Monday, April 16, 2012

कवितेत आज रंगले होते....

तासा भराचा प्रवास आज
काळा सारखा वाटत होता
घड्याळातील सेकंद काटाही
तासा तासा ने सरकत होता...

अनोळख्या भेटीसाठी ओढ ती
वेड्या मनास आतुरतेने होती
असंख्य विचारांचे जाळे मनात तरीही
हास्याची कळी ओठी खिलत होती...

दरवाजाची बेल वाजवता तिच्या
स्पंदने हृदयाची वाढली होती
उत्सुकता तिच्या भेटीची एकीकडे
अन निराशा चेहर्यावरी दिसत होती...

कवडस्यातुनी येणाऱ्या सोनेरी किरणांपेक्षा
शीतल चांदण्या सारखे कोमल हास्य तिचे
नजर खिळली होती त्या चंद्र मुखावरी
सैर भैर धावणारे मन झाले होते वेडेपिसे...

पहिल्या नजरेतील प्रेमाची गोष्ट
अनेकदा कानावरी आली होती
विश्वास बसला होता कथेवरी त्या
माझ्याही कथेची सुरुवात आज होती...

औपचारिक बोलणे सुरु झाले होते
नयन मात्र त्या हस्यावारी खिळले होते
संभाषणातील बोल इतके रंगत होते
वेडे हृदय मात्र तिच्याच विचारात होते...

उभ्या आयुष्यासाठीचा तो निकाल
त्या तीन तासात शक्य नव्हता
एक मेकास जाणून घेण्यास त्यांना
तो दिवस ही आज पुरेसा नव्हता...

दोन वेगळे रस्ते दोघांचे ते
एकत्र आज होणार नव्हते
त्या कवितेसाठी शब्द मात्र
त्या कवितेत आज रंगले होते...कवितेत आज रंगले होते....
------------शिरीष सप्रे(१६-४-२०१२)-------------------


Monday, January 30, 2012

फोटो मधुनी मी ही रडत होतो..

दिवसाची सुरुवात उशिरा झाली
सकाळची आज दुपार झाली
आईसही हाक मारुनी झाली
आईने हाकेस ओ ही न दिली...

डोळ्यात तिच्या पाणी होते
अश्रू घळा घळा वाहत होते
हजार प्रश्न विचारले तिला
एकही प्रश्नास तिने ऐकले नव्हते...

भावाला विचारण्यास मी धावलो
त्या अश्रुनी मी होतो दुखावलो
अनेक प्रश्न त्याला ही विचारले
एका प्रश्नालाही त्याने न उत्तरले...

वडील ही अश्रू लपवत होते
कठोर मनास धीर देत होते
दुख त्यांसी सतावत होते
मनोबल त्यांचे ही खचले होते...

हताश मी उतारांच्या शोधात
न उलगडलेल्या कोड्याच्या उत्तरात...
.
.
अचानक नजर भिंतीवर गेली
फुलांच्या हारांनी सजवलेली
माझीच फोटो फ्रेम मजला दिसली...
.
.
अश्रुंचे त्यांचे कारण समजले
न उलगडलेले कोडे सुटले
दोन दिवसापूर्वी चे क्षण होते
अन आज मात्र जीवनच संपले...

कोणत्या गुन्ह्याची ती शिक्षा होती
अनेक जबाबदारी उचलली होती
वेळेशी अलिखित शर्यत अशी होती
समाप्त आधीच, सांगता माझी होती...
.
.
नजरेने सारे मी पाहत होतो
वाटूनही अश्रू पुसू शकत नव्हतो
अधुर्या स्वप्नांसाठी भटकत होतो
आज फोटो मधुनी मी ही रडत होतो..फोटो मधुनी मी ही रडत होतो..
--------शिरीष सप्रे(३०-१-२०१२)---------------


Thursday, October 13, 2011

बंधन हि अखेरच्या क्षणा पर्यंतची...

