कथा साहित्य...

अपयशाचे पर्व - एक मनोगत...

वर्ष २०१०...आज जेव्हा जेव्हा मी त्याला पाहतो तेव्हा तेव्हा त्याच्या  डोळ्यात काहीतरी अजून हरवले आहे हे मी पाहतो.  "श्रीराज" नाव त्याचे,आमच्याच कॉलनी मध्ये तो राहतो.मी त्याला लहानपणा पासून पाहतोय,शाळेत असताना खूप उपक्रमात सहभागी असायचा. चित्र काढणे, एकपात्री  नाटक असो किवा वकृत्व स्पर्धा म्हणा श्रीराज हाच तर खरा उमेदवार असायचा,त्याच्याशिवाय कोणीच हे सारे करू शकत नव्हते.शाळेत असताना  अभ्यासात हि हुशार होता.मला जो पर्यंत माहित आहे दहावी पर्यंत त्याने त्याच्या शाळेला चित्रकलेत आणि वकृत्व स्पर्धेत फिरती ढाल मिळवूनी दिली.म्हणूनच त्याच्या शाळेतले शिक्षक अजूनही त्याचे नाव काढतात.मराठी भाषेवर त्याचे प्रभुत्व आणि त्याची ती बोलण्यातील कला खरच मनाला आनंद मिळवूनी  देते...अजूनही तो कधी समोर आला कि हसत खेळत बोलतो..त्याचे हास्य हेच तर त्याचे मुख्य आकर्षण होते,हास्य ते त्याच्या चेहऱ्यावर अजूनही आहे पण त्या हास्यामागे खूप काही त्याने सहन केलेले लपवत आहे..
 बारावी नंतर त्याने इंजिनीअर कॉलेज ला पुण्यात एडमिशन घेतली,बाहेर जायचा त्याला आनंद होता पण नियतीला ते मात्र मान्य  नव्हते.पहिल्या वर्षानंतर श्रीराज घरी आला..तेच हास्य तेच तेज अन पास झाल्याचा रिझल्ट हाथी होता.घरचे सारे आनंदित होते त्याचे आई-वडील आणि एक सख्खा लहान भाऊ,म्हणतात ना  कधी कधी सुख हे क्षणा पुरते असते तसेच त्याच्या बरोबर झाले,दुसऱ्यावर्षी  मात्र तो नापास झाला आणि तो वर्षभरासाठी घरी आला..
      कोणालाही समजत नव्हते श्रीराज चे डोळे मात्र वेगळेच काहीतरी सांगत होते,आठवडाभर तो घरात राहिला मग आपण मात्र बसायचे नाही या उमेदाने तो पुन्हा कामाला लागला,वर्षभर घरी असलो तरी काय झाले काहीतरी करायचे या उमेदाने तो नोकरी करू लागला..पण खडतर रस्ता हा कधीच संपत नसतो  एकाचे दोन अन दोनाचे तीन अशी तीन वर्ष झाली मग मात्र त्याचे वर्ष संपले अन तो तिसर्या वर्षी गेला..तीन वर्षे मात्र त्याने फार अपयशाची काढली पण त्याला  मात्र स्वतावर विश्वास होता कि आपण करू शकतो अन त्याने तसेच केले इंजिनीअर च्या शेवटच्या वर्षाला असताना त्याने १३ विषय एकदम काढले आणि फर्स्ट क्लास आणला..घरच्यांना मात्र याची काही कल्पना नव्हती कि आपल्या मुलाचे एवढे विषय बाकी आहेत कारण शेवटच्या वर्षी असताना त्याचे वडील  इस्पितळात ICU मध्ये होते अन त्यामुळे त्याने शांत राहणे हेच अवलाम्बवले होते. तिसर्या वर्षी असताना त्याची ओळख एका मुलीशी झाली होती अन काही महिन्यात तो तिच्या प्रेमातही पडला होता,म्हणतात ना "प्रेमात थोडा वेडेपणा लागतो" असे जणू त्याचे तिच्यावर प्रेम होते. तिच्यासाठी तो काही करायला तयार होता, तिला शुभेचा द्यायला तो घरी न सांगता पुण्याहून तिला भेटायला यायचा, भांडण झाले कि लगेच तिला मनावयाचा, त्याच्यासाठी ती सर्व काही होती, कधी आपण पास होतो अन एकदा घरी येतो असे झाले होते,तिच्यापासून चा होणारा तो दुरावा त्याला मिटवायचा होता, खूप काही स्वप्न  त्याने रंगवली होती...पण ते हि नियतीला मान्य नव्हते ज्या आनंदात तो घरी आला होता अन जणू काही दुखाचा डोंगर त्यावर कोसळला होता, जिच्यासाठी स्वप्ने रंगवत होता तीच त्याच्या बाजूने उभी नव्हती, एकटे राहणे , शांत राहणे अन एकांतात रडणे अशी जणू त्याची अवस्था झाली होती..
