Sunday, August 29, 2010

बसमधील ती अनामिका ....

८.३० च्या बसला पुन्हा ती गर्दी झाली
लोकांची पाउले बसच्या दिशेने वळाली..
गर्दीत त्या ढकला - ढकली झाली..
गोंधळलेली त्या गर्दीत मला ती दिसली...

सगळ्यांची घाई जागा पकडण्यासाठी होती
गोंधळलेली ती तिच्याच विचारात होती..
बसची रांग हळूहळू पुढे सरत होती..
माझीही पाउले त्याच बससाठी धडपडत होती..

धक्के - बुक्के खात त्या बस मध्ये मी चढलो
चढताच सर्वत्र तिला मी शोधू लागलो..
अनामिका ती मजपासून दूर पुढे उभी होती..
अंतरावर असली तरी माझ्या नजरेसमोर होती..

निरागस तिचा चेहरा..कोण्या एका विचारात होता..
होतोय गर्दीचा त्रास भाव हे चेहऱ्यावर दर्शवित होता..
बसच्या या राक्षसी गर्दीत..प्रथमच ती आली असावी..
ऐश्वर्य अन लाडात कदाचित ती मोठी झालेली असावी..

नजर माझी एकटक तिच्यावरच खिळली होती
पण गर्दीत त्या नजर काही आमुची मिळत नव्हती..
एकटक नजरेने लक्ष तिचे माझ्याकडे वेधले..
तिचा कटाक्ष माझ्याकडे पडताच..ओठी हास्याचे फुल माझ्या खिलले..

काही मिनटांची ओळख जुन्या मैत्री सारखी वाटत होती
नव्हते ठाऊक कधी अनोळखी वर प्रीत माझी जडली होती..
आज या ओळखीस पुढे मला न्यायचे होते
त्या अनामिके सोबत सारे आयुष्य मला घालवायचे होते..

सुखाची ती स्वप्ने काही काळापुरती होती
जेव्हा पाउले तिची उतरण्यासाठी पुढे सरत होती..
उतरताना तिने मजकडे मागे वळूनी पहिले
वेडे मन माझे तिच्या प्रेमातच वाहिले..

रोज मी वेडा असा त्याच बसला असतो
आज तरी येईल ती याचीच वाट पाहत असतो
अनामिकेशी ती भेट त्या दिवसापुरती होती..
प्रेमाची माझी गोष्ट सुरु होण्याआधीच संपली होती...गोष्ट सुरु होण्याआधीच संपली होती...
----------------शिरीष सप्रे(२८-८-२०१०)----------------

No comments:

Post a Comment