Thursday, June 2, 2011

आजही आठवतो...पहिला पाऊस

तो पहिला पाऊस...
.
.
खूप काही सांगून जातो,
मातीचा ओलावा, आठवणीना जागवतो...
उल्हासित करीतो वातावरणास या
ओठांवरी हास्य खिलवूनी तो बरसतो...

आजही आठवतो...पहिला पाऊस
.
.
पावसाच्या त्या सरीत
लखलखत्या विजेसारखे हास्य तुझे
ओठी दवबिंदू पावसाचे
एकटक पाहणारे नयन माझे...

आजही आठवतो...पहिला पाऊस
.
.
सुगंध मातीचा दरवळणारा
पावसात रूप तुझे खिलवणारा
शोधती नजर तुजवर खिळवणारा
मनास या वेड लावणारा...

आजही आठवतो...पहिला पाऊस
.
.
हट्ट तुझा पावसात भिजायचा
नकार माझा तुला सतवायचा
क्षणात विचार बदलूनी मी अन
हास्य तुझे पाहुनी..पाउस ही बरसायचा...

आजही आठवतो...पहिला पाऊस
.
.
बेधुंद होऊनी तू भिजायची
चिंब भिजुनी...मिठीत यायची
आपल्याच विश्वात तू रमायची
प्रेमाची ती सर हर्षाने बरसायची...

आजही आठवतो...पहिला पाऊस
.
.
सुगंध ही मातीचा तसाच आहे
गोडवा पावसाचा ही तोच आहे
चिंब भिजुनी मिठीत येणारी तू
आज मिठीत...तुलाच मी शोधत आहे...तुलाच मी शोधत आहे..
---------शिरीष सप्रे(--२०११)---------

No comments:

Post a Comment