर घेत असते..
करते त्रास सहन स्वत ती..
लहानांचा आधार ती बनत असते..
अशी ती " ताई " असते..

करते आपल्या कुंकूचे रक्षण..
त्याच्या सुखासाठी ती झटत असते..
ठेवुनी व्रत वट - पौर्णिमेचे ती..
त्याच्या आयुष्याची मागणी देवाकडे करत असते..
अशी ती एक " अर्धांगिनी " असते...

घेते समजुनी आपल्याला ती..
वेळो वेळी आपलीच काळजी असते..
असते सामावलेले गोड हास्य तिचे..
आपल्याच त्या हास्यात..
अशी ती एक " सखी " असते...


खेळवते जी स्वतच्या अंगावर त्यांना..
सांगुनी गोष्टी त्यांना बाळकडू देत असते..
दाखवुनी योग्य मार्ग लहानांना त्या..
प्रेमाचा वर्षाव ती करत असते..
अशी ती एक " आजी " असते..

अशी हि स्त्री
विविध रुपात जगत असते..
करुनी समर्पित आयुष्य आपल्यासाठी..
आपुले आयुष्य ती बहारत असते...बहारत असते...


-------------शिरीष सप्रे(८-३-२०१०)------------

1 comment:

  1. apli kavita mala far avadali. apan aplya kavitechya madhyamatun samajat jagrukata nirman karat ahat. aplya ya karyas shubhechha!

    ReplyDelete