Friday, May 28, 2010

सावरकरांशी नतमस्तक होऊनी गेला..

होता अंधार चहुबाजूला
प्रकाशाचा किरण असा आला
चैतन्याचे वातावरण झाले सारे
जेव्हा सावरकरांचा जन्म झाला..

होती भूक स्वातंत्र्याची
नव्हता मनी कोणता विचार
देत होते लढा त्या इंग्रजांविरुद्ध
होते बनवले ज्यांनी देशाला लाचार..

होती लेखणीला अपार धार
वाचून लेख ते इंग्रजांवर होई वार
नव्हती पर्वा तुरुंगाची कधीही
होते जे पाठवायचे इंग्रजांना हद्दीपार..

स्वातंत्र्याचे ध्येय होते मनी
लढाच तो फक्त द्यायचा होता
शिकुनी लढ्याचे शिक्षण ते
इंग्रजांनाच धडा शिकवायचा होता..

पाहुनी ती देशभावना
सागरही न शांत बसला
ने मजसी ने च्या पुकाराने
सागराने हि लढा दिला ..

तो सूर्य आज एक
सोनेरी किरणे घेउनी आला
स्वातंत्राच्या पहाटी उगवताना
सावरकरांशी नतमस्तक होऊनी गेला...नतमस्तक होऊनी गेला..
-----------------शिरीष सप्रे(२८-५-२०१०)-----------------------

No comments:

Post a Comment