स्वर सारे जुळले होते
शब्द सारे गुंफले होते
नजरेतुनी प्रेम व्यक्त झाले होते
झरे आपुल्या प्रेमाचे आज वाहत होते...
सुखे सारी पायी नांदत होती
सावली दुखाची हरवली होती
गोष्ट एका प्रेमाची रंगत होती
चंद्रालाही तार्यांची साथ लाभली होती...
ग्रहण चंद्राला असे लागले
गुंफलेले शब्द क्षणात तुटले
लय सुरांचे असे बिघडले
रंगलेले प्रेम हि बेरंगी झाले...
स्वरांचा अंगणी नांदत असलेला
पारिजात हि आज अबोला झाला
प्रेमात डूबलेल्या या हृदयाला
विरह सहजतेने छेडूनी गेला...
घुसमट त्याच्या मनाची अशी झाली
हरवलेल्या शब्दांना आज जाग आली
भावना त्या रेखाटण्यास लेखणी आतुर झाली
मनाची व्यथा मांडताना कविता त्याची झाली...
मनातील त्या प्रत्येक भावना
काव्यात तो मांडू लागला
शब्दांना काव्यात ओवताना
आज एक कवी उदयासी आला...एक कवी उदयासी आला...
-------------शिरीष सप्रे(२३-१-२०११)---------
No comments:
Post a Comment