Monday, May 31, 2010

रात्र ती वै-याची होती...

अमावास्येच्या घनदाट काळोखी
दूर कुत्रे रडत होती
होत्या जाणवत यातना त्यांच्या
ती रात्र वै-याची होती..

पानांचा होणारा सूळसुळाट तो
कोणीतरी येण्याची सूचना होती
होता चंद्रही लपलेला त्यादिवशी
ती रात्र वै-याची होती..

ये- जा करणार्यांची ती वाट
आज जणू ओसाड होती..
नव्हती होत हिम्मत कोणाची
ती रात्र वै-याची होती..

पिंपळाच्या त्या झाडाखाली
एकटीच ती रडत होती..
होता आक्रोश तिच्या रडण्याचा..
रात्र ती वै-याची होती..

नव्हती मिळाली मुक्ती तिला
कोणाच्या आगमनाची प्रतीक्षा होती,
घेउनी बदला झालेल्या अन्यायाचा
मुक्ती तिला मिळवायची होती..

भंग पावत होती शांतता
किंकाळी त्याची दुमजत होती
मिळाली होती मुक्ती तिला आज
रात्र ती वै-याची होती....रात्र ती वै-याची होती...
--------------------शिरीष सप्रे(३१-५-२०१०)-------------

तिला तर दुसर्याची साथ आहे..

होते हसणे मजपाशी तुझे
खांद्यावरी डोके ठेवुनी रडायची,
आली वेळ जेव्हा प्रेमाला जपायची
केलीस तयारी माझ्या आयुष्यातून जायची..

माझ्या आवाजाने होती सकाळ तुझी
होत होता दिवसाचा शेवटही
नव्हते माहिती काय माझ्या नशिबी
होत होता माझ्या प्रेमाचा तेव्हा अंतही..

क्षणात एका दुनिया बदलली
प्रेमाने माझ्या बाजू फिरवली
धडकत होते हृदय जिच्यासाठी
तिनेच हृदयात तलवार खुपसली ..

सहज कशी नाही म्हणुनी गेली
हाथी एक प्याला थामवूनी गेली,
जाता जाता प्रेमालाही माझ्या
तू कल्पनेचे नाव ठेवुनी गेली..

आजही ती कल्पना वास्तवात आहे
वेडे हृदय तुलाच हाका मारत आहे
कसे समजावू त्यासी मी आज
तिला तर दुसर्याची साथ आहे...दुसर्याची साथ आहे...
--------------शिरीष सप्रे(३१-५-१०१०)------------

Friday, May 28, 2010

सावरकरांशी नतमस्तक होऊनी गेला..

होता अंधार चहुबाजूला
प्रकाशाचा किरण असा आला
चैतन्याचे वातावरण झाले सारे
जेव्हा सावरकरांचा जन्म झाला..

होती भूक स्वातंत्र्याची
नव्हता मनी कोणता विचार
देत होते लढा त्या इंग्रजांविरुद्ध
होते बनवले ज्यांनी देशाला लाचार..

होती लेखणीला अपार धार
वाचून लेख ते इंग्रजांवर होई वार
नव्हती पर्वा तुरुंगाची कधीही
होते जे पाठवायचे इंग्रजांना हद्दीपार..

स्वातंत्र्याचे ध्येय होते मनी
लढाच तो फक्त द्यायचा होता
शिकुनी लढ्याचे शिक्षण ते
इंग्रजांनाच धडा शिकवायचा होता..

पाहुनी ती देशभावना
सागरही न शांत बसला
ने मजसी ने च्या पुकाराने
सागराने हि लढा दिला ..

तो सूर्य आज एक
सोनेरी किरणे घेउनी आला
स्वातंत्राच्या पहाटी उगवताना
सावरकरांशी नतमस्तक होऊनी गेला...नतमस्तक होऊनी गेला..
-----------------शिरीष सप्रे(२८-५-२०१०)-----------------------

Tuesday, May 25, 2010

पूर्ण विराम दे आता...

किती रे पळशील तू सदा
जाऊन कुठे तरी थांब आता
पळकुटे पणाच्या सवयीला तुझ्या
पूर्ण विराम घ्यावा आता..

इतरांना तू सदा असा
फिरवत - फसवत राहिला
खोटे पणाच्या तुझ्या वागण्याला
पूर्ण विराम हा द्यायचा राहिला ..

उगवेल तेच जे तू पेरले
नशिबाला दोष का देतोस आता
तुझ्याच कर्माची फळे ती सारी
खोटेपणाला पूर्ण विराम घ्यावा आता..

ठेव हिम्मत स्वता मध्ये सदा
उभे आयुष्य बाकी आहे आता
देवही आहे पाठीशी उभा तुझ्या
लुच्चेगीरीला पूर्ण विराम दे आता...पूर्ण विराम दे आता...
----------------शिरीष सप्रे(२४-५-२०१०)---------------------

मुलींचे नखरे...किती करणार...

अनेकदा मुले आपल्या प्रेमाला विचारतात आणि मुली अशी उत्तरे देतात....हि कविता कोणाला हि दुखी करायच्या उद्देशाने केली नसून ती एक कविता आहे हे समजून वाचावे....शिरीष सप्रे


विचारावे कधी भेटशील का आज
"ना "च्या पाढ्याने असते सुरुवात..

जावे का ग आज कुठे जेवायला
नाहीरे पोटात जागा माझ्या काही खायला..

चल आज आपण पिक्चर ला तरी जाऊ
कशाला तो पिक्चर बघण्यात वेळ घालवू..

अरे पहिली वाट तुझ्या फोन ची मी
अरे नव्हता Balance ...नाहीतर केला असता फोन मी..

का ग आजकाल तू माझ्याशी बोलत पण नाहीस..
अरे थकलेली असते रे..वेळच मिळत नाही..

किती अशी नाटकी तुम्ही सदा करणार
प्रेमी आमुच्या सारखे फक्त वाट पाहणार....फक्त वाट पाहणार .....
---------------------शिरीष सप्रे(२५-५-२०१०)-----------------