Thursday, April 17, 2014

आज या भक्ताने तुला ललकारले होते…

सांग मला. . . 

आलोय आज तुझ्या चरणी
असंख्य प्रश्नांचे ते गाठोडे घेउनि
आहेत सोडवायची कोडी आज मजला
का बसला आहेस तू कठोर बनुनी. . .


सांग मला. . . 

काय कमतरता होती भक्तीत माझ्या
नैराश्यचे पारडे माझ्या पदरी पाडलेस
तरीही विश्वास ठेवला होता तुजवरी सदा
या भक्ताचे गाऱ्हाणे एकदाही न तू ऐकलेस. . . 


सांग मला. . . 

पाया कुटुंबाचा बनायचे होते मजला
तुझ्या आशीर्वादाची याचना फक्त होती
न मागितले काही, कष्ट ते माझे होते
ना लाभली कृपादृष्टी, नजर तू फिरवली होती. . .


सांग मला. . . 

जन्मो जन्माचा ऋणानुबंधनाचा सोहळा
तुझ्याच इछेचा तो भाग होता
सात जन्मांच्या वचनाचा तो खेळ
सात दिवसही ना टिकला होता. . . 


सांग मला. . . 

तुझीच इच्छा आहे समजुनी मी
नव्याने पुन्हा सुरुवात केली
बदलले शहर, सोडले घरासी त्या
तरीही मजला तू साथ ना दिली. . . 


सांग मला. . . 

आहे वास्तव्य तुझे खरे दुनियेत
का दगड बनुनी तू उभा आहेस
पडले माझी कष्ट, भक्ती कमी कुठे
कि माझ्यापासूनच तू असा आज दुरावला आहेस. . . 


या दगडाच्या इमारतीत माझे
शेवटचे तुझ्याकडे येणे होते
हसुनी झेलीन तुझ्या वक्र दृष्टीस आत्ता
आज या भक्ताने तुला ललकारले होते…तुला ललकारले होते…


---------------------शिरीष सप्रे (१७-०४-२०१४)---------------------- 
 

No comments:

Post a Comment