Wednesday, May 19, 2010

एका गुन्ह्याची शिक्षा -----------

२३ एप्रिल २०१० , तो आलाच नाही.रोज जो माझ्या ट्रेन मध्ये असायचा,त्याची जागा मी पकडून ठेवायचो.आम्ही एकत्रच ऑफिस ला जायचो आणि माझी होणारी वाहिनी सुद्धा दिसली नाही.खूप दिवस झाले तो आलाच नाही.त्याचा फोन हि लागत नव्हता.
श्रीकांत नाव त्याचे, उंच ,देखणा चांगली शरीर यष्टी ,हसरा चेहरा त्याचे रूप असे होते कि एक वेगळी प्रतिमा लोकांवर पडायची.त्याचे बोलणे अन तो मन - मिळाऊ स्वभाव तसेच तो कविता हि करायचा. रोज मला एक कविता वाचून दाखवायचा. तो आणि त्याची होणारी बायको दोघे हि एकाच ट्रेन ने जायचे. ती हि दिसायला सुंदर होती, म्हणतात ना लक्ष्मी - नारायण ची जोडी तशी गोड जोडी होती त्यांची.खूप प्रेम तो तिच्यावर करायचा.रोज मला एक त्याची स्वप्न, लग्नानंतर चे प्लान्स सांगायचा.कधी कधी मला हि त्याचा हेवा वाटायचा कि खरच असे कोणतरी सोबत असावे आपल्याबरोबर जसे श्रीकांत च्या जवळ होते. आमची ओळख तशी ट्रेन मधलीच अन दोघांचे ऑफिस एकाच इमारतीत होते त्यामुळे ओळख तशी चांगलीच झाली होती. ८-२० ची फास्ट ट्रेन म्हणजे आमचा भेटायचा वेळ ते १० पर्यंत अन जाताना सुद्धा तीच खोपोली लोकल. दिवसभराच्या या प्रवासात मी एक चांगला मित्र नक्कीच कमावला होता. श्रीकांत एका सोफ्टवेअर कंपनी मध्ये कामाला होता अन राजश्री (श्रीकांत ची होणारी बायको) ती एक व्यवसायाने आर्कीटेक्ट होती अन ती कुलाबा ला काम करायची. ते दोघेही ३ वर्षापासून एकत्र होते अन त्या वर्षात श्रीकांत ने तिच्याशी लग्न करायचे ठरवले होते.तसे तिलाही तो खूप आवडायचा, माझी आन श्रीकांत ची ओळख १ वर्ष जुनी होती. कधी कधी आम्ही तिघे हि हॉटेल मध्ये जेवायला किवा पिक्चर ला जायचो. त्यांना असे आनंदी बघताना मनात असे वाटायचे कि खरच या दोघांना कोणाची हि नजर न लागो.
१ जानेवारी २०१० ला त्याने मला एक अंगठी दाखवली, ती अंगठी नव वर्षाची भेट म्हणून राजश्री ला द्यायची होती. मी त्याला म्हटले आज चांगला दिवस आहे ती पण खुश होईल तू आजच दे, तर तो म्हणाला कि ती तिच्या
परिवारासोबत बाहेर गेली आहे. ती आल्यावर देईन.पण नशीब ते नाव वर्षात त्याच्या बाजूने नव्हते. मला ती गोष्ट पूर्ण माहिती नाही पण २-३ दिवसानंतर त्यांचे खूप भांडण झाले, त्यात असे कळले कि ती तिच्या कोलेज मधील मुलगा त्याच्या घरी गेली होती, मला तेव्हा काही कळलेच नाही. काही दिवसांनी श्रीकांत ने आपणहून सांगितले, कदाचित त्याला त्याचे मन हलके करायचे होते, तेव्हा असे कळले कि तिच्या कोलेज मधील एक मुलगा होता अन
दोघांच्या घराचे एक - मेकाना ओळखायचे.अन तिच्या मोठ्या बहिणीला त्यांचे लग्न व्हावे असे वाटत होते, हा सगळा भूतकाळ त्याला माहिती होता अन त्या परीस्थित त्याने तिला आपले केले होते पण अचानक या गोष्टी मुळे तो जरा तुटला होता.तेव्हा त्याच्याशी बोलताना असे कळले कि भूतकाळातील त्या मुलाच्या घरच्यांना राजश्री कडून खूप अपेक्षा होत्या अन ते आपली सून समजून चालत होते, राजश्री ला मात्र तो आवडत नव्हता कारण जेव्हा जेव्हा तिला गरज होती तेव्हा तेव्हा श्रीकांत असायचा तिच्या सार्या अपेक्षा म्हणा किवा एकटेपणा म्हणा ते सारे श्रीकांत ने दूर केले होते, पण आज अचानक तो भूतकाळ वर्तमान बनून सामोरी आला. श्रीकांत ला वाटले कि हीच वेळ आहे आता राजश्री च्या घरच्यांना मागणी घालायची, कारण इतके जुने प्रेम त्याला विसरणे सोपे नव्हते, आज त्याच्या प्रत्येक गोष्टीत ती सामावलेली होती, अन तिच्याशिवाय जगणे आज मात्र त्याला मान्य नव्हते. तो नेहमी म्हणायचं असे प्रेम करावे कि गेल्यानंतरही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपली नजर सोडून जावे. त्याने राजश्री च्या
घरच्यांना विश्वासात घायचा प्रयत्न केला, राजश्री ला दोन मोठ्या बहिणी होत्या त्याने आळी पाळीने दोघींना भेटला अन आपले प्रेम व्यक्त केले, पण त्यात त्याच्या हातही निराशा आळी, दोघींनी हि आपली मते त्याला वैभव (राजश्री च्या भूतकाळातील मुलगा) याच्या बाजूने मांडली.तो विनवण्या करू लागला कि मला एकदा संधी द्या मी खुश ठेवीन तुमच्या बहिणीला पण तरीही त्याने त्याचे काही हि ऐकले नाही. श्रीकांत ला असे वाटू लागले कि कोण नसले तरी राजश्री त्याच्या बाजूने आहे अन याच एका आधारावर तो लढत होता.
