Saturday, March 28, 2015

दिवस उद्याचे माझेच आहे…!

गजबजलेला तो रस्ता होता 
येणार्या जाणाऱ्यांची वर्दळ होती 
कानात गाण्यांचे आवाज घुमत होते 
वाट मात्र ती एकांताची होती…  

भाव चेहऱ्यावर गोंधळलेले 
खांद्यावर ती एक बेग होती   
चालत होता स्वताच्या धुंदीत तो 
येणार्या जाणाऱ्यांची फिकीर त्यासी नव्हती… 

हो तोच तो कवी चालत होता 
धुंदीत स्वताच्या वाटेस तुडवीत होता 
नव्हते माहिती कोठे जायचे होते त्याला 
एकांतात आज तो अडकलेला होता… 

वाचल्या होत्या त्याच्या कविता मी 
कधी आई वरी, प्रेमावरी तर कधी नोकरी वरुनी 
विविध शैलीतुनी लिहिणारा तो आज 
मावळत होता त्या एकांता वरुनी… 

काय कोणत्या विचारांचे काहूर 
त्याच्या मनी घोळत होते 
आसवे नयनी दाटली होती त्याच्या 
भाव ही चेहऱ्यावरील अबोल होते… 

मिश्किल हसला मजकडे पाहून 
पुसले त्यासी मी, न रहावले मला 
उत्तरला ते  वादळ, एका वाक्यात सहज  
स्वार्थी दुनियेने आज हरविले मला… 

खांद्यावरी माझ्या हाथ ठेवुनी 
वदला, काळ आज वेगळा आहे 
शोक हा दुखा चा आज पुरता 
सुखाचे दिवस उद्याचे माझेच आहे…दिवस उद्याचे माझेच आहे…
-------------शिरीष सप्रे (२८-०३-२०१५)------------ 

No comments:

Post a Comment