Tuesday, August 31, 2010

आळस रुपी अस्त्रास पुरुनी उरायचं असत....

ब्रम्हांडी एकदा चर्चा झाली
सार्या देवांची बैठक झाली
आळस अस्त्र सोडूनी धरतीवर
मनुष्यास अद्दल घडविण्यात आली...

आळस अस्त्राचा कहर असा झाला
मनुष्य त्यापुढे हतबल झाला
निद्रे पुढे काही सुचेनासे झाले
पृथ्वीतलावावर आळसाने वर्चस्व गाजवले...

टाळं टाळ करण्याची सुरुवात झाली
तारखा पुढे ढकलण्याची सवय जडली
हातील कामे काही लवकर उरकेना
आळसा पुढे त्यांसी काही सुचेना...

जबाबदारीची जाणीव ती नाहीशी झाली
बेफिकीर पणाने मनुष्याशी मैत्री केली
आळस अजात शत्रूसी दूर न त्याने केले
आज आळसास सर्वात जवळचे त्याने केले...

चुकांची जाणीव होईलही त्याला एकदा
वेळ लागेल निसटुनी हातुनी जेव्हा
आयुष्यात चुकांचे डोंगर पार केले
आळसास जेव्हा जवळी त्याने केले...

उठ मनुष्या तू..झटक आळस आत्ता
आहे हाथी वेळ अजूनही..संधी दवडू नकोस आत्ता
कष्टानेच तर जग सारे जिंकायचं असत
आळस रुपी अस्त्रास पुरुनी उरायचं असत...आळस रुपी अस्त्रास पुरुनी उरायचं असत.......
----------------शिरीष सप्रे(३१-०८-२०१०)-----------------

No comments:

Post a Comment