Sunday, March 14, 2010

सुख ते माझ्या नशिबात नाही...

करू किती ती तडजोड मी ..
मलाच माझे समजत नाही..
येते अपयश चौबाजूनी..
सुख ते माझ्या नशिबात नाही...

नावाला ती मोठी डिग्री..
आहे माझ्या नावा आधी..
वणवण फिरतो नोकरीसाठी रोज मी..
सुख ते माझ्या नशिबात नाही...

केले प्रेमही एकदाच मी..
केले समर्पित सर्वस्व तिच्यासाठी..
गेली सोडूनी तीही मला आधी ..
सुख ते माझ्या नशिबात नाही...

ठरवले ठेवायचे सुखी मी..
माझ्या जन्मदात्यांना नेहमी..
बनलोच कारण मी त्यांच्या दुखाना..
सुख ते माझ्या नशिबात नाही...

अपयशाचा तो डाग घेउनी..
खात आहे ठोकर पावलो - पावली..
दाखवी नियतीही दुखाचे ते चित्र..
पण सुख ते माझ्या नशिबात नाही...सुख ते माझ्या नशिबात नाही...

----------------शिरीष सप्रे(१४-३-२०१०)------------------------

Thursday, March 11, 2010

नक्की तुम्ही कविता वाचता का..?

का पाहता आधी नाव त्याचे..
मग वाचायची का ती कविता
असा विचार तुम्ही करता का..?
नक्की तुम्ही कविता वाचता का..?

असेल ती कविता..
एका मुलीने केलेली ..
करायला तिला इम्प्रेस..
तुम्ही तिला रिप्लाय देता का..?
नक्की तुम्ही कविता वाचता का..?

असेल एखादी कविता..
कोणा एका मुलाची..
कविता त्याची वाचायची..
तुम्ही मग टाळता का..?
नक्की तुम्ही कविता वाचता का..?

असतो करायचा रिप्लाय कोणालाही ..
म्हणुनी तुम्ही ती कविता..
न वाचताच रिप्लाय देता का..?
नक्की तुम्ही कविता वाचता का..?

आहो असते त्या कवितेत..
काही जणांच्या भावना..
करुनी दुर्लक्ष त्या भावनांचे..
तुम्ही स्वताचे नुकसान करता का..?
नक्की तुम्ही कविता वाचता का..?नक्की तुम्ही कविता वाचता का..?

--------------------शिरीष सप्रे(१०-३-२०१०)--------------------------

गंधाळलेले गीत माझे..

गंधाळलेले गीत माझे..
तुझेच बोल गात आहे..
ऐकशील जेव्हा गीत माझे..
तुझेच नाव मी गात आहे...

दूर त्या अंतरावरी..
हाक तुला मारत आहे..
गंधाळलेले गीत माझे
तुझेच बोल गात आहे...

बहरलेल्या फुलात आज..
तुझाच गंध येत आहे..
गंधाळलेले गीत माझे
तुझेच गीत गात आहे...

पावसाच्या या सरीमध्ये ..
तुझाच चेहरा दिसत आहे..
गंधाळलेले गीत माझे
तुझेच गीत गात आहे...

आकाशी त्या चंद्रकोरीत..
तुझेच हास्य खिलत आहे..
गंधाळलेले गीत माझे
तुझेच गीत गात आहे...

हवेची ती झुळूक आज
तुझ्या स्पर्शाची आठवण देत आहे
गंधाळलेले गीत माझे
तुझेच गीत गात आहे...तुझेच गीत गात आहे....

--------------शिरीष सप्रे (२२-२-२०१०)--------------




माझी ऑनलाइन मैत्रीण...!

कविता पोस्ट करता करता
अशीच एकीशी ओळख झाली...

तिच्या कवितेला रिप्लाय देता देता
ही ओळख फ्रेंड रिक्वेस्ट पर्यंत जाउन पोहचली...

फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट झाली
जी-टॉक वर आमची एक-मेकाशी बोलायला सुरुवात झाली,
एक-मेकांची ओळख पटताच
मन आमची एक-मेकाना ओळखु लागली ....

बोलणे आमचे दरोज होत होते,
मन आमचे तेवढेच जवळ येत होते...

एखाद्या ओळखिच्या व्यक्तीने प्रेम न द्यावे,
त्याहुन अधिक एक अनोलखी व्यक्ति ने आपल्यावर प्रेम करावे....

तिच्या विचारताच रात्र घालवावी....
सकाळ होताच ती ऑनलाइन येण्याची वाट पहावी..

ती आल्यावर कालचा दिवस कसा होता याची विचारपूस करावी
तिच्याशिच आधी बोलून मग आपल्या दिवसाला सुरुवात करावी..

ऑफिस नंतर ही तिच्याशी बोलायची अफाट इच्छा व्हावी
पण तिला तिचा नंबर मागायची हिम्मत न व्हावी..

दरोज बोलायची आपल्याला सवय लागावी
पण ही सवय मनाला आनंदायी व्हावी..

तिच्याशी बोलताच सार्या दुखाचा विसर पडावा
नव्याने पुन्हा जगायचा जोश जणू अंगात यावा..

फिरत होतो सर्वत्र एक मैत्रीसाठी
देव आहे दुनियेमधेय पाठवले तिला माझ्यासाठी...

असे जणू का होते
एखाद्या अनोलखी व्यक्तिमुले सारे जीवन पालटून जाते...

आमचे हे नाते असेच राहुदे
तिच्या मैत्रीची साथ मला अशीच आयुष्यभर मिळत राहुदे...

अंतरावर असुनही जवळ असल्यासारखी वाटावी
अशी एक मैत्रीण आयुष्यात प्रत्येकाला मिळावी....प्रत्येकाला मिळावी....!

---------शिरीष सप्रे (२८-११-२००९)---------------

"ताई -- मोठी बहिण"

आई-वडील या नंतर कोण आपल्याकडे पाहणारी असते...
तीच ती आपली ताई असते...

लहान भावंडासाठी तडजोड करत असते
तीच ती आपली ताई असते...

लहान भावंडांच्या चुका ..आपल्या पोटात घालत असते
तीच ती आपली ताई असते...

लहान भावंडांवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला
सामोरी जी जात असते
तीच ती आपली ताई असते...

घरी आई-वडील नसताना मायेने सांभाळ करणारी असते
तीच ती आपली ताई असते...

लहान भावंडांचे प्रत्येक हट्ट पुरवणारी असते
तीच ती आपले ताई असते...

चुकीच्या वाटेवरून जात असताना..
आपल्या ध्येया पासून भरकटत असताना..
योग्य मार्ग दाखवणारी जी असते
तीच ती आपले ताई असते...

आई-वडील नंतर आपल्यावर जीव लावणारी असते
तीच ती आपली ताई असते...

स्वतच्या इच्छेला मारून
स्वताच्या जबाबदार्या ओळखून
त्यासाठी रात्र-दिवस कष्ट करणारी जी असते
तीच ती आपली ताई असते...

अशी हि ताई देव प्रत्येक भावंडाना देओ
अशा या प्रेमळ ताईच्या सर्व इच्छा पूर्ण होवो...सर्व सुख मिळो...सदा
आनंदी राहो.....!
-----------------शिरीष सप्रे(५-१२-२००९)------------------------
---