Wednesday, November 24, 2010

लिहायला विषयच मात्र मिळत नव्हता...

वहीची पाने आज फडफडत होती
लिहावे काहीतरी..इशारा असा करत होती

शब्दही आज रुसले होते
स्वताच्या अर्थापासून आज दूर गेले होते

मनात विचारांचा गोंधळ होता
शब्दांना काव्यात गुंफण्याचा मेळ घडत नव्हता...

काहीतरी लिहिण्याची इच्छा मनात दाट होती
लिहावे कशावरी..याचीच खात्री मनाला होत नव्हती...

मनातील विचारांना आज नवा सूर गवसला होता
काव्यात मांडताना शब्दांची लय तो बिघडवत होता...

मनात विचारांचे काहूर माजले होते
मनातून उतरवायला शब्द मात्र उमजत नव्हते...

लेखणी हातातील लिखाणास आतुरली होती
लिहावे कसे...शब्दांनीही आज साथ सोडली होती...

वेड्या मनाने माझ्या, आज कहर केला होता
लिहायचे होते फार काही..पण लिहायला विषयच मात्र मिळत नव्हता...विषयच मात्र मिळत नव्हता...
------------------शिरीष सप्रे(२४-११-२०१०)-----------------

No comments:

Post a Comment