Friday, August 13, 2010

स्वताला सिद्ध तू कर...

डोंगरांमागे सूर्य तो मावळताना
आज काहीतरी खुणावत राहील ..
जाता जाता भरलेला विषाचा
पेला तो बोलवत राहील ...

तिची वाट पाहण्यापेक्षा वेड्या
घसा तुझा ओला तू करशील..
आहे माहित ती येणार नसल्याची
दारूचा पेला तू खलास करशील...

तिच्या आठवणीत रडण्यापेक्षा
नशेत स्वताला हसते करशील..
स्वताच्या चुकीवर हसुनी तू आज..
दारूचा पेला तू खलास करशील...
.
.
.
पण

प्रेम प्रेम घेउनी काय रडतो
स्वतावर आत्ता तू प्रेम कर
खूप केले दुसर्यांसाठी आजवर..
स्वतासाठी जग तू क्षणभर..

तिच्यासाठी रोज झुरण्यापेक्षा
स्वतासाठी तू जगायचा प्रयत्न कर
खूप बाकी आहे आयुष्यात अजुनी
दारूचा पेला तू खलास कर...

आज रडत आलास इथे
शेवटचे तुझे येणे होते
प्यायलास दुखाचे औषध हे
अन शेवटचे तुझे रडणे होते...

उद्या सूर्य उगवताना
नवीन पहाट आणणार आहे...
दारूच्या नशेतील बेधुंद तू..
पुढील आयुष्याचा विचार करणार आहेस..

नवीन पहाट नवीन दिशा
नवी उमेद घेउनी सुरुवात तू कर..
आहेस तुही कर्तबगार असा...
आज स्वताला सिद्ध तू कर....स्वताला सिद्ध तू कर...
--------------शिरीष सप्रे(१३-०८-२०१०)------------------

No comments:

Post a Comment