Sunday, December 19, 2010

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली...

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली..
.
.
क्षणात मी भूतकाळात गेलो
जुन्या आठवणीत मी रमलो
कठीण झाले भावनांना आवरणे
अश्रुनाही मी ना थांबवू शकलो..

सारे काही कालच्यासारखे वाटत होते
रंग आमुच्या प्रेमाचे जेव्हा बहरत होते
होते किती सुखाचे क्षण सारे
डोळ्यासामोरी चित्र उभे राहिले होते...

तिच्या लग्नाची पत्रिका आली..
मानल एक चटका लावूनी गेली
बंद करुनी ठेवल्या होत्या आठवणी
आठवणीना जागे करुनी गेली...

स्पर्श तिच्या प्रेमाचा तो
अजूनही मी विसरलो नव्हतो,
हातावरील रेषात मी आजही
तिचाच हात शोधत होतो...

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली..
वस्तुस्तिथी आज सारी बदललेली होती
कधी काळी माझ्यावर प्रेम करणारी,
लग्नाच्या बंधनात बंधणार होती...

विरहाचा नियतीला दोष देणे
केव्हाच मी बंद केले होते
गाली हास्य तिचे खिलत राहावे
हेच मागणे देवाकडे केले होते...

आज तिच्या लग्नाची पत्रिका आली..
.
.
थोड्या दिवसात लग्न तिचे होणार होते
साता जन्मांचे बंध जुळणार होते
दुखाची झळ ही तिच्यापर्यंत जावू नये
साकडे हे देवाकडे मी घातले होते...
------------शिरीष सप्रे(१९-१२-२०१०)----------

Wednesday, December 15, 2010

शेवटची भेट मजसी न कळाली...

शेवटची भेट ती
आज नियतीने लिहिली होती
कर्दनकाळी रात्र ती
आज आली होती ...

लिखित होता विरह आमुचा
तरीही तो बदलायचा होता
बेरंग होता प्रेमाचा साचा
रंग त्यात भरायचा होता...

शेवटची भेट आमुची
आजही तिथेच होती
थोड्या दिवसाची प्रेमकहाणी
जिथे लिहिण्यात आली होती...

प्रेमाचा गंध तो आज
हवेतुनी नाहीसा झाला होता
जन्माची साथ देणाऱ्या चंद्रानेही
तार्यांचा आज साथ सोडला होता...

प्रेमाचे ते दिवस सारे
आज कोठेतरी हरवले होते
उभे होतो सामोरी आम्ही दोघे
तरीही अंतरावर वाटत होते...

नाही जमणार म्हणुनी
सहज पाठ तिने फिरवली
उभा होता वेडा मी तिच्या प्रतीक्षेत
शेवटची भेट मजसी न कळाली...मजसी न कळाली...
-------------शिरीष सप्रे(१५-१२-२०१०)-----------

Tuesday, December 14, 2010

तुझेच मला व्हायचे आहे...

मृगनयनी प्रिये तू
नयनात मला पहायचे आहे
एकांतातील विचार बनुनी
आज मला सतवायचे आहे..

हास्य त्या गालावरी
आज पुन्हा खिलवायचे आहे
बनुनी पुन्हा कारण हास्याचे
आज तुला हसवायचे आहे

हातात घेउनी हात तुझा
जग सारे दाखवायचे आहे
प्रेमाच्या त्या घरात प्रिये
तुझेच रूप पहायचे आहे...

घेउनी मिठीत आज पुन्हा
प्रेमाची उब ती द्यायची आहे
विलीन होऊनी जा तू हि प्रिये
तुझी दुखे सारी मला घ्यायची आहे...

विरहाचे अंतर आपल्यातील
आज मला मिटवायचे आहे
साधुनी जवळीकता आज प्रिये
तुझेच मला व्हायचे आहे...
---------------शिरीष सप्रे(१४-१२-२०१०)---------------

Wednesday, December 8, 2010

तू ONLINE आलीस की

तू ONLINE आलीस की
VISIBLE मी होतो..
राहुनी INVISIBLE सदा
तुझीच वाट पाहत असतो...

