Sunday, July 4, 2010

आई-बाबा तुमच्या चरणी....

आपण लहानाचे मोठे होतो पण अनेकदा आपण कडून अशा चुका होतात कि त्यामुळे आपल्या आई-वडिलांना मान खाली घालावी लागते...या चुका पुन्हा होणार नाही आणि या मातृपित्यांची मान खाली जाणार नाही...ही कविता त्या चुकांची माफी मागून.....शिरीष


दिले अस्तित्व मजसी तुम्ही
लहानचे ते मोठे केले,
काढुनी चिमटे पोटाला स्वताच्या
पोट माझे सदा भरले..

घालूनी चादर चुकांवर माझ्या
योग्य मार्गाचे मार्गदर्शन केले
येणाऱ्या संकटांची चाहूल भासताच
संकटाना त्या स्वतावर तुम्ही ओढविले..

मायेच्या त्या छत्रछायेत तुमच्या
सदा तुम्ही मला जपिले,
दुखाच्या झळीला न पोहचू दिले
सदा सुख माझ्यावर बरसविले..

प्रेमाची ती माया तुमची
कधी न मी जाणली..
तोडूनी मायेला तुमच्या सदा
दुख फक्त मी तुम्हाला दिली..

ठेवतो माथे माझे मी
आई-बाबा तुमच्या चरणी
केल्या आहेत चुका आजवरी फार
भुलवुनी आज सारे द्या मजसी माफी..

माझ्या चुकांमुळे पुन्हा कधी
डोळ्यात पाणी येऊ देणार नाही
होईल गर्व तुम्हाला ही एकदा
शरमेने मान खाली जाऊ देणार नाही.....मान खाली जाऊ देणार नाही...
-----------------शिरीष सप्रे(४-७-२०१०)----------------

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. तुम्ही हे पण वाचू शकतात Bayko Status आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता हे तुम्हाला कामाला येऊ शकत

    ReplyDelete