Wednesday, November 24, 2010

लिहायला विषयच मात्र मिळत नव्हता...

वहीची पाने आज फडफडत होती
लिहावे काहीतरी..इशारा असा करत होती

शब्दही आज रुसले होते
स्वताच्या अर्थापासून आज दूर गेले होते

मनात विचारांचा गोंधळ होता
शब्दांना काव्यात गुंफण्याचा मेळ घडत नव्हता...

काहीतरी लिहिण्याची इच्छा मनात दाट होती
लिहावे कशावरी..याचीच खात्री मनाला होत नव्हती...

मनातील विचारांना आज नवा सूर गवसला होता
काव्यात मांडताना शब्दांची लय तो बिघडवत होता...

मनात विचारांचे काहूर माजले होते
मनातून उतरवायला शब्द मात्र उमजत नव्हते...

लेखणी हातातील लिखाणास आतुरली होती
लिहावे कसे...शब्दांनीही आज साथ सोडली होती...

वेड्या मनाने माझ्या, आज कहर केला होता
लिहायचे होते फार काही..पण लिहायला विषयच मात्र मिळत नव्हता...विषयच मात्र मिळत नव्हता...
------------------शिरीष सप्रे(२४-११-२०१०)-----------------

Sunday, November 7, 2010

शेवटची कविता मी लिहिली...

गुंफला होता शब्द प्रेमाचा
आज शब्द तो अधुरा राहिला...

होतो लिहित कहाणी प्रेमाची
आज कहाणी ती अधुरी राहिली...

प्रेमाच्या सागरात नौका आपल्या नावाची सोडली
अर्ध्या वाटेत नौका ही आज बुडाली...

तयारीत होता सूर्य नवी पहाट आणायला
काळोख्या रात्रींशी मैत्री माझी झाली...

डोळ्यात स्वप्नांची उमेद नवी होती
जागा त्या स्वप्नांची अश्रूंनी आज घेतली...

हसत पाहायचो वास्तवात सदा मी
आज तीच एक आठवण बनुनी राहिली...

लिखित होता विरह नशिबी माझ्या
नशिबाच्या विरोधात प्रेमाची हाव मी केली...

जुळवत होतो शब्दांना प्रेमाच्या भावनेसाठी
त्या शब्दांनीच आज प्रेमाची सांगता केली...

जुळणार नाही शब्द कवितेसाठी..न मिळणार साथ पुन्हा कधी
उरली साथ काही क्षणांपुरती ...अन...
शेवटची कविता मी लिहिली... शेवटची कविता मी लिहिली...
-----------------शिरीष सप्रे(०७-११-२०१०)--------------------------