Wednesday, November 24, 2010

लिहायला विषयच मात्र मिळत नव्हता...

वहीची पाने आज फडफडत होती
लिहावे काहीतरी..इशारा असा करत होती

शब्दही आज रुसले होते
स्वताच्या अर्थापासून आज दूर गेले होते

मनात विचारांचा गोंधळ होता
शब्दांना काव्यात गुंफण्याचा मेळ घडत नव्हता...

काहीतरी लिहिण्याची इच्छा मनात दाट होती
लिहावे कशावरी..याचीच खात्री मनाला होत नव्हती...

मनातील विचारांना आज नवा सूर गवसला होता
काव्यात मांडताना शब्दांची लय तो बिघडवत होता...

मनात विचारांचे काहूर माजले होते
मनातून उतरवायला शब्द मात्र उमजत नव्हते...

लेखणी हातातील लिखाणास आतुरली होती
लिहावे कसे...शब्दांनीही आज साथ सोडली होती...

वेड्या मनाने माझ्या, आज कहर केला होता
लिहायचे होते फार काही..पण लिहायला विषयच मात्र मिळत नव्हता...विषयच मात्र मिळत नव्हता...
------------------शिरीष सप्रे(२४-११-२०१०)-----------------

Sunday, November 7, 2010

शेवटची कविता मी लिहिली...

गुंफला होता शब्द प्रेमाचा
आज शब्द तो अधुरा राहिला...

होतो लिहित कहाणी प्रेमाची
आज कहाणी ती अधुरी राहिली...

प्रेमाच्या सागरात नौका आपल्या नावाची सोडली
अर्ध्या वाटेत नौका ही आज बुडाली...

तयारीत होता सूर्य नवी पहाट आणायला
काळोख्या रात्रींशी मैत्री माझी झाली...

डोळ्यात स्वप्नांची उमेद नवी होती
जागा त्या स्वप्नांची अश्रूंनी आज घेतली...

हसत पाहायचो वास्तवात सदा मी
आज तीच एक आठवण बनुनी राहिली...

लिखित होता विरह नशिबी माझ्या
नशिबाच्या विरोधात प्रेमाची हाव मी केली...

जुळवत होतो शब्दांना प्रेमाच्या भावनेसाठी
त्या शब्दांनीच आज प्रेमाची सांगता केली...

जुळणार नाही शब्द कवितेसाठी..न मिळणार साथ पुन्हा कधी
उरली साथ काही क्षणांपुरती ...अन...
शेवटची कविता मी लिहिली... शेवटची कविता मी लिहिली...
-----------------शिरीष सप्रे(०७-११-२०१०)--------------------------

Sunday, October 31, 2010

आज ती ही परतली...

आठवणी काही लपल्या होत्या
मनात माझ्या दडल्या होत्या...

विचार मनात एकच असायचा
तो विचारही मी थांबवला होता...

एकांत मी जीवनी गाठला होता
माझ्याच नशिबाला दोष दिला होता...

गार्हाणे माझे देवाने आज ऐकले
बसला नाही विश्वास, प्रेम माझे परतले...

शेवटची भेट ध्यानात ठेवली होती
आठवण तिची तशी रोज येत होती...

स्वप्न माझे वास्तवात दिसत होते
आज प्रेम माझे परतुनी येत होते...

येईल का पुन्हा ती प्रश्न हा मनी होता
ती परतण्याचा विचार माझ्या ध्यानीही नव्हता...

माझ्या प्रेमाची आर्तता तिला कळाली
तोडूनी बंधने सारे आज मजकडे ती परतली...

खर्या प्रेमाची परीक्षा देव घेत असतो
प्रेमाच्या पावित्रतेला सदा तो पारखत असतो...

आनंदाची लहर अशी जीवनी माझ्या आली
प्रेमाच्या कळीची आज फुले झाली...

प्रेमाची साथ मी कधी ना सोडली
प्रेमाला साथ द्यायला आज ती ही परतली...आज ती ही परतली...
------------शिरीष सप्रे(३१-१०-२०१०)----------------

Tuesday, October 19, 2010

ONLINE प्रेम करणारा प्रेमी मीच आहे...

G - TALK वर माझ्या असा एक ping आला
भटकलेल्या वाटसरूला जसा नवा रस्ता मिळाला...

तास तास वाट ती ONLINE येण्याची पाहायचो
तिच्याशी गप्पा मारताना वेगळ्याच दुनियेत मी जायचो...

महत्वाची कामे सारी बाजूला सरायची
सखी ONLINE आली कि शब्दांचीही कविता बनायची...

ऑफिसात धाव माझी तिच्याशी CHAT करण्यास असायची
ऑफिसच्या कामांना कसली हो घाई असायची...

दुखाची ओझी सारी कधी जड वाटायची..
तिच्याशी ONLINE बोलताना हास्याची कळी गाली उमलायची...

तिला SMILEYS पाठवताना हुरहूर मनाला लागायची
वेडे मन माझे तिच्या SMILEY ची आतुरतेने वाट पहायची...

चे ठोके पडताच तिच्या OFFLINE जाण्याची भीती असायची...
रात्र तिच्याच विचारात घालवत ती ONLINE येण्याची वाट पहायची...

कधी ही पाहिलेल्या व्यक्तीवर अशी प्रीत जडावी...
अशी ONLINE सखी अचानक काळजाला भिडावी...

INTERNET या अशी जादूची छडी फिरवली
स्वप्नांच्या दुनियेतील तिच्याशी ONLINE भेट घडवली...

सौंदर्यावर भूळूनी प्रेम करणारे..प्रेमी असे खूप आहे..
पण ONLINE प्रेम करणारा प्रेमी मात्र मीच आहे...प्रेमी मात्र मीच आहे...
-------------शिरीष सप्रे(१९-१०-२०१०)-----------------------

Thursday, October 14, 2010

आलो मी परतुनी...

आलो मी परतुनी
शब्दांना कवितेत मांडाया..

आलो मी परतुनी
हृदयाची तार छेडाया..

आलो मी परतुनी
प्रियेला प्रीत सांगाया..

आलो मी परतुनी
सुखांना कंठी बांधाया..

आलो मी परतुनी
अश्रू ते सारे पुसाया..

आलो मी परतुनी
हास्य ओठी आणाया..

आलो मी परतुनी
जीवनात रंग भरावया..

आलो मी परतुनी
स्वप्नांना त्या बांधाया..

आलो मी परतुनी
एक गोड स्वप्न बनाया...एक गोड स्वप्न बनाया.....
-------------शिरीष सप्रे(१४-१०-२०१०)-----------------