Thursday, April 29, 2010

चंद्र हि तिच्यावर बरसला...

होता चंद्र आज खिलला
त्या निरभ्र आकाशी,
माझेच होते मला माहिती
काय बोलत होतो मी त्याच्याशी ..

सहजच आज मी
तुझ्या विषयी त्याला विचारले ..
हसत म्हणाला मजसी तो ..
आहे माझ्यातच तिचे हास्य सामावले ..

माझ्याशी हि ती
तुझ्याबद्दल बोलते..
आहेस कसा तू
सदा मला विचारते..

आज विचारतेस मजला त्याच्याविषयी
कशाला देऊ या प्रश्नांची उत्तरे ..
आहे कशी अवस्था त्याची..
का सांगू मी सारे तुला खरे..

दुरावत होतीस त्याच्यापासून तेव्हा
त्याच्या प्रेमाची कदर तू न केलीस
आज नाही तुझ्याबरोबर तो तर,
का मज जवळ त्याची विचारपूस केलीस...

होते त्याचे प्रेम तुजवर..
तुझ्याबद्दल मजशी तो बोलायचा..
आहे तो काळा डाग मजवर..
म्हणुनी सदा, मला तो चिडवायचा..

नाही मिळणार ग मुली,
त्याच्यासारखा तुला कोणता सखा..
आहे प्रेम अजूनही तुजवर त्याचे,
माझ्याकडे पाहुनी रडतोय बघ तो कसा..

वेडेपणा माझा पाहुनी,
आज चंद्रही न शांत बसला
होणारी माझी हि तडफड पाहून,
आज चंद्र हि तिच्यावर बरसला...चंद्र हि तिच्यावर बरसला...

------------------------शिरीष सप्रे(२९-४-२०१०)-----------------

Tuesday, April 27, 2010

कर निश्चय मनाशी आता...

आला हा सूर्य घेउनी एक नवीन पहाट
नव्या दिशेने करायची वाटचाल तुला आज ...

जा तू विसरुनी भूतकाळ सारा,
नव्या संधीचा गंध गुजतोय आसमांत सारा..

सोड त्या चुका भूतकाळात ज्या केल्या,
आयुष्य सुंदर हे जगायला का तू विसरला...

खंबीर असे मन तुझे नको डगमगू तू देऊस,
काळजीत आहेत जे तुझ्या,नको आज तू दुरावूस..

आहे खूप सार्या गोष्टी आयुष्यात या अनुभवायला,
अन एका वादळातच का लागली नौका बुडायला ..

आहे पंखात बळ तुझ्या, घे तू उंच भरारी ,
टाक हवेला भेदुनी त्या , गुंजू दे तुझी डरकाळी ..

करीन स्वप्न पूर्ण सारी,निश्चय मनाशी आज कर,
राहा पुन्हा उभा हिमतीने,लढायला स्वताला तयार कर..

पहिले आहेत स्वप्नं, तुझ्या घरच्यांनी खूप सारी,
आज त्या स्वप्नपुर्तीन्साठी कर आयुष्याला सुरुवात खरी...

आहे तो देव आज तुझ्या पाठीशी उभा,
सदैव तू जिंकत राहावे, कर निश्चय मनाशी आता...कर निश्चय मनाशी आता...
-----------------शिरीष सप्रे(२६-४-२०१०)---------------------

हृदय ते चिरते...

होतो उभा त्या दारापाशी
हताश अन मनी विचारांच्या गाठी..
नव्हते माहिती मनाला माझ्या आज ..
येशील का ग प्रिये तू माझ्यासाठी..

मिनिटांचे तास ते बघता बघता झाले..
उभ्या उभ्या आठ तास मी घालवले..
होते केले प्रेम कोणी एके काळी..
त्याच प्रेमाने संकट आज ते ओढावले...

कशी हि दुनिया अशी स्वार्थी झाली..
धोक्याची ती गोळी मजवर झाडली
प्रेमाचे रूप ते तू न ओळखले,
छळाचे कारण देऊनी मज आज हटविले..

