मेळ शब्दांचा प्रेमाशी
प्रयत्न तसा कठीण होता
रेखाटायच्या होत्या भावना
त्या "डायरी" चाच साथ होता...
मनातील भावना मनातच
बोल प्रेमाचे ओठी अडकायचे
व्यक्त होते करायचे प्रेम सारे
अखेरीस शब्द डायरीतच राहायचे...
डायरीतील प्रत्येक पानात तिच्या
माझ्याच तक्रारींची गोष्ट होती
तक्रारीतही पाने रंगुनी जायची
भावना प्रेमाची रेखाटत ती होती...
संवाद तिचा सदा डायरीशी असायचा
ज्या भावनांना बांध ती घालायची
डायरीही तिला सदा विचारायची
का ग तू त्याची तक्रार लिहायची...?
घेईल तो ही समजुनी मजला
आशेने या भावना रंगवायची
पहिले होते मी ही प्रेम तिचे
सुरुवात अन शेवट माझ्याच नावाने करायची...माझ्याच नावाने करायची...
---------शिरीष सप्रे(२६-६-२०११)---------------
kavita avadali.
ReplyDelete