मैत्रीचा धागा हा आपुला
नकळत असा जोडला
तूच पाठीराखा माझा
होता
दुखणं माझे स्वतावरी घेत होता ...

नकळत तुजसी दुखावले मी
अनेकदा अपशब्द वापरले मी
न घेतले मनी माझे बोलणे
सदा सुखात नान्दलो मी ...

दुखांचा डोंगर बनुनी तू
सदा स्वतासी चटके सोसले
सुखाचे क्षण माझ्या पायी नांदले
बनुनी दैव तुजला..माझ्या जीवनी पाठवले...

साथ तुझी जन्मो जन्माची
मैत्री आपुली अखेरच्या श्वासा पर्यंतची..
गिरवतील धडे मैत्रीचे आपुल्या
बंधन हि अखेरच्या क्षणा पर्यंतची...
--------------शिरीष सप्रे(१३-१०-२०१०)-----------

Friday, October 7, 2011

आयुष्य सुंदर बनू शकते ...

कोण्या एका एकांतात
एक विचार मनी चटका लावूनी गेला
रोजच्या या धावपळीत आज
मनुष्य जगायचेच विसरुनी गेला...

आजही आठवतो आई जवळील तो हट्ट
एका चॉकलेट साठी गाल फुगवुनी बसण
मायेने तिने आपला हट्ट तो पुरवण
आज त्याच माउली साठी दोन मिनिटही नसण...

आठवते आजही एकत्र ते शाळेत जाण
टिंगल - टवाळ्या करत दंगा घालण
एखाद्या मित्राने रुसण अन सार्यांनी मनवण
आज त्याच मित्रांसाठी जराही वेळ नसण...

खिशातील ती मळकट दहा रुपयाची नोट
एक एक बिस्किटा साठी असलेली चढा-ओढ
आज दहा ऐवजी दहा हजार रुपये खिशात असण
पण त्या आनंदात हि मनाचे ते एकांतात रडण...
.
.
.
नाती-गोती सारी आज पैशापुढे लहानशी झाली
पैशानेच आज आनंदाची विक्री झाली
विसरला मनुष्य गोडवा त्या नाजूक बंधनांचा
पैशाच्या मोहातच एक-मेका पासुनी दूर झाली...

जागा हो आत्ता तरी वेळ अजूनही हाथी आहे
दुरावले असली नाती सारी..लोक मात्र आपलीच आहे
प्रेमाचे ते बोल तुझे नात्यांना पुन्हा जोडू शकते
आपल्या लोकांच्या सहवासातच...आयुष्य सुंदर बनू शकते
--------शिरीष सप्रे(६-१०-२०११)---------------




Thursday, June 30, 2011

तिचा वाढदिवस ....

शब्दात आज मांडू कसे
खास असा आजचा दिवस
जीव लावला आहे तुजवर
आज त्या परीचा वाढदिवस...

सुख-शांती, हास्य आनंद
चरणी सदा तिच्या नांदो
दुखाने ही रस्ता भुलावा
आयुष्य तिचे बहरत जावो...

चंद्रालाही ईर्ष्या व्हावी
रुप तिचे असेच खिलावे
ना पडावी दुखाची सावली
हास्य ओठी सदा खिलावे...

अभिनंदन माझे आज फक्त
कवितेतच अडकुनी राहिले
ना जाणले तू ही देवा कधी
तिच्याविना कसे दिवस लोटले...

साथ या जन्मापुरती मजला
हीच तर मागणी केली होती
हास्याची चंद्रकोर अशीच बहरावी
हीच इच्छा या वेड्या मनाची होती...

योग विरहाचा मजला दाखवला
तिच्या सुखाची हमी मजला दे
खिलत राहील हास्य ओठी सदा
हेच वचन तू मजसी दे...वचन तू मजसी दे....
-------------शिरीष सप्रे(३०-६-२०११)-------------