Sunday, February 27, 2011

आज पुन्हा मला प्रेम होत आहे...

शब्द दडले होते माझे
आज पुन्हा मजसी दिसत आहेत
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा प्रेम मला होत आहे

भावना सुखद प्रेमाची ती
आज पुन्हा मनी दाटत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे

विचार मनातील सारे माझ्या
आज काव्यात उतरत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे

प्रेमाचा गंध हृदयाला स्पर्शुनी
मन उल्हासित आज करत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे

सुखद स्पर्श मनाला आज असा
चटका लावूनी खिलवत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे

प्रेमाची साथ सदा सोबत राहावी
साथ तुझी भावी कधी न सुटावी
मागणी प्रेमाला घालत मी आहे
ना ठाऊक मलाही....आज पुन्हा मला प्रेम होत आहे
------------शिरीष सप्रे(२७-०२०२०११)-------------

1 comment:

  1. आज पुन्हा मला प्रेम होत आहे...
    sundar kavita

    ReplyDelete