Saturday, January 29, 2011

नयनात आठवणींचा पाउस होता...

कोण्या एका संध्याकाळी
नकळत तुझी आठवण आली
कैद करुनी ठेवलेल्या अश्रूंना
आज वाट मोकळी झाली...

अश्रूंना त्या सावरणे
आज मजसी कठीण झाले
टिपत होतो ओघळणाऱ्या अश्रूंना
अश्रूंतही तुझेच हास्य दिसले...

आठवणींत दडलेला प्रत्येक क्षण
अश्रूंत मी आज पाहत होतो
ना जाहले मलाही कधी
आसवां सोबत मी जगत होतो...

प्रेमाचा तो भावूक रंग
आजही जपून ठेवला होता
हाथात आहे हाथ तुझा
भास मजसी होत होता...

नात्यांच्या बंधनात साधलेला
दोर प्रीतीचा आज तुटला होता
सामोरी होता दिसत किनारा
तरीही सागरात आज हरवला होता...

डुबली होती नौका प्रेमाच्या सागरात
खोट्या आशेवर अजूनही जगत होता
होता दाटला अंधार काळ्या नभांचा
नयनात आठवणींचा पाउस होता...आठवणींचा पाउस होता...
-----------------शिरीष सप्रे(२९-०१-२०११)---------------

Sunday, January 23, 2011

एक कवी उदयासी आला...

स्वर सारे जुळले होते
शब्द सारे गुंफले होते
नजरेतुनी प्रेम व्यक्त झाले होते
झरे आपुल्या प्रेमाचे आज वाहत होते...

सुखे सारी पायी नांदत होती
सावली दुखाची हरवली होती
गोष्ट एका प्रेमाची रंगत होती
चंद्रालाही तार्यांची साथ लाभली होती...

ग्रहण चंद्राला असे लागले
गुंफलेले शब्द क्षणात तुटले
लय सुरांचे असे बिघडले
रंगलेले प्रेम हि बेरंगी झाले...

स्वरांचा अंगणी नांदत असलेला
पारिजात हि आज अबोला झाला
प्रेमात डूबलेल्या या हृदयाला
विरह सहजतेने छेडूनी गेला...

घुसमट त्याच्या मनाची अशी झाली
हरवलेल्या शब्दांना आज जाग आली
भावना त्या रेखाटण्यास लेखणी आतुर झाली
मनाची व्यथा मांडताना कविता त्याची झाली...

मनातील त्या प्रत्येक भावना
काव्यात तो मांडू लागला
शब्दांना काव्यात ओवताना
आज एक कवी उदयासी आला...एक कवी उदयासी आला...
-------------शिरीष सप्रे(२३-१-२०११)---------

Tuesday, January 18, 2011

ती आणि दारू...

दारूची हि नशा अशी
घोट घोट चढत जाते
करते जाग्या जुन्या आठवणी
भूतकाळात मला घेउनी जाते...

प्रत्येक घोटात मला तिच्या

जुन्या आठवणी सदा सतावतात
उमलते हास्य ओठी कधी कधी
तर एकांतात त्याच रडवतात...

कोण्या एका महंताने दारू हि बनवली

जणू बुडत्याला आधारासाठी काठी मिळाली
माझ्या प्रेमाची व्याख्या तिला न कळाली
आयुष्याची शिक्षा मात्र मजसी मिळाली ...

सोड्याच्या त्या बुडबुड्यात प्रिये

तुझाच चेहरा शोधत मी असतो
विरहाचे विष प्राशन करत असताना
अश्रू देखील डोळ्यातील जागा सोडतो...

नशीली रात्र कधी कधी कमी पडते

चढलेली रात्रीची नशा सकाळी उतरते
तिन्ही सांजेला आठवण ती दाटून येते
तुझ्या आठवणीत रमायला दारू मात्र कमी पडते....
------------शिरीष सप्रे(१७-१-२०११)----------------