२३ मार्च २०१० राजश्री च्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस, ती घरी असल्याने श्रीकांत अन राजश्री चे काहीच बोलणे नाही झाले, पण दुसर्या दिवशी आपण भेटणार हे माहिती असल्याने तो शांत होता,मधल्या काळात राजश्री
चे वागणे देखील बदलले होते, श्रीकांत त्यामुळे खूप काळजीत असायचा,२४ तारखेला नेहमी प्रमाणे तो तिच्या घराजवळ उभा राहिला ती येण्याची वाट बघत, ती आलि...तिला येताना पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली..ती एकटी नव्हती तर सोबत वैभव होता,काय करावे त्याला काहीच सुचत नव्हते, अन ती श्रीकांत ला न बघता निघून गेली.श्रीकांत ने फोन केले पण एकही फोन तिने पिक नाही केला, श्रीकांत ला काय करावे काहीच सुचत नव्हते,श्रीकांत फोन वर फोन करीत होता पण तिने एकही फोन नाही उचलला. शेवटी त्या मुलाने फोन उचलला अन श्रीकांत ची अन त्याची बाचाबाची झाली. आज त्याला भेटायचे अन सगळे काही सांगायचे असे त्याने ठरवले होते.श्रीकांत ला राजश्री चा जेवढा राग आला होता तेवढाच राग त्या मुलाचा आला होता, त्याला भेटून तो सोक्षमोक्ष नक्कीच लावणार होता,अन तसा तो भेटला, राजश्री आज तरी आपल्या बाजूने उभी असेल असा त्याला विश्वास होता पण तिने सहज पाने " श्रीकांत मी तुझ्याबरोबर नाही लग्न करू शकत, प्लीज मला या पुढे त्रास देऊ नको.." असे म्हटले.श्रीकांत ने एका फाईट मधेच त्या वैभव ला आडवे पडले असते पण जर आज त्याचे प्रेमच त्याच्या बाजूने नाही म्हटल्यावर तो तरी काय करणार. " तुम्ही दोघे खुश राहा.." असे म्हणून श्रीकांत तिथून निघून गेला, डोळ्यात पाणी..स्वप्नाचा चुरा अन तिच्यासाठी केलेली अंगठी याच तीन गोष्टी आत्ता त्याच्या जवळ उरल्या होत्या..काय करावे काहीच सुचत नव्हते, पण श्रीकांत ला हार मानायची नव्हती,खरेच प्रेम केल्याचे हेच फळ असते का..ती व्यक्ती खरच सोडून जाण्यासाठी आलेली असते का?असे प्रश्न माझ्या मनात आले...कारण
श्रीकांत ने तिच्यासाठी सारा जीव लावला होता, तिच्या छोट्या न छोट्या गोष्टींची काळजी त्याने घेतली होती,जेवढे प्रेम तिच्या घरच्यांनी तिच्यावर केले नव्हते त्याहुनी अधिक तो तिच्यावर करायचा,त्याला राजश्री ला एकटे भेटायचे होते जरी ते शेवटचे का असेना, त्याला मात्र तिला भेटायचे होते...
