Wednesday, July 13, 2016

हाच तो सेल्समन...!

आपल्यापैकी कित्येक तरुण किंवा पुरुष मंडळी अथवा स्त्रिया सेल्स च्या जॉब ला असतात. काही फ्रेशर तर काही एक्सपीरियन्स असतात. अनुभवायचे असते ते सेल्स टार्गेट आणि ते मिळवण्यासाठी सारे झटत असतात. मी ही स्वतः सेल्स मध्ये आहे, टार्गेट किंवा खाजगी अनुभव यावर केलेली एक छोटी शब्दरचना.   तसेच खूप काही शिकवणाऱ्या सेल्स फिल्ड ला माझी मनपूर्वक वंदना. 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हो..  हाच तो सेल्समन 

.   
सकाळ त्या बिजनेस च्या विचाराने 
दिनक्रम रिमाइंडर्स ने होतो  
क्लाईण्ट विझीट चे शेड्युल असते डोक्यात 
अडकावुनि बॅग खांद्यावरी, दिवसाची सुरुवात करतो...! 


हॅलो सर, गुड मॉर्निग सर, हॉऊ आर यू  बोलत 
आपल्या कंपनीचे इंट्रो तासन तास देतो 
विचारांचे  चक्र असते मनात चालू बोलताना  
सेल्स टार्गेट साठी जणू जीवाची पराकाष्ठा करतो...!

हो..  हाच तो सेल्समन 


कधी ईमेल, कधी व्हॉट्स अँप तर कधी कॉल 
फॉल अप चे चक्र त्याचे सदा चालू असते 
सेल्स टार्गेट चे आकडे असतात डोळ्यासमोरी 
नव नवीन युक्तींचे मार्ग शोधण्यास धडपडत असते...!  

सांभाळायचे असते नोकरीस स्वतःच्या त्याला 
सोबत नात्यांची गुंतता ही सोडवायची असते  
संपतो तो दिवस सेल्स ऍक्टिव्हिटी संपवण्यात  
स्वतःच्याच विचारांसाठी मात्र मनाची साथ नसते...! 

हो..  हाच तो सेल्समन 


बोलका स्वभाव ठेवुनी सदा, हसत तो राहिला 
गुंते आयुष्यातील पदोपदी सोडवत राहिला 
अनुभवले विविध रंग अनेक माणसांचे 
सामोरील परिस्थितीशी सदा तो झगडत राहिला...! 

संकटावरी मात करण्यास सेल्स ने शिकवले 
मन लोकांची जपण्याचे गणित सोडवले  
काठिण्यात ही हास्य ठेवुनी चेहऱ्यावरी 
उत्तम सेल्समन चे अखेरीस पदक त्याने पटकावले...! 

आहे अभिमान आज सेल्समन असल्याचा 
शुन्यातुन ही जग निर्माण करण्यास शिकवले 
ना विसरुनी नाती गोती आयुष्यातील 
एक श्रेष्ठ व्यक्तीस या सेल्स ने घडविले..... या सेल्स ने घडविले...!
---------------शिरीष सप्रे(१३-०७-२०१६)--------------

Tuesday, July 12, 2016

वयाची ६०ठी ...!

आपल्यातील कित्येक नातेवाईक आज ६०ठी ला आलेत, किंवा येतील. जीवनाच्या या मार्गावर त्यांनी खूप काही सोसले, अनुभवले पण सदा हसत खेळत साऱ्याच्या मनास त्यांनी जपले. नात्याची खरी किंमत त्यांच्या मुळे आपणास कळली. ही कविता त्या सर्व थोर अनुभवी व्यक्तींसाठी मानवंदना..!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आयुष्याची पाने रंगवताना 
एक विचार मनी चटका लावूनी गेला 
नजरेसमोर उभी राहिली चित्रे सारी  
डोळ्यांनी स्वतःचा लघुपट जणू पहिला...! 

