Wednesday, March 5, 2014

अन आज सागरही शांत आहे...!

ओळखले मला ...
.
.
हो, मीच तो तुमचाच
सदा तुमच्या सोबतचा
तुमच्या सुख दुखात मिसळणारा
दुख स्वताचे लपवणारा..…


किती सारे अविस्मरणीय क्षण होते
सारे काही सर्व भूलावले होते
क्षणांसी तुमच्यासोबत जगताना
हास्य ओठी खुलले होते .....


हर एकाची कट्ट्यावरील ती हजेरी
हर एकाशी बोलण्यास चढा-ओढ होती
तारा हृदयाच्या जुळल्या होत्या प्रत्येकाशी
अन आज हाथी आठवणींची शिदोरी होती .....


रंग मैत्रीचे चित्रात भरले होते
जुन्या नात्यांचे फुल बहरत होते
न होती चाहूल त्या वादळाची मजला
स्वतासी त्या रंगात रंगवले होते .....


मैत्रीच्या या अथांग सागरात
कोणी एक वादळ असे  उठले
डगमगावले मैत्रीच्या नौकेस असे
अन मला मात्र त्या किनारी फेकले .....


अथांग तो सागर मजला जणू
अनोळखी असा वाटू लागला
केला प्रयत्न एकरूपी त्यात होण्याचा
किनारा ही सागरा पासुनी दुरावू लागला.....


विश्वास ठेवला होता तुम्ही
का एका वादळात नाती तुटली
दुरावलो क्षणात सर्वांपासुनी
मर्यादेची होती का नाती जुळलेली.....


पहा एकदा किनार्यावरी तुम्ही
आजही तुमच्याच प्रतीक्षेत आहे
उद्वस्तवले मजला त्या वादळाने
अन आज सागरही शांत आहे.....अन आज सागरही शांत आहे.....
---------------शिरीष सप्रे (४-०३-२०१४)---------------