तू ONLINE आलीस की
BUSY चा STATUS मी लावतो
नाही कोण त्रास देत मला अन
तुझ्याशी तासंतास मी बोलतो...

तू ONLINE आलीस की
मोबाईल माझा SILENT वर जातो
तुझ्याशी CHAT करताना मला
कोणाचाही फोन नको असतो...

हसण्याचा SMILEY तू पाठवता
मनात आनंदाचा लाडू फुटतो
अशीच गोड हसत अशील तुही सदा
या विचारात मग स्वप्ने मी रंगवतो...

गुड बाय चे SMILEY तुझे
मनाला थोडे दुखी करते
OFFLINE तू कधी जाऊ नये
वेडी इच्छा मनाला असते...

CHAT आपले SAVE करून
रात्रोरात्र वाचत मी बसतो
मनात निराळी ओढ असते
जणू तुझ्याशीच मी बोलत असतो...

तू ONLINE आलीस की
वेगळ्याच विश्वात मी वावरतो
विसरुनी जातो वास्तविकता मी
NET च्या दुनियेत मी हरवतो...मी हरवतो....
-------------शिरीष सप्रे(८-१२-२०१०)----------------

Tuesday, December 7, 2010

बोलतात सारे आम्ही टपोरी...

ए साला काय पोरगी...
अशीच आपन कि भाषा
हीच आपन के मू कि बोली
बोलतात सारे आम्ही टपोरी..

नाक्यावरचे आम्ही पडीक
मळकट टी-शर्ट एक जीन्स
सलाम ठोकतात फेरीवाले सारे
आम्हीच या एरियाचे किंग...

सकाळ होताच नाक्यावर हजेरी
रात्रीशिवाय ना घराकडे फेरी
सभ्य लोकांसाठी आम्ही वैरी
बोलतात सारे आम्ही टपोरी...

हिला पहायचे,तिला छेडायाचे
प्रत्येकीवर सदा कमेंट्स करायचे
मुलीही टाळतात त्या नाक्यावरील फेरी..
बोलतात सारे आम्ही टपोरी...

भविष्याचे टेन्शन का घ्यायचे
मदमस्त आपले जीवन जगायचे
नडेल का कोण ते बघायचे
साला टपोरीगिरी करत सदा फिरायचे...

राडा झाला कि गाड्या निघतात
नडणार्याला मारायला धावतात
आम्हाला हात लावायला कोण हिम्मत करी
बोलतात सारे आम्ही टपोरी....

आम्ही ही चांगले कधी काळी होतो
दुनियेच्या काफिरीला थकलो होतो
चांगली दुनिया आमुची झाले वैरी
बोलतात सारे आम्ही टपोरी...आम्ही टपोरी...
-----------शिरीष सप्रे(७-१२-२०१०)-------------

Sunday, December 5, 2010

पैंजणे ही आज वाट पाहत आहे...

घराला घरपण प्रिये
यायचे तुझ्या आगमनाने
नांदून उठायचे घर सारे
कोमल पायातील पैंजणानच्या आवाजाने...

ताल - सूर , लय बद्ध
होती चाल तुझी
छन छन घुमायचा नाद सर्वत्र
अन छेडायाची तार हृदयाची...

सा- रे , रे -ग , ग - म , म - प
स्वर सारे पायी तुझ्या नांदायचे
हर्षित व्हायचे घर सारे
तुझे पैंजण जेव्हा वाजायचे...

आज हरवले स्वर सारे
सूर -ताल हि आज बिघडला
राहिले आठवणीत पैंजण तुझे
साथ माझा तू जेव्हा सोडीला...

आज हि नाद पैंजणांचा
सार्या घरात घुमत आहे
परतशील का प्रिये तू
पैंजणे ही आज वाट पाहत आहे...
------------शिरीष सप्रे(५-१२-२०१०)---------