Sunday, August 4, 2013

तो बिअर बार..!

वेटर ओर एक बॉटल लाना ।
.
.
शेवटचा घोट संपवत
नव्या बाटलीची फर्माईश केली
डोळ्यात होते अश्रू दाटलेले
 दारूची नशा होती आसवात साचलेली..
 

कोणते दुख मनात माझ्या होते
ज्यासाठी घोट दारूचे लागत होते
रोज दिवसा अखेर होताच क्षणी
पाउले त्या बार कडे वळत होते ..

एका हाथी जळती सिगारेट
होता दुसऱ्या हाथी दारूचा प्याला
झुरके सोडत घोट घेत होतो मी
अन दुखाचा आवंढा होता गिळलेला..

सदा हसत खेळत राहणारा
मन मिळाऊ स्वभावाचा होतो असा
अनोळख्या कोणत्याही व्यक्तीच्या
मनात असायचा माझा  वसा ..

मदतीस तत्पर सदा मी
सहकार्यास  पुढाकार असायचा
होती छबी निराळी माझी अशी
हर एकास मी आपलासा वाटायचा..

एकांत पणाच्या विळख्यात मी
अशा रीतीने अडकलो होतो
असलो चालत या गर्दीत जरीही
स्वतासी आज मी शोधत होतो ..

चटक ती दारूची अशी
या शरीरास लागली होती
होते समजत मजला कि
दारू आज मजसी  पीत होती ..

नैराश्याने माझ्या मनास आज
असे जणू जखडले होते
वैयक्तिक जीवनाच्या उलाढालीत
त्या बिअर बार ला आपलेसे केले होते..

नव्या उमेदीने लढतात सारे कसे
स्वत मी जवळुनी पहिले होते
असेल इच्छा मनाची जर प्रबळ
येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने मग होते..

 विषाचे ते प्याले मी पीत होतो
समजुनी या मनास उमजले नाही
असेल तो बार तिथेच नसलो मी जरी
पण सुखद क्षण  सोबत माझ्या राहणार नाही..

दुसर्या बाटलीतील शेवटचा घोट घेत
अखेर जीवनाचा आवंढा मी गिळला
मिळाली होती मुक्ती मजला आज
सिगारेटच्या धुरा सोबत, दिवा आयुष्याचा विझला..

होत आहे पश्चाताप या मनासी आज
पुन्हा एकदा लढायला हवे होते
आहे तो बिअर बार आजही तिथेच
पण आयुष्यातील सुंदर क्षणात .. पुन्हा एकदा जगायला हवे होते…
-------------शिरीष सप्रे(४ - ०८ - २०१३)------------------

2 comments:

  1. Kadhitari konitari aaple vhavese vatate......aani sagle sobat astana ekte rahavese vatate...

    ReplyDelete
  2. आयुष्यातील सुंदर क्षणात .. पुन्हा एकदा जगायला हवे शिरीष

    ReplyDelete