दारूची हि नशा अशी
घोट घोट चढत जाते
करते जाग्या जुन्या आठवणी
भूतकाळात मला घेउनी जाते...
प्रत्येक घोटात मला तिच्या
जुन्या आठवणी सदा सतावतात
उमलते हास्य ओठी कधी कधी
तर एकांतात त्याच रडवतात...
कोण्या एका महंताने दारू हि बनवली
जणू बुडत्याला आधारासाठी काठी मिळाली
माझ्या प्रेमाची व्याख्या तिला न कळाली
आयुष्याची शिक्षा मात्र मजसी मिळाली ...
सोड्याच्या त्या बुडबुड्यात प्रिये
तुझाच चेहरा शोधत मी असतो
विरहाचे विष प्राशन करत असताना
अश्रू देखील डोळ्यातील जागा सोडतो...
नशीली रात्र कधी कधी कमी पडते
चढलेली रात्रीची नशा सकाळी उतरते
तिन्ही सांजेला आठवण ती दाटून येते
तुझ्या आठवणीत रमायला दारू मात्र कमी पडते....
------------शिरीष सप्रे(१७-१-२०११)----------------
No comments:
Post a Comment