Monday, July 4, 2016

नियती...!


कधी कधी प्रेम न बोलता खूप काही बोलून जाते.. आपल्यातील अनेकांना अशा प्रेमाचा अनुभव आला असेल. हृदयाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात ते प्रेम नक्कीच दडले असेल. ही कविता त्या सर्व दडलेल्या प्रेमासाठी, प्रेम करणाऱ्यांसाठी.. !
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

त्या एका रम्य संध्याकाळी 
समुद्र किनारी चालत आपण होतो 
होती भेट पहिली आपुली 
शब्दांपेक्षा नजरेतूनी  बोलत होतो...! 

होता संवाद वर्षा पूर्वीचा 
भेट मात्र झाली नव्हती 
आवाज ऐकुनी एक-मेकांचा 
प्रतिमा हृदयी कोरली होती ...! 

हाथ पुढे सरकवत तू मजला 
डायरी हाथी थमावलीस.. 
होते वर्षभराचे संवाद त्यात 
अन तुझ्या मनाची बाजू तू मांडलीस...!    

कोरे ठेवले होते पान अखेरचे 
नियतीस तू लिहिण्यास सांगितले होते 
उसळली लाट जीवनात अशी 
अन किनारे आपुले वेगळे होते...! 

ना सुटली साथ त्या वादळात ही  
अनेक कारणांनी एकत्रित आपण होतो 
भिन्न  किनारी राहुनी आजही  
एकत्र येण्यासाठी धडपडत होतो...! 

ना अवलंबूनी नियतीवरी आज मी 
गुपित मनातील सांगायचे आहे 
गुंफूनि शब्दांना कवितेतून आज 
अबोले बोल ऐकवायचे आहे...! 

आहेत चढ उतार आयुष्यात माझ्या 
सोबत प्रत्येक क्षणात तू असशील का? 
नसते भान स्वतःचे मजला अनेक प्रसंगी 
बनुनी ताकद माझी, साथ मजला देशील का? 

आहे सामर्थ्य जग जिंकायचे माझ्यात 
एक फक्त तुझ्या साथीची गरज आहे 
करीन  मात अनेक कठीण प्रसंगावरी 
नियतीहुनी जास्त तुझ्या सोबतीची आस आहे... तुझ्या सोबतीची आस आहे...! 
------------शिरीष सप्रे (४-०७०२०१६)------------

1 comment:

 1. Tujhya likhanala uttarayla..shabdanchi tadjod karavi lagte..agdi sopya shabdat..kiti spasht mandlas tu..premachi sobat aani niyaticha pathimba donhi aahe tujsobat..

  jinkun ghe saare tu,
  hartil niytiche khel saare..
  ichchhit saare milnyas tuj,
  tuttil aasmantiche kaik taare..

  Lihit raha...vyakt hot raha...kavy pratibha khupach bhannat aahe tujhi..

  ReplyDelete