२ एप्रिल २०१० त्याने हाल्फ डे घेतलं ऑफीस मधून अन तो तिच्या ऑफिस च्या इथे गेला. दुपारचे २ वाजता तिचा लंच होतो म्हणून तो त्या वेळेत तिथे पोहचला. त्याने तिला फोन करून सांगितले कि मी तुझी वाट पाहत आहे ऑफिस खाली जमले तर ये, पण तिने मात्र फोन ऑफ केला.श्रीकांत ने खूप प्रयत्न केले पण तिचा फोन ऑफ लागत होता.२ चे ४ झाले दोन तास झाले तरी तिचा फोन ऑफ होता.शेवतो कंटाळून श्रीकांत ने तिच्या ऑफिस मध्ये फोन केला आणि तिला फोनवर बोलावले. त्याला फक्त तिला एकदा भेटायचे होते आपले प्रेमाचे नाते
वाचवायचे होते, एक वेडेपणा होता पण तसेच त्याचे प्रेम हि तेवढेच पवित्र अन सच्चे होते.संध्याकाळचे ७ वाजले श्रीकांत ला ५ तास झाले होते उभे राहून पण तरीही ती काही आलि नाही,त्याने तिला फोन केला तर कॉल वेटिंग वर
यायचा अन मग ती पुन्हा फोन बंद करायची, त्याला काहीच समजत नव्हते ७ चे १० वाजले अन आत्ता मात्र श्रीकांत चा संयम सुटत जात होता, आठ तास तो तिच्या ऑफिस खाली उभा होता पण तिने फोन उचलला नाही, कॉल झाले मेसेज केले तरी काही प्रतिसाद नाही, शेवटी कंटाळून त्याने ऑफिस मध्ये कॉल केला,तेव्हा कळले कि ती तर ७ वाजताच गेली होती. श्रीकांत ला प्रश्न पडला कि ८ तास तो तिच्या ऑफिस च्या खाली उभा आहे तरी हि त्याला ती दिसली कशी नाही , तर चौकशी करताच त्याला असे समजले कि ती दुसर्या प्रवेशद्वाराने बाहेर पडून गेली. श्रीकांत चे डोके फिरले होते, त्याने सी. एस. टी वरून शेवटचा कॉल केला तर तो हि तिने कट केला.
रात्रीचे १०-३० झाले होते तेवढ्यात श्रीकांत चा फोन वाजला, त्याला वाटले तिचा आहे त्याने उचलला कारण तो नंबर लेंड लाईन वरचा होता,तो कॉल उचलल्यावर त्याला एक धक्काच बसला कारण तो कॉल पोलीस स्टेशन मधून होता. अन त्याला बोलावले होते कारण राजश्री ने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.त्याला दोन मिनिट काही सुचलेच नाही, कि आज त्याच्या प्रेमाचे फळ त्याला पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखील होऊन मिळाले होते,
त्याने ट्रेन पकडली अन ११-४० ला पोलीस स्टेशन ला पोहचला.रात्रीचे बारा वाजत आले होते, पोलीस कसे बोलतात अन कसे वागवतात याची कल्पना त्याला होती,पण तरीही तो त्या धक्क्यात होता,चांगले व्यक्तिमत्व असल्याने
पोलिसांनी त्याच्याशी नम्रतेने बोलायला सुरुवात केली, एक सोफ्टवेअर कंपनी मध्ये असलेला मुलगा आज पोलीस स्टेशन मध्ये बसला होता अन त्याचे कारण होते कि त्याने अफाट प्रेम केले होते.खूप चर्चा झाली, शिवीगाळ झाली अन श्रीकांत ने ति केस दाबली. तरीही त्याचा विश्वास बसत नव्हता कि राजश्री असे काही करू शकते, पण जेव्हा फॉर्म वर सही करताना त्याने राजश्री ची सही पहिली तेव्हा त्याच्या डोळ्यातून एक अश्रू पडला,स्वप्ने तुटली
होती,हृदयातून रक्त वाहत होते अशी त्याची अवस्था झाली होती,त्याने सही केली... राजश्री ने आपली तक्रार केली हा विचार मनातून जाताच नव्हता, एका क्षणासाठी सारे प्रेम त्याला आठवत होते,पोलीस स्टेशन च्या बाहेर पाऊल
टाकताना त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आलि अन तो पडला..
आज मी त्याच्या घरी गेलो, तेव्हा कळले कि तो त्यादिवशी जो पडला तो कधी उठलाच नाही, आज मला त्याच्याकडे बघवत नाही,आज तो एक मानसिक रुग्ण झाला आहे,हाथात अजूनही ति अंगठी आहे अन एका वेगळ्याच विश्वात तो हरवला आहे...त्याच्या प्रेमाची किंमत किती तिने ठेवली हे मला माहिती नाही पण त्याच्या प्रेमाला शिक्षा कशी तिने केली हे मात्र मी कधीच विसरू शकत नाही..त्याचे जग आज तिथेच थांबले आहे,तो वेळ अजूनही तिथेच अडकला आहे,अजूनही तो वेडा प्रेमी ति एकदा तरी येईल याच प्रतीक्षेत आहे.........................शिरीष सप्रे(९-५-२०१०)

No comments:

Post a Comment