आज तिच्या लग्नाची पत्रिका आली..
.
.
क्षणात मी भूतकाळात गेलो
जुन्या आठवणीत मी रमलो
कठीण झाले भावनांना आवरणे
अश्रुनाही मी ना थांबवू शकलो..
सारे काही कालच्यासारखे वाटत होते
रंग आमुच्या प्रेमाचे जेव्हा बहरत होते
होते किती सुखाचे क्षण सारे
डोळ्यासामोरी चित्र उभे राहिले होते...
तिच्या लग्नाची पत्रिका आली..
मानल एक चटका लावूनी गेली
बंद करुनी ठेवल्या होत्या आठवणी
आठवणीना जागे करुनी गेली...
स्पर्श तिच्या प्रेमाचा तो
अजूनही मी विसरलो नव्हतो,
हातावरील रेषात मी आजही
तिचाच हात शोधत होतो...
आज तिच्या लग्नाची पत्रिका आली..
वस्तुस्तिथी आज सारी बदललेली होती
कधी काळी माझ्यावर प्रेम करणारी,
लग्नाच्या बंधनात बंधणार होती...
विरहाचा नियतीला दोष देणे
केव्हाच मी बंद केले होते
गाली हास्य तिचे खिलत राहावे
हेच मागणे देवाकडे केले होते...
आज तिच्या लग्नाची पत्रिका आली..
.
.
थोड्या दिवसात लग्न तिचे होणार होते
साता जन्मांचे बंध जुळणार होते
दुखाची झळ ही तिच्यापर्यंत जावू नये
साकडे हे देवाकडे मी घातले होते...
------------शिरीष सप्रे(१९-१२-२०१०)----------
Toooooo good shirish.....
ReplyDeleteKeep It Up..... God Bless You Always....