शेवटचे आज पाहायचे होते तुला,
भेटुनी तुज आज काही होते सांगायचे मला
भेटायची संधी ती मज न मिळाली,
माझ्या या प्रेमाची गुन्ह्यात दाखल झाली..

निस्वार्थी प्रेमाची हीच शिक्षा असते,
सदा अश्रू ढाळणे हेच नशिबी असते,
प्रेमभंग हि यातना असा धक्का देते,
सांडूनी रक्त सारे हृदय ते चिरते...हृदय ते चिरते...
-----------------शिरीष सप्रे(२६-४-२०१०)---------------

Friday, April 16, 2010

कविता मला सुचत नाही..

वाहिलेले शब्द ते मला वेचता येत नाही...
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

प्रेमाचे ते बोल मला समजत नाही...
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

असते ओढ कशी तुला ती जाणवत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

आठवणीचा खेळ तो मी विसरत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

वाहिलेल्या अश्रूंचा हिशोब तो लागत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

जगलेल्या रात्रींचे गणित ते लागत नाही...
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

वाट पाहिलेल्या तासांची आकडेमोड सुटत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

तुटलेल्या प्रेमाचे प्रतिक ते जुळत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

तुझ्यात अडकलेली वेळ ती पुढे सलत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

तुझ्या हास्याची कोर चंद्रावरही दिसत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

पावसातल्या सरींमध्ये अश्रू माझे लपत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..कविता मला सुचत नाही...

------------------------शिरीष सप्रे(१६-४-२०१०)----------------------

Wednesday, April 14, 2010

गेलीस क्षणात सोडून...

गेलीस क्षणात सोडून
ठरवलेली साथ न देऊन

गेलीस क्षणात सोडून
स्वप्नांचा तो चुराडा करून..

गेलीस क्षणात सोडून
रात्रीचे मला जागे ठेवून..

गेलीस क्षणात सोडून
डोळ्यात माझ्या अश्रू देऊन..

गेलीस क्षणात सोडून
विसरुनी जा असे सांगून..

गेलीस क्षणात सोडून
एकदाही मागे न बघून..

गेलीस क्षणात सोडून
वचन ते सहज तोडून..

गेलीस क्षणात सोडून
मृगजळाची जाणीव करून..

गेलीस क्षणात सोडून
जीव हि न राहिला तुला जाताना बघून...तुला जाताना बघून...

-----------------शिरीष सप्रे(१३-४-२०१०)-----------------

Saturday, April 10, 2010

आहे मी त्या आकाशी..

करितो प्रेम तुझ्यावर, तुझ्यावरच जीव असतो
तुझ्या एका हास्यासाठी, जोकर मी बनत असतो
असेच ते हास्य टिकावे,याच प्रयत्नात मी असतो
सांग तू मला, मी कसला तुला त्रास देतो...?

येणाऱ्या त्या प्रत्येक संकटा समोर,रोवुनी पाय मी उभा असतो
सुख दारी तुझा पोहोचवताना दुख मी पचवत असतो
दुखाचे ते वार घेउनी सदा तुझ्या समोर हसत असतो
सांग तू मला, मी कसला तुला त्रास देतो ..?

कामाच्या त्या निमित्ताखाली,तुझे मला टाळणे असते
आवाज तुझा ऐकण्यासाठी माझी तडफड होत असते
असुनी माहिती सारे, मीच समजुनी घेत असतो
सांग तू मला, मी कसला तुला त्रास देतो..?

त्रास देतो कारणांनी या, माझ्यापासून तू दुरावालीस
वाट पाहत राहिलो पूर्वेला, अन पश्चिमेला तू गेलीस
दुरावा तो मिटवायच्या वाटा मी शोधात असतो
सांग तू मला , मी कसला तुला त्रास देतो..?