              तरीही त्याची इच्छा मात्र संपली नव्हती, तो नेहमी म्हणायचा " आठवण माझी हि येईल मी गेल्यावर"  अन तसेच होत राहिले,तिलाही तो आठवायचा पण त्यात प्रेमाचा तो ओलावा नसायचा.तरीही श्रीराज मात्र लढत होता.मग पर्व सुरु झाले ते नोकरीचे फर्स्ट क्लास होता पण आधीचे ड्रोप मात्र लपत नव्हते...जिथे जाईल तिथे त्याला वर्ष फुकट गेल्याची ठेच लागत होती अन त्यामुळे तो अधिकच खचत होता, सांगणार तरी कोणाला..?त्याचे प्रेम हीच तर त्याची सर्वस्वी होती एक मैत्रीण, एक सखी आणि सर्व काही पण तीच त्याच्याबरोबर नव्हती पण तो मात्र तिला दिलेल्या वचनाचे पालन करीत होता..एकत्र असताना त्यांनी जी स्वप्ने रंगवली होती ती  पूर्ण करायची याच प्रयत्नात होता..घरचे वातावरण अधिकच बिघडले होते एवढे नाही तर लहान भावाने सुद्धा त्याला टोमणे मारले होते...यशाची ती पायरी त्याला सापडत नव्हती अन त्या रागात घरात भांडणे व्हायची...
            श्रीराज चे घरच्यांवर फार प्रेम होते पण आलेल्या त्या अपयशाने त्याला कोण समजून घेत नव्हते...येणारा प्रत्येक दिवस तो स्वताशीच लढत होता...असलेल्या त्या रिसेशन ला तो कंटाळला होता पण हिम्मत मात्र तो सोडत नव्हता...M .S . करणे हे एकमेव ध्येय त्याच्या डोळ्यासमोर होते जे
त्याला स्वतासाठी, स्वताच्या प्रेमासाठी अन घरच्यांचा मानासाठी पूर्ण करायचे होते...त्याला लागणारी फी मात्र खूप होती मग त्याने स्वताच कामे घ्यायला सुरुवात केली.असे म्हणतात कि दोन दगडांवर पाय ठेवू नये नाहीतर माणूस पडतो पण श्रीराज ने मात्र कसलीच परवा न करता दहा दगडांवर पाय ठेवले होते कारण अपयशाचे धक्के त्याने आधीच सहन केले होते अन तसेच त्याने स्वताला कठोर केले होते.. "वचन दिले मी तुला ते मी पूर्ण करणार...तोडून जगाच्या बंधनाला या तूच माझी होणार" या गोष्टीवर तो अटळ होता..सकाळी तो निघायचं अन रात्रीचा तो यायचा..तो काय करतो कसे करतो कोणालाच कळत  नव्हते...घरच्यांनी त्याच्याशी बोलणे हि सोडून दिले होते,रात्रीचा तो फक्त जेवायचं बिन पैशाचा तो फिरायचा पण होती त्याच्याकडे ती हिम्मत अन बोलायची ताकद..असेच काही महिने गेले अन ऋतू बदलावा जसा तसे वातावरण बदलत गेले ....स्वप्न त्याचे पूर्ण होता होता स्वप्नाच्या तो त्या दारी पोहचला होता.. "डोक सर्वांकडे असते पण अपयशाने खचून न जाता हिम्मत दाखवणे हे मात्र फार कमी जणांना येते..." त्यातला हा श्रीराज..अपयशाची अनेक पर्व त्याने पहिली..कोणाचीही साथ त्याला ना लाभला  होता. विश्वास स्वतावर त्याला  म्हणूनच तर केलेली वचने सारी त्याने आज पूर्ण केली...
         २१ ऑक्टोबर ०९ ला सकाळी माझ्याकडे तो आला...होता विश्वास डोळ्यात त्याच्या हसत मला तो म्हणाला  "पहा आज मला... तुझ्यासमोर मी रडलो होतो...तरीही तू फक्त मला पाहत राहिलास...आई-वडिलांशी भांडलो होतो तरीही तू काही न बोललास...हजारो प्रश्न केले तुला पण तू न त्याला उत्तरलास...पण
आज मी स्वतावर खुश आहे केलेली वचने आज पूर्ण होत आहेत...इतके दिवस मला रडताना पाहिलेस उद्यापासून ते प्रतिबिंब मात्र बदलणार आहे...आत्ता या दर्पणात तुझ्या एका विश्वासाची झलक दिसणार आहे.एका वचन पुर्तीची प्रतिमा दिसणार आहे .."
                               " नशीब हे सर्वांकडे असते...योग्य वेळी नशीब अजमावल्याने धारेदार ते बनत असते...अपयशाचे पर्व येतात असे खूप...खचून जाऊन नका अन करू  नका  कोणती चूक..अन वाढवा आपल्या यशाची भूक"

---------------------शिरीष सप्रे(२५-२-२०१०)-----------------------