आहे आनंदात आजच्या दिवशी सारे 
समारंभ साठीचा साजरा करण्यास 
भारावले मन माझे पाहुनी प्रेम तुमचे  
आलात आवर्जूनी सारे तुम्ही आशीर्वाद देण्यास...! 

आजच्याच दिवशी सुरू झाले बालपण 
ते आज साठी वरी मी आले 
विविध भूमिका जीवनातील रंगवताना    
वयाचे जणू भानही ना राहिले...! 

मुलगी म्हणुनी जन्म घेताना 
चाली-रीतींचे दडपण मनी होते 
जपायचे होते सर्व नात्यानाही 
मने जोडलेली माणसे, हेच तर कमवायचे होते...! 

कधी मुलगी, वेळप्रसंगी मुलगा 
कधी बहीण तर कधी अर्धांगिनी 
बनुनी कधी सून तर आजी बनुनी 
पैलू जीवनातले रेखाटायचे होते...!  

जिवनाच्या नागमोडी मार्गावर चालताना 
अनेक चढ उतार अनुभवले 
लाभली साथ तुम्हा सर्वांची वेळप्रसंगी 
त्या नात्यानीच आयुष्य बहरले...! 

मानते आभार त्या देवाचे आज 
अनमोल माणसे नात्यात गुंफली 
जीवनाची कळी खुलताना 
सुख अन आनंदाने त्यासी जपली...! 

दाटलेत आनंदाश्रू नयनी आज 
तुम्हा सर्वांचे प्रेम पाहुनी 
लाभुदे साथ सदा तुमची 
मानते आभार तुमचे मनापासूनी...!
-------------शिरीष सप्रे (१२-०७-२०१६)--------  
  

Monday, July 4, 2016

नियती...!


कधी कधी प्रेम न बोलता खूप काही बोलून जाते.. आपल्यातील अनेकांना अशा प्रेमाचा अनुभव आला असेल. हृदयाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात ते प्रेम नक्कीच दडले असेल. ही कविता त्या सर्व दडलेल्या प्रेमासाठी, प्रेम करणाऱ्यांसाठी.. !
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

त्या एका रम्य संध्याकाळी 
समुद्र किनारी चालत आपण होतो 
होती भेट पहिली आपुली 
शब्दांपेक्षा नजरेतूनी  बोलत होतो...! 

होता संवाद वर्षा पूर्वीचा 
भेट मात्र झाली नव्हती 
आवाज ऐकुनी एक-मेकांचा 
प्रतिमा हृदयी कोरली होती ...! 

हाथ पुढे सरकवत तू मजला 
डायरी हाथी थमावलीस.. 
होते वर्षभराचे संवाद त्यात 
अन तुझ्या मनाची बाजू तू मांडलीस...!    

कोरे ठेवले होते पान अखेरचे 
नियतीस तू लिहिण्यास सांगितले होते 
उसळली लाट जीवनात अशी 
अन किनारे आपुले वेगळे होते...! 

ना सुटली साथ त्या वादळात ही  
अनेक कारणांनी एकत्रित आपण होतो 
भिन्न  किनारी राहुनी आजही  
एकत्र येण्यासाठी धडपडत होतो...! 

ना अवलंबूनी नियतीवरी आज मी 
गुपित मनातील सांगायचे आहे 
गुंफूनि शब्दांना कवितेतून आज 
अबोले बोल ऐकवायचे आहे...! 

आहेत चढ उतार आयुष्यात माझ्या 
सोबत प्रत्येक क्षणात तू असशील का? 
नसते भान स्वतःचे मजला अनेक प्रसंगी 
बनुनी ताकद माझी, साथ मजला देशील का? 

आहे सामर्थ्य जग जिंकायचे माझ्यात 
एक फक्त तुझ्या साथीची गरज आहे 
करीन  मात अनेक कठीण प्रसंगावरी 
नियतीहुनी जास्त तुझ्या सोबतीची आस आहे... तुझ्या सोबतीची आस आहे...! 
------------शिरीष सप्रे (४-०७०२०१६)------------

Monday, December 14, 2015

लेखणीस हि त्या, पूर्ववत धार असेल…!

