भेटी- गाठी , प्रेम बंध कथा या
मी हि ऐकल्या होत्या..
नाती असतात जन्मो जन्माची
विश्वास मनात माझ्या होता..
अनोखे नाते आमुचे असे..
ना कधी एक-मेकास पाहिलेले
बंधने हृदयाची जुळली होती सारी
स्वर हि त्यात गुंतलेले...
आतुरता मनाची सदा
आवाज ऐकण्यास लागलेली..
उत्सुकता त्या वेड्या मनाची
एका फोन साठी असलेली...
अंतर ते फक्त शहरांचे होते
जवळ असल्याचे भास होते...
मन हे वेडे असे गुंतले होते..
शब्दातुनी फक्त प्रेम बहरत होते...
एकत्रित राहण्याचा निर्णय नव्हता
एक-मेकां शिवाय विचार हि करवत नव्हता
प्रीतीचा डोर असा बांधला होता..
हास्य सदा खिलत राहावे..प्रार्थनेत या होता...
वास्तवात भेटण्याची वेळ आमुची
नियतीने बहुदा ठरवली नव्हती
स्वीकारला होता निर्णय नियतीचा
नयनात मात्र प्रतिमा झळकत होती...
अनोखे बंधन आमुचे असे
जगास या कधी न कळले..
नयनात चेहरा ठेवुनी आम्ही
आठवणींचे पिंपळपान...आजही जपले....
----------शिरीष सप्रे(२६-५-२०११)------------
No comments:
Post a Comment