Thursday, March 21, 2013

तळ हातावरती मी जपीन....!

गोष्टी प्रेमाच्या अनेक अशा,
अनेकदा पहिल्या अन ऐकल्या होत्या,
रंगी -बेरंगी प्रेमाच्या दुनियेत, 
या हृदयास ही रंग प्रेमाचा भरायचा होता...

अबोल प्रीत प्रेमाची ही
हृदयास या समजत होती,
देईल का साथ या हृदयासी कोण,
आस या वेड्या मनास होती...

मुक्या हृदयाच्या हाकेस या
साद तुझ्या हृदयाची मिळाली,
कळत-नकळत  या वेड्या मनाने,
प्रीत प्रेमाची काव्यात गुंफली...

आयुष्याच्या या नव्या पर्वाची
 सुरुवात तुझ्या साथेने होत आहे,
निरागस कोमल हास्य तुझे
सदा खिलत ठेवीन, वचन हे तुजसी आहे...

न मोजता अन मापता येणारे
प्रेम हे माझे कमी होणार नाही,
रंगी बेरंगी प्रेमाच्या दुनियेतील
माझ्या प्रेमाचा रंग फिका होणार नाही...

हाथात धरुनी हाथ सदा
आयुष्याच्या प्रत्येक पावोली साथ असेल ,
ना तुटेल साथ अन हाथ कधीही
येणाऱ्या संकटा सामोरी, उभा मी असेल...

विश्वास अन प्रेमाचे हे अतूट नाते
प्रत्येक क्षणी सदा मी राखीन,
आहे वचन पहिले आज तुजसी
शीतल हास्य शीतल तुझे, तळ हाता वरती मी जपीन....!
---------------शिरीष सप्रे(१८-०३-२०१३)------------------

2 comments:

  1. kavitetun kalatay shirish that now you are having totally good postiveness in you nahitar aattaparyent saglya kavita chaan hotya pan tya ek nirashecha sur kayam janavat hota mala tari...all the best fopr your new life....!!! god bless you both....!!! aata tuzhya kavita aankhi chaan phulnar...likhanat navin rang disanar...

    ReplyDelete
  2. शरीष काय लिहु तुझ्या बद्ल माझे मलाच समजत नाहि.....! तुझ्या कविता वाचताना मिच माझ्यात राहत नाहि...! तुझ्या कविता वाचताना आसे वाटते मीच त्यात गुफलो आहे...! कविता वाचताना तुझ्या वाटत मनास माझ्या जे झाल तुझ्या सोबत तसच माझ्या बाबतीत हि घडनार नाहि....! याचीच वाटते भिती मनास माझ्या .......! बालाजी यादव.....!

    ReplyDelete