Monday, June 28, 2010

सारे सगळे शांत होते....

एका चुकीच्या पावलाने
घनदाट जंगलात अडकले होते
अमावस्येच्या काळोखी रात्री
वातावरण सारे शांत होते..

किर्र किर्र आवाजाने त्या
अंगावर शहारे येत होते
गवतातुनी येणारा सळसळ आवाज
अचानक सगळे शांत होत होते..

दमछाकाने वाढलेला श्वासोश्वास
सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते..
डोक्यावरी होती अघोरी रात्र
सारे सगळे शांत होते...

एकाच्या चुकीची शिक्षा
आज सारे भोगणार होते..
होता मृत्यू आज दारी उभा
सारे सगळे शांत होते..

पळायच्या वाटा सार्या
सारे मार्ग ते बंद होते..
नव्हता उपाय मृत्यू शिवाय त्यांना
सारे सगळे शांत होते...सारे सगळे शांत होते....
--------------शिरीष सप्रे(२८-६-२०१०)---------------

तिचेच प्रतिबिंब दिसले..

झोपेत पाहायचो स्वप्नसुंदरी
साक्षात आयुष्यात ती आली
येउनी बेरंगी जीवनात माझ्या
रंगांची उधळण करुनी गेली..

फुलासारखी नाजूक अशी
कोमल हास्य तिच्या गाली
होते वाटत स्वर्गात मी जणू
अशी अप्सरा मला मिळाली..

नव्याचे ते नऊ दिवस संपले
अप्सरेचे खरे रूप दिसले
टाकला होता ओवाळूनी जीव जिच्यावर
तिनेच हृदयाचे तुकडे केले..

देऊनी सर्वस्वी प्रेम तिला
दोषी अखेरीस मला ठरवले
प्रेमाच्या बुडत्या नौकेला होतो वाचवीत
अथांग सागरात मलाच बुडविले..

केले वार अनेक हृदयावरी त्या
रक्ताचे अश्रू हृदयातूनी ढळले
प्रेम माझे कधी न जाणलेस
रक्तात हि तिचेच प्रतिबिंब दिसले...तिचेच प्रतिबिंब दिसले....
--------------शिरीष सप्रे(२८-६-२०१०)-------------------

Wednesday, June 16, 2010

मुक्तता होती द्यायची ....

होते केस विखुरलेले तिचे ,
अंगावर मळकट पांढरी साडी,
स्वताशीच काहीतरी बोलायची,
एकदा एका गावात होती अशी बाई..

एकटीच अशी राहायची
दूर-दूर रानात भटकायची
पडला अंधार गावात की मग
झाडाखाली येउनी बसायची..

रात्रीचे तिला भान नसायचे
नव्हती श्वापदांची हि भीती
लोकही सारे घाबरायचे तिला
होती अशी एकदा एका गावातली स्थिती..

एकदा एका गावात रात्रीचा
कहर असा जणू झाला..
अमावास्येच्या रात्रीचा तो.
खेळ सारा पूर्ण झाला ...

पाहत होती वाट ती
अमावास्येच्या त्या रात्रीची
करुनी मुक्तता स्वताची त्या रात्री
मुक्तता होती द्यायची तिला त्या प्रेमाची..तिला त्या प्रेमाची....

------------------शिरीष सप्रे(१६-६-२०१०)------------------

Monday, June 7, 2010

अल्कोहोल - एक जीवन....

मावळताना सूर्य रोज
काहीतरी खुणावितो
आली रात्र पुन्हा आज
अल्कोहोलची आठवण देतो..

कोणी त्या शहाण्याने
अशी नशा बनविली
रात्रीपुरती का होईना
अल्कोहोलची साथ मिळाली..

प्यावी पाण्यात ती जर
अशी वेगळी येते मजा ..
मिसळली शीत-पेय तर
रात्रीपुरती होते नशा..

दुखाचा तो विसर जसा
अल्कोहोल करुनी देतो
बैठकीतच जिंकतो जग आपण
ताकद ती अल्कोहोल देतो..

विरहाच्या दुखाला त्या
अल्कोहोल भूलावितो
गेले प्रेम सोडूनी जरी
अल्कोहोल मात्र साथ देतो...

एक लार्ज पेग पिताच
तुझ्या आठवणीचा विसर पडतो
जाते रात्र पेग वर पेग पिण्यात
विरहाला या असेच मी भूलावितो..

झाली नष्ट दुनिया जरी
अल्कोहोल साथ सोडणार नाही
प्रेमातच मिळेल धोका सदा
अल्कोहोल दगा देणार नाही..

केले प्रेम जिच्यावर जीवापाड
तिने मला आज नाकारले
आले अल्कोहोल सोबतीला आज
अल्कोहोलास सर्वस्वी मी मानले...अल्कोहोलास सर्वस्वी मी मानले....
-----------------शिरीष सप्रे(७-६-२०१०)------------------------

Wednesday, June 2, 2010

प्रत्येक थेंबात तिचाच चेहरा शोधत...

मातीचा तो सुगंध दरवळला
घेउनी आनंद तो पाउस आला..

वातावरण सारे हर्षित झाले
उकाड्याचे ते दिवस संपले..

चातक हि पाणी पिऊ लागला
संगे फुलांना डोलवू लागला..

पावसात एकटा तो उभा होता
अश्रुना त्याच्या पाण्यात लपवत होता..

आठवण तिची त्याला येत होती
पावसाच्या थेंबात तिचीच प्रतिमा होती..

आनंदात सारे असे मग्न झाले
त्या वेड्यासी कोणी न पहिले..

पावसाची ती सर अशी धावुनी आली
संगे त्या प्रेमाची आठवण ताजी झाली..

असतो उभा तो अश्रू पावसात ढाळत
अन प्रत्येक थेंबात तिचाच चेहरा शोधत...तिचाच चेहरा शोधत...
-----------------शिरीष सप्रे(२-६-२०१०)-----------------