Wednesday, September 22, 2010

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
चहा वाला पाहून हसला
"बहोत दिनो के बाद साहब" म्हणुनी पुसले..
खूप दिवसांनी का होईना,
चेहरा माझा त्याने ओळखला...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
दुकान त्याचे तसेच होते,
चहाचे ग्लास हि तेच होते
आहेस तू हि माझ्याबरोबर
भास हे मला होत होते...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
पावसाची ती सर लागली होती,
चहा पिणार्यांची ती गर्दी होती..
मी हि एका आडोशाला होतो
गर्दीत त्या तुला शोधत होतो...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
सिगारेटचे झुरके कोण सोडत होते
कोणी सिगारेट शिलगावत होते...
सिगारेट घ्यायला पाऊले माझी जात होती..
पण तेव्हा मला अडवणारी मात्र तू नव्हती...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
चहाचा आस्वाद घेणारे सारे होते,
सुरके मारत सारे चहा पीत होते
वाफाळत्या चहाचा ग्लास माझ्या हाती होता,
चहाच्या त्या वाफेतही तुझ्याच गंधाचा भास होता...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
आपले बाकडे हि तसेच होते
नाव ज्यावर आपण कोरले होते..
बाकड्यावर त्या आज मी एकटा होतो,
येशील तू कधीतरी याचीच स्वप्ने पाहत होतो...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
चहाचे पैसे पुढे देण्यास गेलो
" मेडम नही आज..? " या प्रश्नाला ना उत्तरलो..
डोळे माझे भलतेच सांगत होते...
नाहीस तू बरोबर चहावाल्यालाही हे कळले होते...

आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
.
.
आठवणीना त्या आपुल्या
पावसात भिजवायला गेलो...
सरीत त्या अश्रुना लपवायला गेलो...
आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...आज मी त्या कॅन्टीन वर गेलो...
------------शिरीष सप्रे(२२-९-२०१०)------------------

No comments:

Post a Comment