नजरांचे भाव असे बोलू लागतात
नयने ही हजार स्वप्ने रंगवू लागतात
ओठांवरील शब्द डोळ्यातुनी व्यक्त होतात
नयनातुनीच प्रेमाचे इशारे सुरु होतात...
खेळ हा शब्दांचा असा जणू रंगतो
बेरंगी जीवनात रंगांची उधळण करतो...
स्वप्ने प्रेमाची अशी सजू लागतात
प्रेमात वास्तविकता विसरण्यास भाग पाडतात...
खेळ शब्दांचा कधी न समजण्यास येतो
अग्निपरीक्षा प्रेमाची देण्यास सदा प्रेमी भुलतो...
क्षणात विरहाचे असे वादळ उठते
साता जन्माचे वचन काही महिन्यात तुटते...
प्रेमाच्या या जगात प्रेमाचाच लिलाव होतो
अशा या प्रेमाचा रोज एक तरी बळी दिला जातो...
स्वार्थी या दुनियेतुनी प्रेम आज हरवत आहे
प्रेमाच्या या बाजारात प्रेमाचाच खेळ मांडत आहे...प्रेमाचाच लिलाव होत आहे
---------------शिरीष सप्रे(१३-०२-२०११)--------------
hmmm nice one
ReplyDelete