आई -- तुझे मातृत्व
तुझेच बोट पकडून चालायला मला शिकवले
वास्तविक जगात चालता चालता अनेकदा मी पडलो...
पण वेळोवेळी तुझ्याच हाथानी मला सावरले,
तुझाच हाथ पकडून शाळेत मी पहिल्यांदा गेलो
तुला दूर जाताना पाहताच खूप मी रडलो..
धावत आलीस मजजवळ दिलास गोड पापा
उचलून घेउनी मला म्हटलेस "बाळ कुठे हि जात नाही मी आता",
लहानाचे मोठे मला फार लाडात केले
तुझ्या पोटाला चिमटे काढून मला घास तू भारावालेस,
माझे पोट भारता भारता उपाशी तू झोपत होतीस
बाळाला माझ्या भूक लागणार नाही याची काळजी तुला होती,
मी केलेल्या प्रत्येक चुकांना सामोरे तू गेलीस
माझ्या चुकांची शिक्षा हसत तू सहन केलीस,
जपून ठेवले मला येणाऱ्या प्रत्येक संकटापासून
कधीही दूर केले नाही मला तुझ्या मायेपासून,
आजारी मी पडताच रात्र-दिवस माझ्या जवळ बसायची
"लवकर बरा होशील बाळ" असे म्हणत मला तू गोन्जारायाची,
अजूनही आमच्यासाठी सतत तू झटत आहे
डोळ्यात आला आहे थकवा तरीही आमच्यापासून तू तो लपवत आहेस,
आई हाक मारत डोळ्यातील मातृत्व मला दिसते
बाळावरचे प्रेम पाहून डोळ्यात माझ्या हि पाणी येते,
देवासमान स्थान आई तुला आहे ...
नाही कोठेही तो स्वर्ग...तो तर तुझ्याच चरणी आहे,
जास्त काही नाही आई एक वचन करतो तुला
पूर्ण करीन क्षणं-क्षण तुझ्या त्या स्वप्नातला,
अशी हि आईची माया सतत मिळत राहावी
अशी हि आई देवा शतायुषी व्हावी.....दीर्घायुषी व्हावी........!
-----------शिरीष सप्रे (१-१२-२००९)----------
Dear Shirish Sir
ReplyDeletekharach khup chan kavita aahet tumchya
manala bharaun takal APRATIM KHUP CHAN Aasach kahi tari navin Det Raha