आज स्वताचा ब्लॉग वाचताना वाटले, खूप काही मी भुलवले आहे. कामाच्या ओघात इतका वाहत गेलो कि, लिहायला हि मी विसरलो आहे. खूप काही विचारानंतर पुन्हा लिहायचा प्रयत्न करत अहे. बघू शब्दांची सांगड कितपत जमलीये ते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज तो…ती संध्याकाळ…कोणा एक विचार
मेळ शब्दांचे जणू …आज काही बसत नव्हते
लिहावयाचे होते बरेच काही असे
शब्द रेखाटण्यास हाथ धजत नव्हते…!

होते लिहिलेले गतकाळी खूप काही
विसर आज त्या साऱ्याचा पडला होता
होती धारेधार लेखणी त्याची अशी जणू
आज बोथट कलमाने शब्द गिरवत होता…!

होती अपेक्षा सर्वांसी अशी तेव्हा
कवितांचा अथांग सागर तो भरेल
गेला वाहत काळाच्या ओघात असा
आज एक एक शब्द मांडण्यास तो धडपडेल…!

काहूर विचारांचे मनी असे
हृदयी दुख लपवले होते
न मांडले सुख दुखास कधी
शब्द आज सारे हरवले होते…!

उलगडले कोडे आज त्यांचे असे
कवितेचा विचार मनी चटका लावूनी गेला
अस्तित्व शोधण्यास स्वताचे आज तो
शब्दांशी पुनः तडजोड करू लागला…!

लिखाण्याच्या त्या शैलीवरी त्याच्या
विश्वास, आज हि हृदयी ठाम आहे
ओहोटी ने कोरड पडलेल्या सागरास
भरतीची लाट उसळायची आस आहे…!

खवळेल तो अथांग सागर पुन्हा
अशांत असे रुद्र रूप असेल,
नांदतील शब्द पुनः त्याचे कागदी
लेखणीस हि त्या, पूर्ववत धार असेल…पूर्ववत धार असेल…!
--------------- शिरीष सप्रे (१४-१२-२०१५)--------------------

Saturday, March 28, 2015

दिवस उद्याचे माझेच आहे…!

गजबजलेला तो रस्ता होता 
येणार्या जाणाऱ्यांची वर्दळ होती 
कानात गाण्यांचे आवाज घुमत होते 
वाट मात्र ती एकांताची होती…  

भाव चेहऱ्यावर गोंधळलेले 
खांद्यावर ती एक बेग होती   
चालत होता स्वताच्या धुंदीत तो 
येणार्या जाणाऱ्यांची फिकीर त्यासी नव्हती… 

हो तोच तो कवी चालत होता 
धुंदीत स्वताच्या वाटेस तुडवीत होता 
नव्हते माहिती कोठे जायचे होते त्याला 
एकांतात आज तो अडकलेला होता… 

वाचल्या होत्या त्याच्या कविता मी 
कधी आई वरी, प्रेमावरी तर कधी नोकरी वरुनी 
विविध शैलीतुनी लिहिणारा तो आज 
मावळत होता त्या एकांता वरुनी… 

काय कोणत्या विचारांचे काहूर 
त्याच्या मनी घोळत होते 
आसवे नयनी दाटली होती त्याच्या 
भाव ही चेहऱ्यावरील अबोल होते… 

मिश्किल हसला मजकडे पाहून 
पुसले त्यासी मी, न रहावले मला 
उत्तरला ते  वादळ, एका वाक्यात सहज  
स्वार्थी दुनियेने आज हरविले मला… 

खांद्यावरी माझ्या हाथ ठेवुनी 
वदला, काळ आज वेगळा आहे 
शोक हा दुखा चा आज पुरता 
सुखाचे दिवस उद्याचे माझेच आहे…दिवस उद्याचे माझेच आहे…
-------------शिरीष सप्रे (२८-०३-२०१५)------------