Thursday, March 11, 2010

राजा - मी या गाडीचा

अशीच आमुची एक कहाणी
मी एकटा गाडीचा या राजा
दूर बांधलेली माझी राणी...

ओझे नेणे माझे काम..
गाडी हाकणाऱ्याचे ओझे वाहणे..
हाच माझा मोठा मान..

पोळ्या च्या दिवशी असतो
मी असा ऐटीत..
राणी हि माझी पाहे
मजकडे अशा खुशीत..

डौलदार शिंगे
हाच माझा रुबाब..
नडते का कोण आपल्याला..
चला पाहू तरी आज..

गाडीला जिंकावणे..
हाच आपला धर्म..
कामे आपले पार पडणे..
अशीच करतो मी कर्म....

नाही हे काम कोणा साध्याचे..
गाडीला जुम्पुनी ऐटीत चालणे..
हेच तर खरे काम
माझ्यासारख्या एका राजाचे...एका राजाचे....

---------------शिरीष सप्रे(२३ -१०-२०१०)--------------

1 comment:

  1. मित्र शिरीष,
    तुझा ब्लॉग बघून खूप आनंद झाला .
    प्रत्येक कविता आपले वेगळेपण टिकवून आहे . प्रभावी मांडणी आणि योग्य शब्दरचना तुझ्या कवितांना न्याय देतात.
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!

    ReplyDelete