सकाळ होताच तुझा विचार मनात येतो,
आणि डोळ्यावरची झोप उडत मी जागा होतो.
ऑफिस ला जाताना तू दिसशील हा विचार खेळ खेळत असतो,
पण तुझी ट्रेन येण्याच्या आधी तुला पाहायला मी चुकतो.
सुरु होतो पुन्हा तोच हृदयाचा खेळ,
वाटते बसच्या रांगेमध्ये तरी बघायला मिळेल वेळ.
दरोज हा नजरेचा खेळ सुरु असतो,
पण तुझ्याशी येऊन बोलायचा धीर माझा खचत असतो.
तुझे डोळे , तुझे गोड हास्य बघताना मी स्वप्नाच्या दुनियेत असतो,
तुझ्या गोड हास्यातच माझे हास्य शोधायचा प्रयत्न मी करत असतो.
उशिरा का होईना मला तुझ्याशी बोलायचे आहे ,
माझ्या मनातले गाणे तुला ऐकवायचे आहे .
तू दिसताच तुझ्याशी बोलायचा प्रयत्न मी अनेकदा करतो,
परंतु तुला पटणार नाही या विचाराने मी स्वताला थांबवतो.
या मुक्या हृदयःचे हुंदके कोणाला सांगावे कसे;
माझ्या मनातले गाणे तुझ्या पर्यंत कळवावे कसे.
अशीच हसत राहा , अशीच खिलत राहा ,
माझ्या या स्वप्नांच्या दुनियेत अशीच येत राहा .....अशीच येत राहा ......!
------शिरीष सप्रे (23-10-09)------
No comments:
Post a Comment