त्रास देणारा तो मी आज दूरदेशी आलो आहे
माझ्यामुळे होणारा तो त्रास, मी आज संपवत आहे
झाली आठवण माझी कधी, नको विचारूस या जगाशी
वरती पाहुनी बघ एकदा, आहे मी त्या आकाशी...आहे मी त्या आकाशी....

----------------शिरीष सप्रे (९-४-२०१०)-----------------------------------

Thursday, April 8, 2010

नवीन जन्म मी घेणार.....

प्रेम हे जडताना वय पाहत नसत...
प्रेमात तर सारे सगळ माफ असत..

असेच प्रेम मला हि एकदा झाले...
प्रेमात आमुच्या वयाचे फरक निघाले..

होती प्रेमाची कळी हृदयात उमललेली..
पण समाजाला हि कहाणी न पसंद पडलेली..

नव्हती चिंता मला त्या निष्ठुर समाजाची..
होती भीती कि ती येईल का माझ्यासाठी..

पहिले होते भविष्य आमुचे एक-मेकां सोबत..
निष्टुर अशा समजामुळे माझ्याशी ती नव्हती बोलत...

दाबला आमुच्या प्रेमाचा गळा या समाजाने..
टाकले चीरडूनि कळीला त्या मोठ्या कठोरतेने...

संपणार नाही प्रेम आमुचे असला दाबला जरी गळा..
पाहुनी आमुची प्रेम कहाणी रडतीला सारे ढळा ढळा...

प्रेमाचे ते फुल आहे पुन्हा एकदा उमलणार...
येईन पुन्हा मी एकदा..नवीन जन्म मी घेणार...नवीन जन्म मी घेणार.....

----------------शिरीष सप्रे(७-४-२०१०)--------------------

तुझी याद आली...

होता गोडवा पहाटेच्या किलबिलाटात..
होता थंडावा सकाळच्या त्या वातावरणात..
अशीच एक थंड हवेची झुळूक आली...
कसे सांगू तुला..तुझी याद आली...

निसर्गाची ती किमयाच न्यारी...
कराल प्रेम जेव्हा तुम्ही कोणावर...
जाऊन दुसर्यालाच मिळते ती नारी...
अशीच फजिती माझी हि झाली तेव्हा तुझी याद आली...

वेचिले ते शब्द तुझे समजुनी मी ती फुले...
नाही होणार त्रास तुला आत्ता माझ्या प्रेमामुळे...
तुझ्या त्या हास्यासाठी वाट मी माझी बदलली...
एकांत अशा वाटेवर तुझी याद आली...

नाही कळू देणार तुला माझ्या हृदयाचे हुंदके...
अजूनही त्या वळणावर वाट मी पाहत असे..
नशिबाने एक चेष्टा अशी मजवरी केली...
मरणाच्या त्या कुशीत जाताना तुझी याद आली....तुझी याद आली...

------------------शिरीष सप्रे(७-४-२०१०)----------------

Wednesday, April 7, 2010

तुला लिहायचे ते लिहून टाक..

तुला लिहायचे ते लिहून टाक..
शब्दांनी वार एकदाचे मजवर करून टाक..

किती ढाळले अश्रू किमती माझ्यासाठी..
हिशोब मला तो देऊन टाक..
तुला लिहायचे ते लिहून टाक...

जागलेल्या रात्रीतील आठवणी
मला तू एकदा सांगून टाक..
तुला लिहायचे ते लिहून टाक..

तू केलेल्या प्रेमाची किंमत मी ठेवली किती..
माझी जागा आज मला तू दाखवून टाक..
तुला लिहायचे ते लिहून टाक..

नाही जाणले तुझ्या प्रेमाला , न त्या वचनाला..
मनातील भडास एकदाच काढून टाक..
तुला लिहायचे ते लिहून टाक..

लिहिशील किती आता..अजुनी प्रेम आहे..
त्या प्रेमाचा आज गळा दाबून टाक..
तुला लिहायचे ते लिहून टाक..लिहायचे ते लिहून टाक..

-------------शिरीष सप्रे(२९-३-२०१०)-----------